एक्स्प्लोर

'पद्मावती'चं तिकीट काढण्याआधी विमा काढून ठेवा, फेसबुकवरुन धमकी

'पद्मावती’ चित्रपटाला विरोध दिवसेंदिवस तीव्र होत आहे. कोणत्याही परिस्थितीत हा सिनेमाचं प्रदर्शन रोखण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या संघटनांनी कलाकारांसोबत आता प्रेक्षकांनाच लक्ष्य केलं आहे. 'पद्मावती' सिनेमाचं तिकीट काढण्याआधी विमा काढून घ्या, अशी धमकी फेसबुकवरुन देण्यात आली आहे.

मुंबई : 'पद्मावती’ चित्रपटाला विरोध दिवसेंदिवस तीव्र होत आहे. कोणत्याही परिस्थितीत हा सिनेमाचं प्रदर्शन रोखण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या संघटनांनी कलाकारांसोबत आता प्रेक्षकांनाच लक्ष्य केलं आहे. 'पद्मावती' सिनेमाचं तिकीट काढण्याआधी विमा काढून घ्या, अशी धमकी फेसबुकवरुन देण्यात आली आहे. padmavati राजपूत सेनेच्या नावानं सुरु असलेल्या फेसबुक पेजवरुन ही धमकी देण्यात आली आहे.धमकी देणाऱ्या पोस्टमध्ये म्हटलंय की, ‘राजपुतांची तलवार माणसं मोजून डोकी उडवत नाही. त्यामुळं तिकीट काढताना विचार करा. आधी स्वतःचा विमा काढून घ्या.’ दुसरीकडे सिनेमाला विरोध करणाऱ्या संघटनांनी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा शिरच्छेद करणाऱ्याला 5 कोटींचं बक्षीस जाहीर केलं आहे. तर, दीपिकाचे नाक कापून टाकण्याची धमकीही दिली आहे. त्यातच आता थेट प्रेक्षकांनाही फेसबुक पोस्टच्या माध्यमातून धमकी दिल्यामुळं वातावरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे. कोण होती राणी पद्मावती? सिंघलचे राजा गंधर्वसेन यांची कन्या पद्मावती. नितळ… आरस्पानी… आणि मनमोहक… सौंदर्याची खाण. ती इतकी सुंदर होती… की तिला मिळवण्यासाठी बड्या बड्या राजांनी देव पाण्यात ठेवले होते. वडील गंधर्वसेन यांनी पद्मावतीच्या स्वयंवराचे आयोजन केलं. या स्वयंवरासाठी अनेक राजे उपस्थित होते. पण राणी पद्मावतीने चित्तोडचे राजा रावल रतन सिंह यांच्या गळ्यात माळ घातली. मात्र, या दोघांच्या सुखी संसाराला ग्रहण लागलं ते दिल्लीच्या तख्ताचं. पद्मावतीच्या सौंदर्याबाबत दिल्लीचा सुल्तान अल्लाउद्दीन खिलजी ऐकून होता. त्यावर भाळलेल्या अल्लाउद्दीननं थेट चित्तोडवर आक्रमण केलं. पण चित्तोड किल्ल्याच्या सात मजली तटबंदीने खिलजी हैराण झाला. अखेर खिलजीने केवळ पद्मावतीचे मुखदर्शन करण्यासाठी खलिता पाठविला आणि त्यानंतर किल्ल्याचा वेढा काढून घेण्याचं आश्वासन दिलं. पण एखाद्या परपुरुषासमोर आपला चेहरा दाखवणं हा राजपुतांसाठी अपमान होता. तरीही युद्ध आणि रक्तपात टाळण्यासाठी पद्मावती राजी झाली. पण फक्त आरशाद्वारे मुखदर्शनाची अटही घालण्यात आली. पद्मावतीच्या मुखदर्शनासाठी खिलजी किल्ल्यात दाखल झाला आणि तिच्या सौंदर्यावर फिदा झाला. त्याने आपला इरादा बदलला आणि राजा रतन सिंहला कैद केलं. जोपर्यंत पद्मावती आपल्याला शरण येत नाही, तोवर राजाला सोडणार नाही, अशी धमकीही दिली. अखेर पद्मावतीने शरण येण्याची कबुली दाखवली. पण सोबत 700 दासी घेऊन येण्याची अट घातली. पद्मावतीने 700 दासींऐवजी पालखीमध्ये चित्तोडच्या लढवय्या सैनिकांची भर्ती केली. मौका बघून खिलजीच्या छावणीवर हल्ला चढवला आणि राजा रतन सिंह यांची सुटका केली. दगा झालेला पाहून खिलजी चवताळला. घमासान युद्ध सुरु झालं. चित्तोडचा अभेद्य किल्ला मुघलांनी भेदला. पण मुघलांच्या हाती लागण्यापेक्षा किल्ल्यातल्या स्त्रियांनी सती जाण्याचा निर्णय घेतला. राणी पद्मावती यांच्यासमवेत तब्बल 16 हजार महिलांनी सामूहिक चितेमध्ये उडी घेतली यालाच राजस्थानमध्ये जोहार म्हणतात. अशी होती… चित्तोडची स्वाभिमानी राणी… राणी पद्मावती… संबंधित बातम्या ...तर दीपिका पादूकोणचं नाक कापू : करणी सेना ‘पद्मावती’ला कोणीही रोखू शकणार नाही: दीपिका पादूकोण पद्मावती’ वाद : संपूर्ण बॉलिवूड भन्साळींच्या समर्थनार्थ मैदानात ‘पद्मावती’पेक्षा राजस्थानातील महिलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या : शशी थरुर एक दिल.. एक जान.. ‘पद्मावती’तील प्रेम-विरह गीत रीलिज ‘पद्मावती’चा विरोध तीव्र, भन्साळींच्या घरासमोर आंदोलन ‘पद्मावती’च्या याचिकेवर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार दीपिकाचा जबरदस्त लूक, ‘पद्मावती’चं नवं पोस्टर रिलीज रणवीरच्या खिल्जीमुळे दीपिका अस्वस्थ, ब्रेकअपची चर्चा रिलीजआधी ‘पद्मावती’चा विक्रम; ‘बाहुबली’, ‘दंगल’ला मागे टाकलं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacker Update : सैफवरील हल्लेखोर वरळीच्या सिल्कवर्क्स कॅफेमध्ये होता कामाला, इतर कर्मचाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यातSaif Ali Khan Attacker Update : सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचं वरळीतील कोळीवाड्यात वास्तव्य, आरोपीचे शेजारी काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 19 January 2024Anandache Paan ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाकेंशी समकाल आणि समांतर पुस्तकांच्या निमित्त खास संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Embed widget