Kangana Ranaut Instagram Post : विकी-कतरिनाकडून कंगनाला खास भेट, फोटो शेअर करत दिली माहिती
Kangana Get Return Gift : विकी कौशल आणि कतरिना कैफने कंगना रणौतला लग्नाची खास भेट दिली आहे. कंगनाने त्यासंदर्भात सोशल मीडियावर शेअर करत माहिती दिली आहे.
Kangana Ranaut Instagram Post : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्नसोहळ्यातले फोटोदेखील ते सोशल मीडियावर शेअर करत आहेत. या फोटोंना चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.
नवविवाहित जोडपे बॉलिवूड सेलिब्रिटींना रिटर्न गिफ्ट पाठवत आहेत. दरम्यान त्यांनी बॉलिवूड क्वीन कंगना रणौतलादेखील भेट पाठवली आहे. कंगनाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करत त्यासंदर्भात माहिती दिली आहे. विकी-कतरिनाने कंगनाला साजुक तुपातल्या लाडवांची भेट दिली आहे.
कंगनाने लाडवांचा फोटो शेअर करत विकी आणि कतरिनाचे आभार मानले आहेत. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छादेखील दिल्या आहेत. विकी कतरिनाच्या नात्यावर भाष्य करणारी एक पोस्ट कंगनाने याआधीदेखील सोशल मीडियावर शेअर केली होती.
कंगनाचे आगामी सिनेमे
'तेजस' सिनेमानंतर कंगनाचा 'धाकड' सिनेमा प्रदर्शित होणार आहे. धाकड चित्रपटात कंगना एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे. कंगना 'द इनकार्नेशन ऑफ सीता' या पौराणिक चित्रपटातदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'टिकू वेड्स शेरू' या सिनेमावरदेखील कंगनाचे काम सुरू आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
संबंधित बातम्या