(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Deepika Padukone Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'च्या दुसऱ्या भागातून दीपिकाचा पत्ता कट होणार? ही गोष्ट ठरणार कारणीभूत
Deepika Padukone Kalki 2898 AD : नाग अश्विन आता 'कल्की 2898 एडी' चा दुसरा भागही आणण्यासाठी सज्ज झाला आहे.
Deepika Padukone Kalki 2898 AD : दिग्दर्शक नाग अश्विन सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याने दिग्दर्शित केलेल्या 'कल्की 2898 एडी'ची ( Kalki 2898 AD) बॉक्स ऑफिसवरील पकड अजूनही कमी झालेली नाही. नाग अश्विन आता 'कल्की 2898 एडी' चा दुसरा भागही आणण्यासाठी सज्ज झाला आहे. 'कल्की 2898 एडी'च्या सिक्वेलची जुळवाजुळव पूर्ण होणार असल्याची माहिती एका सूत्राने दिली. अमिताभ बच्चन (Amitabh Bachhchan), प्रभास (Prabhas) आणि कमल हासन (Kamal Haasan) पुन्हा 'कल्की 2898 एडी'च्या सिक्वेलमध्ये दिसणार आहेत, परंतु दीपिका पदुकोण (Deepika Padukone) सिक्वेलमध्ये नसणार असल्याचे म्हटले जात आहे.
या चित्रपटाशी संबंधित सूत्रांनी सांगिकले की, 'कल्की 2898 एडी'च्या सिक्वेलमध्ये दीपिका असणार की नसणार, याबाबतचे कोणतेही चित्र स्पष्ट नाही. दीपिका पदुकोण ही सप्टेंबर महिन्यात बाळाला जन्म देणार आहे. त्यानंतर दीपिका ही काही महिने मॅटर्निटी लिव्ह असणार आहे. दीपिकाची ही मॅटर्निटी लिव्ह संपेपर्यंत थांबण्याची तयारी निर्मात्यांची आहे. मात्र, कल्की 2898 एडीचा पहिला भाग ब्लॉकबस्टर झाल्यानंतर आता त्याच्या सिक्वेलची मागणी वाढू लागली आहे.त्यामुळे सिक्वेल लवकर रिलीज करण्याचा विचार झाल्यास दीपिकाऐवजी दुसऱ्या अभिनेत्रीची वर्णी लागू शकते, असेही सूत्रांनी म्हटले.
View this post on Instagram
'कल्की 2898 AD' ने तेलुगू भाषेत अपेक्षित कामगिरी केली नाही. पण हिंदी भाषिक राज्यांमध्ये या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाल केली आहे. या चित्रपटाच्या बंपर कमाईमुळे नाग अश्विनने एसएस राजामौली, संजय लीला भन्साळी आणि करण जोहर यांच्या यादीत स्थान मिळवले आहे.
बॉक्स ऑफिसवर 'कल्की'ची हवा...
'कल्की 2898 एडी' ने दोन आठवड्यांपासून थिएटरमध्ये चांगली कामगिरी केली आहे. या दरम्यान कोणताही मोठा चित्रपट रिलीज झाला नसल्याचा फायदा कल्की 2898 एडीला मिळाला.
View this post on Instagram
या आठवड्यात डिस्टोपियन हा साय-फाय चित्रपट झळकणार आहे. त्याशिवाय, कमल हासन यांचा 'इंडियन 2', अक्षय कुमारचा 'सरफिरा' रिलीज होणार आहे. रिलीजच्या 15 व्या दिवशी 'कल्की 2898 AD' ने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 6.7 कोटी रुपयांची कमाई केली. चित्रपटाचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 543.45 कोटींवर पोहोचले आहे.