एक्स्प्लोर
'पद्मावती'साठी दीपिकाला रणवीर, शाहिदपेक्षा जास्त मानधन!
चित्रपटाचं 95 टक्के चित्रीकरण पूर्ण झालं आहे. हा सिनेमा 17 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु आता पुढील वर्षी एप्रिलमध्ये चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
मुंबई : दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांचा महत्त्वाकांक्षी पद्मावती सिनेमासाठी प्रमुख अभिनेत्री दीपिका पादूकोणने, रणवीर सिंह आणि शाहिद कपूरपेक्षाही जास्त फी घेतल्याचं म्हटलं जात आहे.
पद्मावती सिनेमासाठी दीपिकाला सुमारे 13 कोटी रुपये मिळाले आहेत. तर रणवीर सिंह आणि शाहिद कपूरने प्रत्येकी 10 कोटी रुपये घेतले आहेत. हे वृत्त खरं असल्यास, बॉलिवूडमधील चर्चित मानधनातील तफावतीच्या मुद्द्यासंदर्भात दीपिकाने नवा ट्रेण्ड सेट केला आहे.
चित्रपटाचं 95 टक्के चित्रीकरण पूर्ण झालं आहे. हा सिनेमा 17 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु आता पुढील वर्षी एप्रिलमध्ये चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
आरशाद्वारे मुखदर्शन देणारी राणी पद्मावती कोण होती?
सिनेमाचं बजेट 150 कोटी रुपयांचं असल्याने निर्माते प्रत्येक बाजूने रिकव्हरीबाबत विचार करत आहेत. चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनमध्येही जास्त वेळ लागणार आहे. युद्धाचे अनेक दृश्य आहेत, ज्यात व्हीएफएक्सचा वापर होणार आहे.
महाराणी पद्मावतीवर आधारित या सिनेमाची कथा आहे. राणी पद्मावती तिच्या सौंदर्य, बुद्धी आणि साहसासाठी लोकप्रिय होती. दीपिका पादूकोण पद्मावतीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर रणवीर सिंह अलाउद्दीन खिलजी आणि शाहिद कपूर राजा रतन सिंहच्या भूमिकेत दिसली. सिनेमात अदिती राव हैदरीही दिसेल.
....म्हणून रणवीर-दीपिका-शाहिदचा 'पद्मावती' पुढील वर्षी प्रदर्शित होणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement