थलैवीवरही कोरोनाचा इफेक्ट!
थलैवी चित्रपटात मॉब दृश्य घेण्यासाठी अनेकांनी इच्छा व्यक्त केली होती. त्यासाठी निर्मात्यांनीही तयारी केली होती. पण आता कोरोनानंतर आलेल्या नियमांनुसार या सगळ्या दृश्यांबद्दल नव्याने विचार करावा लागणार आहे.
लॉकडाऊनचा मोठा फटका सिनेसृष्टीला बसला. लॉकडाऊन सगळ्यात आधी लागला तो सिनेमा थिएटर्सना. त्यामुळे त्याचा थेट फटका सिनेमांना बसला. त्यानंतर गेल्या मार्चपासून थिएटर्स बंद आहेत. त्यामुळे सिनेमेही बंद आहेत. आता जवळपास इतक्या काळानंतर पुन्हा एकदा सिनेमाची चित्रिकरणं सुरू झाली आहेत. पण कोरोना आणि लॉकडाऊनमुळे या चित्रिकरणांना न्यू नॉर्मलचा सामना करावा लागत आहे.
अनेक सिनेमांची चित्रकरणं लांबली. अनेक लोकांनी सिनेमांच्या चित्रिकरणाचं पुन्हा नव्याने नियोजन केलं. काहींनी बजेट्स बदलली. काहींनी कलाकार कपात केली. असं बऱ्याचदा घडलं. आता त्याचा थेट परिणाम अनेक मोठ्या सिनेमांवर होऊ लागला आहे. अनेक बड्या सिनेमांमधले मॉब सीन्स आता कमी करण्यात आले आहेत. अनेक सिनेमांमधल्या मॉब सीन्सवर पुन्हा एकदा विचार होऊ लागला आहे. यातलाच एक महत्वाचा सिनेमा आहे थलैवी. तामिळनाडूच्या नेत्या जयललिता यांच्यावर थलैवी हा चित्रपट बनतो आहे. अभिनेत्री कंगना रनौत यात मुख्य भूमिकेत आहे. त्या सिनेमाचं आता पुन्हा एकदा नियोजन होऊ लागलं आहे.
'... कारण मी दीपिकासारखी नव्हते'; अभिनेत्री फातिमा सना शेखचा धक्कादायक खुलासा
थलैवी चित्रपटाचं चित्रिकरण काही प्रमाणात झाल्यावर लॉकडाऊन लागला. त्यानंतर या चित्रपटाचं चित्रिकरण थांबलं. आता पुन्हा एकदा चित्रकरण सुरू झालं आहे. कंगना आता या चित्रिकरणासाठी दक्षिणेत आहे. अनेक महत्वाचे सीन्स आता शूट करायचे राहिले. यात अनेक महत्वाचे सीन आहेत. विशेषत: जयललिता यांच्या सभा. त्यांनी आयोजित केलेल्या रॅलीज यांचा समावेश यात होतो, जयललिला यांच्या सभांना होणारी गर्दी.. त्यांचा तिकडे असलेला चाहतावर्ग खूपच मोठ्या प्रमाणात होता. थलैवी चित्रपटात अशी दृश्य घेण्यासाठी अनेकांनी इच्छा व्यक्त केली होती. त्यासाठी निर्मात्यांनीही तयारी केली होती. पण आता कोरोनानंतर आलेल्या नियमांनुसार या सगळ्या दृश्यांबद्दल नव्याने विचार करावा लागणार आहे.
म्हणून आता या थलैवीमध्ये असे सगळे सीन आता कॉम्प्युटर ग्राफिक्सवर करावे लागणार आहेत. निर्मात्यांनीही तसा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जे नियम संबंधित राज्य सरकार आणि केंद्राने घालून दिले आहेत, त्याचं पालन करण्यासाठी असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे थलैवीमध्ये अशी जी दृश्य दिसतील ती कॉम्प्युटर ग्राफिक्सने बनवलेली असतील हे आता उघड आहे.
Urmila Matondkar | विधानपरिषदेसाठी उर्मिला मातोंडकर यांच्या नावामुळे जुन्या शिवसैनिकांमध्ये नाराजी?