Entertainment News Live Updates 23 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
KL Rahul Athiya Shetty Wedding : KL राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नाला उरले अवघे काही तास; लग्नाशी संबंधित सर्व अपडेट वाचा
KL Rahul Athiya Shetty Wedding : बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघेही गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अथिया आणि केएल राहुल 23 जानेवारीला सात फेरे घेतील. यासाठी कपलच्या कुटुंबियांनी पूर्ण तयारी केली आहे. अथिया आणि केएल राहुलच्या फंक्शन्सशी संबंधित सर्व माहिती जाणून घेऊयात.
Mazhi Tuzhi Reshimgath : "आपली ही रेशीमगाठ कायम राहणार"; प्रार्थनाने खास पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचे मानले आभार
Mazhi Tuzhi Reshimgath : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazhi Tuzhi Reshimgath) या मालिकेचा आज शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याने चाहते नाराज झाले आहेत. दरम्यान प्रार्थना बेहेरेने (Prarthana Behere) एक खास पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. प्रार्थनाने लिहिलं आहे,"सर्वांचे आभार... मालिका संपत आहे.. पण आपलं नातं नाही...आपली ही रेशीमगाठ कायम राहणार आहे...वर्षानुवर्षे... कारण आम्ही लवकरच काहीतरी नवीन घेवून येऊ... फक्त तुमच्यासाठी... आणि म्हणूनच कोणीतरी म्हटलंय पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त".
Lalit Prabhakar : ललित म्हणतोय "तुझ्या स्टेटसला लाव फोटो माझा"; नेमकं प्रकरण काय?
Lalit Prabhakar Tarri Movie : मैत्रीचे महत्त्व अनन्यसाधारण असते. आपण नेहमी ऐकत आलोय की मैत्री हे अतूट नाते असते, कधी न तुटणारे बंधन असते. अभिनेता ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) आपल्या खास मित्राला ‘तुज्या स्टेटस ला, लाव फोटो माझा’ असं म्हणत फुल ऑन राडा घालणार आहे. आपल्या मैत्रीसाठी ललित काय ‘टर्री’गिरी करणार हे येत्या 17 फेब्रुवारीला ‘टर्री’ (Tarri) या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
Akshay Kumar On PM Modi : मोदी म्हणाले, "नेत्यांनी सिनेमासंदर्भात चुकीची वक्तव्य करु नयेत"; खिलाडी अक्षय कुमारकडून स्वागत, म्हणाला....
Akshay Kumar On PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी नुकतचं त्यांच्या पक्षातील नेत्यांना सिनेमासंदर्भात चुकीचे विधान न करण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान आज 'सेल्फी' (Selfiee) सिनेमाच्या ट्रेलर लॉंच दरम्यान अक्षय कुमारने पंतप्रधानांच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
अक्षय कुमार म्हणाला,"एखाद्या सिनेमासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे सिनेमासाठी सकारात्मक राहणं खूप गरजेचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील ही बाब लक्षात घेतली आहे. रिलीजआधीच सिनेमाला विरोध होणं हे सिनेमाच्या दृष्टीने योग्य नाही. जर चांगल्या सिनेमांची निर्मिती होत असेल तर त्याला विरोध करण्याची गरज नाही. पण मोदींच्या सल्ल्यामुळे तरी हे चित्र बदलेल अशी आशा आहे".
PIFF : 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' ते 'गिकरी'; पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी
Pune International Film Festival : 'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' (Pune International Film Festival) येत्या 2 ते 9 फेब्रुवारी दम्यान पार पडणार आहे. या महोत्सवातील 21 वा 'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' पुणे फिल्म फाऊंडेशन आणि महाराष्ट्र शासनाच्या विद्यमाने 2 ते 9 फेब्रुवारीदरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवातील स्पर्धात्मक विभागातील मराठी सिनेमांची यादी महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी जाहीर केली आहे.
View this post on Instagram
Marathi Movies : मराठी सिनेसृष्टी पुन्हा बहरली! 'वेड' अन् 'वाळवी'वर उमटली प्रेक्षकांच्या पसंतीची मोहोर...
Ved Vaalvi Marathi Movies In Theater : बॉक्स ऑफिसवर (Box Office) सध्या 'वेड' (Ved) आणि 'वाळवी' (Vaalvi) हे दोन सिनेमे धुमाकूळ घालत आहेत. कोरोनानंतर दोन मराठी सिनेमे बॉक्स ऑफिस गाजवण्याची ही पहिलीच वेळ आहे. दोन्ही सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यासोबत कमाईच्या बाबतीतदेखील उजवे ठरले आहेत.
Marathi Movies : मराठी सिनेसृष्टी पुन्हा बहरली! 'वेड' अन् 'वाळवी'वर उमटली प्रेक्षकांच्या पसंतीची मोहोर...
Rakhi Sawant : राखी सावंतची अटकपूर्व जामीनासाठी हायकोर्टात धाव
Rakhi Sawant : राखी सावंतने अटकपूर्व जामीनासाठी हायकोर्टात धाव घेतली आहे. मुंबई सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळल्याच्या निर्णयाला राखीनं हायकोर्टात आव्हान दिलं आहे. शर्लिन चोप्राच्या तक्रारीवरून आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गेल्या आठवड्यात पोलीसांनी राखीचीपोलीस ठाण्यात चौकशी केली होती.
Salman Khan: 'किसी का भाई किसी की जान' चा टीझर 25 जानेवारीला होणार रिलीज
Salman Khan: सलमान खानच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटाचा टीझर 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकतच सलमाननं एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमध्ये सलमाननं लिहिलं, '25 जानेवारी रोजी टीझर पाहा मोठ्या पडद्यावर' या ट्वीटमध्ये सलमाननं त्याचा किसी का भाई किसी की जान या चित्रपटातील लूकचा फोटो देखील शेअर केला.
#KisiKaBhaiKisiKiJaan Teaser ab dekho bade parde par on 25th Jan...@VenkyMama @hegdepooja @IamJagguBhai @bhumikachawlat @boxervijender #AbhimanyuSingh @TheRaghav_Juyal @siddnigam_off @jassiegill @ishehnaaz_gill @palaktiwarii #VinaliBhatnagar @farhad_samji @ShamiraahN pic.twitter.com/pbVSce3xYH
— Salman Khan (@BeingSalmanKhan) January 23, 2023
Pathaan Tickets Price : रिलीजआधीच बॉक्स ऑफिसवर 'पठाण'चा बोलबाला
Shah Rukh Khan Pathaan Movie Tickets Price : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) आगामी 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. एकीकडे या सिनेमाला विरोध होत असताना दुसरीकडे मात्र शाहरुखचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'फर्स्ट डे फर्स्ट शो' पाहण्यासाठी चाहते तब्बल 2100 रुपयांत 'पठाण'चं तिकीट बुक करत आहेत.
View this post on Instagram