Deepika Padukone Upcoming Film Project K : दीपिकाचा पुढील 'प्रोजेक्ट' प्रभाससोबत, अमिताभ बच्चनही महत्त्वाच्या भूमिकेत
Deepika Padukone And Prabhas Movie : दीपिका पादूकोण आणि प्रभास यांनी हैदराबादमध्ये त्यांच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. सिनेमात अमिताभ बच्चनदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
Deepika Padukone And Prabhas Started Their Upcoming Film Project K Shooting : तेलुगू स्टार प्रभासने त्याच्या आगामी 'प्रोजेक्ट-के' (Project K) सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या चित्रपटात प्रभाससोबत बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादूकोण (Deepika Padukone) तसेच अमिताभ बच्चनदेखील (Amitabh Bachchan)दिसणार आहेत. सिनेमाचे नाव 'प्रोजेक्ट-के' असे ठेवण्यात आले आहे. तसेच हैदराबादमध्ये सिनेमाच्या शूटिंगलादेखील सुरुवात झाली आहे. हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये प्रभास आणि दीपिकाचे काही सीन शूट करण्यात येणार आहेत.
सिनेमाच्या निर्मात्यांनी प्रभास आणि दीपिका यांच्यावर शूट केलेल्या पहिल्या शॉटचा व्हिडीओ जारी केला आहे. या सिनेमात अमिताभ बच्चन, प्रभास, दीपिका पदुकोण महत्तवाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
𝑰𝒏𝒅𝒊𝒂'𝒔 𝒃𝒊𝒈𝒈𝒆𝒔𝒕 𝒔𝒖𝒑𝒆𝒓𝒔𝒕𝒂𝒓𝒔 #Prabhas & @deepikapadukone 𝒋𝒐𝒊𝒏 𝒉𝒂𝒏𝒅𝒔 𝒐𝒏 𝒕𝒉𝒆 𝒘𝒐𝒓𝒍𝒅'𝒔 𝒃𝒊𝒈𝒈𝒆𝒔𝒕 𝒄𝒂𝒎𝒆𝒓𝒂... #ProjectK @SrBachchan @nagashwin7 @VyjayanthiFilms pic.twitter.com/nRjsJYVMDc
— Vyjayanthi Movies (@VyjayanthiFilms) December 11, 2021
दीपिका पादूकोण आणि प्रभासची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. तसेच दीपिका पादूकोणचा हा पहिला साऊथ चित्रपट असणार आहे. बिग बी बद्दल बोलताना चित्रपटाचे दिग्दर्शक नाग अश्विन म्हणाले,"बच्चन सरांनी अनेक पर्यायांमधून आमच्या सिनेमाची निवड केली आहे. मी खरोखर स्वत:ला भाग्यवान समजतो".
संबंधित बातम्या
Rajinikanth Birthday : रजनीकांतचे फॅन आहात? 'हे' 10 सिनेमा बघायला विसरू नका
Kangana Ranaut Instagram Post : विकी-कतरिनाकडून कंगनाला खास भेट, फोटो शेअर करत दिली माहिती
Majha Katta : दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्या निधनानंतर सूचलेला 'गोदावरी' सिनेमा, अभिनेता जितेंद्रसह दिग्दर्शक निखिलने जागवल्या आठवणी
अभिमानास्पद! सुपरस्टार अभिनेता रजनीकांतच्या चित्रपटाला मराठमोळ्या लक्ष्मीकांतचे संगीत
सैफ अली खानची पहिली पत्नी अमृता सिंगला कधी भेटली का करीना कपूर?, करीनाने स्वत: सांगितली खास गोष्ट
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha