Amruta Fadnavis: अमृता फडणवीसांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शेअर केले खास फोटो; नेटकरी म्हणतात...
अमृता फडवणीस (Amruta Fadnavis) यांनी खास फोटो शेअर करुन आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

International Yoga Day 2023: आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त (International Yoga Day 2023) अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन चाहत्यांना शुभेच्छा देत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडवणीस (Amruta Fadnavis) यांनी देखील खास फोटो शेअर करुन योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अमृता फडणवीस यांनी शेअर केलेल्या फोटोवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.
अमृता फडवणीस यांनी त्यांचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्या योगा करताना दिसत आहेत. या फोटोंना त्यांनी कॅप्शन दिलं, 'तुम्ही कितीही व्यस्त असाल, जगात कुठल्याही कोपऱ्यात असाल तरी शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी योगा करणं विसरू नका!'अमृता फडवणीस यांनी शेअर केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
नेटकऱ्यांच्या कमेंट्स
अमृता फडवणीस यांनी शेअर केलेल्या फोटोला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'तुम्ही रोज योगा करता?' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'तुमचं म्हणणं बरोबर आहे मॅडम, योगामुळे आपण तंदुरुस्त आणि निरोगी राहतो.'
View this post on Instagram
मलायका आरोरा, अनुपम खेर, करिना कपूर, डेजी शाह आणि ईशा देओल या सेलिब्रिटींनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन योगा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अमृता फडवणीस या सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत असतात. त्यांनी इन्स्टाग्रामवर 875K फॉलोवर्स आहेत. अमृता फडणवीस यांच्या गाण्यांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळते. त्यांच्या नव्या गाण्यांची नेटकरी उत्सुकतेने वाट बघत असतात.
अमृता फडणवीस यांचं 'मूड बना लिया' हे गाणं काही दिवसांपूर्वी रिलीज झालं आहे. या गाण्याला नेटकऱ्यांची पसंती मिळाली. या गाण्याला Meet Bros यांनी संगीत दिलं आहे. तर कुमार हे या गाण्याचे गीतकार आहेत. अमृता फडणवीस यांच्या या नव्या गाण्याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. त्यांच्या 'वो तेरे प्यार का गम' या गाण्याला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. मोरया रे, वो तेरे प्यार का गम, तिला जगू द्या, शिव तांडव स्त्रोतम ही गाणी अमृता यांनी गायली आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
