एक्स्प्लोर
'त्या' अटीनंतर दीपिका आणि सलमान एकत्र

मुंबई : अभिनेत्री दीपिका पादुकोणला अखेर बॉलिवूडचा दबंग सलमान खानसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. दिग्दर्शक कबीर खानच्या आगामी सिनेमात ती सलमान खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. मात्र हा सिनेमा साईन करण्यापूर्वी दीपिकाने कबीरसमोर एक अट ठेवली होती.
कबीर खान नुकतेच दीपिका पादुकोणकडे नव्या सिनेमाची ऑफर घेऊन गेले होते. मात्र सलमान असलेल्या सिनेमात दुय्यम भूमिका साकारणार नाही, अशी अट दीपिकाने कबीर खानसमोर ठेवली.
खरंतर सलमानच्या सिनेमात अभिनेत्रींना फक्त सुंदर दिसण्याशिवाय दुसरं काम नसतं. संपूर्ण सिनेमात सलमानच दिसतो. त्यामुळे दीपिकाने आधीच कबीर खानला सांगितलं की, तिची भूमिका दमदार असायला हवी. आता कबीर खानही दीपिकाची ही अट लक्षात घेऊन स्क्रिप्टवर काम करत आहेत.
मागील एका मुलाखतीत दीपिकाने सलमान खानसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर काबूल एक्स्प्रेस, एक था टायगरचे दिग्दर्शक कबीर खानने तिला सल्लूसोबतच्या सिनेमात काम करण्याची ऑफर दिली. यानंतर दीपिकाने ठेवलेली अट कबीर खानने मान्य केली.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
नाशिक
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
























