एक्स्प्लोर

Compass Web Series: 'कंपास' वेब सीरिजची घोषणा; 'या' प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज

नुकताच 'कंपास' (Compass) या वेबसीरिजचा  मुहूर्त सोहळा मुंबईत पार पडला. यावेळी उर्मिला कोठारे, सायली संजीव, ऋतुजा बागवे, पौर्णिमा डे, खुशबू तावडे, सुयश टिळक, संग्राम साळवी, सौरभ गोखले हे उपस्थित होते.

Compass Web Series: ओटीटीवरील वेब सीरिज आणि चित्रपट बघायला अनेकांना आवडते. वेगवेगळ्या विषयांवरील वेब सीरिज आणि चित्रपट ओटीटीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येतात. गेल्या वर्षी 'प्लॅनेट मराठी' या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील प्रेक्षकांना विविध वेब सीरिज बघायला मिळतात. दर्जेदार, राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट, लघुपट, सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या वेबसीरिज असा मनोरंजनाचा सर्वोत्कृष्ट खजिना दिल्यानंतर आता नवीन वर्षात नवीन कॉन्टेन्ट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास प्लॅनेट मराठी सज्ज झाले आहे. वर्षाची सुरुवात प्लॅनेट मराठी सुश्रुत भागवत दिग्दर्शित 'कंपास' (Compass) या वेबसीरिजने करणार आहे. नुकताच या वेबसीरिजचा  मुहूर्त सोहळा मुंबईत पार पडला. यावेळी उर्मिला कानेटकर - कोठारे, सायली संजीव, ऋतुजा बागवे, पौर्णिमा डे, खुशबू तावडे, सुयश टिळक, संग्राम साळवी, सौरभ गोखले, धवल पोकळे, राजेंद्र शिसतकर, गिरीश जोशी, आनंद इंगळे, संजय मोने यांच्यासह निर्माते अक्षय बर्दापूरकर आणि संतोष रत्नाकर गुजराथी उपस्थित होते.

प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, "मागील वर्ष आमच्यासाठी खूप खास होते. प्रेक्षकांच्या आवडीनिवडी विचारात घेऊन आम्ही त्यांच्यासाठी मनोरंजनात्मक कॉन्टेन्ट आणले आणि विशेष म्हणजे ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. आता नवीन वर्षाची सुरुवात आम्ही 'कंपास' या वेबसीरिजच्या चित्रीकरणापासून करत आहोत. येत्या काळात आम्ही अनेक काल्पनिक, अकल्पनिय चित्रपट, वेबसीरिज, लघुकथा घेऊन भेटीला येऊ. 'कंपास' हा खूप वेगळा विषय असून यात कसलेल्या कलाकारांची दमदार फळी आहे. 'कंपास' हे नावाच खूप अपिलिंग असून यात प्रेक्षकांना काहीतरी जबरदस्त क्राईम थ्रिलर पाहायला मिळणार आहे.''

View this post on Instagram
 
A post shared by Planet Marathi प्लॅनेट मराठी (@planet.marathi)

दिग्दर्शक सुश्रुत भागवत म्हणतात, " नवीन वर्षात प्लॅनेट मराठी सोबत नव्यानं पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळणे, ही खूपच आनंदाची बाब आहे. 'कंपास' ही एक क्राईम थ्रिलर आहे, यापेक्षा अधिक मी काहीही सांगणार नाही, हां एवढं मात्र नक्की की अशी वेबसीरीज या आधी मराठीत तुम्ही पाहिली नसेल.''

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Entertainment News Live Updates 23 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prajakta Mali Trimbakeshwar | प्राजक्ता माळीच्या नृत्याला विरोध, वादाचा 'तांडव' Special ReportMalvan| छत्रपतींच्या मालवणमध्ये देशद्रोह्यांचा मुक्काम? भारत-पाक सामन्यानंतर देशविरोधी घोषणाGangster Gaja Marne | गजा मारणेवर कारवाई, नेत्यांमधील कोल्ड वॉर? Special ReportZero Hour Full | गजा मारणेसारख्या प्रवृत्तींना आपली यंत्रणा पाठीशी का घालते? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
Indrajit Sawant : इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
Sushma Andhare On Neelam Gorhe: नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
Embed widget