अभिमानास्पद! सुपरस्टार अभिनेता रजनीकांतच्या चित्रपटाला मराठमोळ्या लक्ष्मीकांतचे संगीत
अहमदनगर जिल्ह्यातील तरूणाने सुपरस्टार अभिनेता रजनीकांतच्या (Rajinikanth) चित्रपटाला संगीत दिले आहे. महाराष्ट्रासाठी ही गोष्ट कौतुकास्पद अशीच आहे.
अहमदनगर : जिद्द, चिकाटी आणि परीश्रम करण्याची तयारी असेल तर यश पायाशी लोळण घेतं. असेच कष्ट आणि चिकाटीने श्रम केल्यामुळे मराठमोळ्या तरूणाने महाराष्ट्राबाहेरही आपला ठसा उमटवला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील तरूणाने सुपरस्टार अभिनेता रजनीकांतच्या (Rajinikanth) चित्रपटाला संगीत दिले आहे. महाराष्ट्रासाठी ही गोष्ट कौतुकास्पद अशीच आहे.
अहमदनगर (Ahmednagar ) जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील फुंदे टाकळी या गावातील लक्ष्मीकांत बद्रीनारायण फुंदे ( lakshmikant funde) या तरूणाने एल. के. लक्ष्मीकांत या नावाने संगीत क्षेत्रात उंच भरारी घेतली आहे. एल. के. हा गायक, संगीतकार आणि संगीत दिग्दर्शक म्हणून काम करतो. तो आपल्या संगीताने हिंदीसह तामीळ चित्रपटांतून चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. नूकतेच त्याने सुपरस्टार अभिनेता रजनीकांत यांची मुख्य भूमिका असलेल्या 'अनाथे' या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनचे दिग्दर्शन केले आहे. 'अनाथे'च्या हिंदी व्हर्जनमध्ये एल. के. याने तीन गीते गायली आहेत. त्याच्यासोबत गायिका स्मृती सिन्हा आणि गुल सक्सेना यांनीही या चित्रपटासाठी गीत गायन केले आहे. या सर्वांनी गायलेल्या गीतांचे गीतकार राहुल काळे आहेत.
लक्ष्मीकांत हा शेतकरी कुटुंबातात जन्मला. बालपणापासूनच त्याला संगीताची आवड होती. परंतु, घरची परिस्थिती बेताची असल्याने त्याला संगीत शिकण्यासाठी वेगळा क्लास लावता आला नाही. त्याच्या कुटुंबाचा संगीत क्षेत्रात करियर करण्यासाठी विरोध होता. परंतु, लक्ष्मीकांत याने घरच्यांचा विरोध पत्करून आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत चित्रपट सृष्टीत गायक, संगीतकार, दिग्दर्शक व तंत्रज्ञ म्हणून ओळख निर्माण केली.
पाथर्डीमधील श्री तिलोक जैन विद्यालयात लक्ष्मीकांतचे महाविद्यलयीन शिक्षण पूर्ण झाले. संगीताची आवड त्याला शांत बसू देत नव्हती. त्यामुळे त्याने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होताच पुणे गाठले. पुण्यात संगीताचे शिक्षण घेतल्यानंतर मुंबईत साउंड इंजीनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण घेत असताना आर्थिक अडचणी येत होत्या. परंतु, सुरूवाच्या काळात मिळेल त्या स्टुडिओत काम करून त्याने शिक्षण पूर्ण केले. त्याच्यातील संगीत कौशल्य पाहून अल्पावधीतच त्याला नामांकित स्टुडीओमध्ये काम करण्याची संधी मिळाली. मिळालेल्या संधीचे सोने करत लक्ष्मीकांतने संगीत क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली.
बड्या कलाकारांसोबत काम
लक्ष्मीकांत याने सुप्रसिद्ध गायक सोनू निगम, श्रेया घोषाल, कनिका कपूर, उदित नारायण, मोहित चौहान, दर्शन रावल, सुनील शेट्टी, सनी लिओनी, क्रिकेटर जहीर खान यांच्या सोबत काम केले आहे.
मोठ-मोठ्या प्रोजेक्टवर काम
आपल्या आठ वर्षाच्या संगीत करियरमधून लक्ष्मीकांत याने चांगले नाव कमविल्यानंतर त्याने अनेक मोठ-मोठ्या प्रोजेक्टवर काम केले. बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी आणि अरबाज खान यांच्या 'तेरा इंतजार' या हिंदी चित्रपटात संगीत दिग्दर्शक म्हणून त्याने काम केले. हा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर लक्ष्मीकांतने मागे ओळून पाहिलेच नाही. त्यानंतर त्याने तूतक तूतक तूतिया, हम चार, रोमियो अकबर, वाल्टर, रॉ, हमे तुमसे प्यार कितना, यांच्यासह अनेक प्रसिद्ध हिंदी चित्रपटांसह झिंगाची गोळी, एक किनारा मिळाला, कृष्णा कृष्णा या मराठी अल्बममधून याने संगीत दिग्दर्शन व गायन केले. गायक मोहित चौहान यांनी गायलेले मिठी मिठी गलन, रहनुमा, हर लम्हा, या चित्रपटात मिश्रण अभियंता म्हणूनही लक्ष्मीकांत याने आपले कौशल्य दाखवले. याबरोबरच कन्नड, तामिळ, तेलगू भाषेतील 'एक्स रे' चित्रपटासाठीदेखील त्याने गायन केले.
गावातील मुलगा सुप्रसिद्ध रिअॅलिटी शोमध्ये बनला परीक्षक
फुंदे टाकळेसारख्या ग्रामीण भागातील या मुलाने 'ओम शांती ओम' या रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून काम केले. एवढेच नाही तर प्रेक्षकांच्या भेटीस उतरलेल्या 'बाळू मामाच्या नावाने चांगभल या मराठी मालिकेसाठी त्याने गीत गायन केले.
इतर बातम्या
कोरोनाने मृत्यू झालेल्या वडिलांच्या स्मृती जपण्यासाठी मुलाचा कौतुकास्पद उपक्रम, विद्यार्थ्यांना दिले 'राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र'
एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळवून करोडोंच्या जमिनीची विल्हेवाट लावण्याचा अनिल परबांचा डाव : आमदार गोपीचंद पडळकर
सैफ अली खानची पहिली पत्नी अमृता सिंगला कधी भेटली का करीना कपूर?, करीनाने स्वत: सांगितली खास गोष्ट