एक्स्प्लोर

Mission Chulbul Singham : रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समध्ये सामील नसणार 'चुलबुल पांडे', रोहित शेट्टीकडून सलमान खानच्या चाहत्यांची निराशा

Mission Chulbul Singham Update : रोहित शेट्टीने सलमान खान आणि अजय देवगण यांच्या चित्रपटाबाबत मोठी अपडेट दिली आहे. या अपडेटमुळे 'दबंग' सलमान खानच्या चाहत्यांची निराशा होऊ शकते. 

Salman Khan Ajay Devgn Film : रोहित शेट्टीने सिंघम अगेन चित्रपटात सलमान खानसोबतच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली होती, पण आता समोर आलेल्या बातमीने 'भाईजान'च्या चाहत्यांची निराशा होणार आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीने सिंघम अगेनमध्ये सलमान खानची झलक दाखवल्यापासून चाहते त्याकडे डोळे लावून बसले आहेत. आता चाहते चुलबुल पांडे आणि बाजीराव सिंघमला एकत्र मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. पण, आता रोहित शेट्टीने सलमान खान आणि अजय देवगण यांच्या चित्रपटाबाबत मोठी अपडेट दिली आहे. या अपडेटमुळे 'दबंग' सलमान खानच्या चाहत्यांची निराशा होऊ शकते. 

रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समध्ये सामील नसणार 'चुलबुल पांडे'

रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समधील बहुप्रतिक्षित चित्रपट सिंघम अगेन अलिकडेच रिलीज झाला, ज्याला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला. आता कॉप युनिव्हर्समधील आगामी चित्रपट म्हणून प्रेक्षक सलमान खान आणि अजय देवगण यांना एकत्र पाहण्याची आशा करत आहेत. पण, दिग्दर्शक-निर्माता रोहित शेट्टीने एका मुलाखतीत चुलबुल पांडे आणि सिंघमच्या चित्रपटाबद्दल माहिती दिली आहे. सिंघम अगेन चित्रपटात केलेल्या घोषणेमुळे चुलबुल पांडे आणि बाजीराव सिंघम मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार असल्याचं स्पष्ट झालं आहे, पण हा चित्रपट कॉप युनिव्हर्सचा भाग नसेल. सिंघम अगेन चित्रपटात मिशन सिंघम अगेन (Mission Chulbul Singham) चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती.

रोहित शेट्टीकडून सलमान खानच्या चाहत्यांची निराशा

सलमान खानसोबत मैत्री असूनही चित्रपट बनायला इतका वेळ का लागत आहे, या प्रश्नावर रोहित शेट्टीने उत्तर दिलं आहे. नुकतीच गलाटा इंडियाला एका मुलाखतील रोहितस शेट्टीने सलमान खान आणि अजय देवगणच्या चित्रपटाबद्दल सांगितलं आहे. सलमान खानसोबतच्या चित्रपटाबदद्लच्या प्रश्नावर उत्तर देताना रोहित शेट्टी म्हणाला की, "तुम्हाला योग्य चित्रपटाची गरज आहे. पुढे काय होणार याची तुमच्या योजना, विचार तुमच्या डोक्यात असायला हवा. सिंघम अगेन ही अनेक पात्रांची फक्त ओळख होती. त्या पात्रांचा प्रवास वेगळा असेल".

"हा चित्रपट कोणत्याही युनिव्हर्सचा भाग नसेल"

रोहित शेट्टी पुढे म्हणाला की, "सलमान खानसोबत चित्रपटाबाबत चर्चा नेहमीच होते. 5-6 वर्षांपासून आम्ही जेव्हा कधी भेटतो, तेव्हा हेच सुरु असतं की, चुलबुल आणि सिंघम एकत्र यायला हवेत. चुलबुल आणि सिंघम एकत्र येणार हे आश्चर्यकारक असेल असंही मला वाटलं. पण हो, मग हा एक स्वतंत्र चित्रपट असेल. हा चित्रपट कोणत्याही युनिव्हर्सचा भाग नसेल". हा एक स्वतंत्र चित्रपट असावा, अशी रोहित शेट्टीची इच्छा आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री 19 वर्षांनी लहान बिझनेसनमनला करतेय डेट, बायफ्रेंडसोबतचा कोझी फोटो केला शेअर; नेटकरी म्हणाले...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

AI वर बनवलेला पहिला मराठी चित्रपट; 'मन पिशाच्च' होणार रिलीज, तुंबाडच्या दिग्दर्शकाचा खास प्रयोग
AI वर बनवलेला पहिला मराठी चित्रपट; 'मन पिशाच्च' होणार रिलीज, तुंबाडच्या दिग्दर्शकाचा खास प्रयोग
प्रसिद्ध अभिनेत्रीनं 3 वर्षांच्या संसाराला लावला ब्रेक; बिझनेसमनशी घेतला घटस्फोट, वहिनीच्या पोस्टनं वेधलं लक्ष
प्रसिद्ध अभिनेत्रीनं 3 वर्षांच्या संसाराला लावला ब्रेक; बिझनेसमनशी घेतला घटस्फोट, वहिनीच्या पोस्टनं वेधलं लक्ष
रॅपर बादशाहच्या अडचणीत वाढ; अटकेची टांगती तलवार, पोलिसांना पासपोर्ट जप्त करण्याची मागणी, कारण काय?
रॅपर बादशाहच्या अडचणीत वाढ; अटकेची टांगती तलवार, पोलिसांना पासपोर्ट जप्त करण्याची मागणी, कारण काय?
Bollywood Director Struggle Story: पहिल्याच फिल्मसाठी नॅशनल अवॉर्ड पटकावणारा दिग्दर्शक, कधीकाळी होता रेडियो जॉकी; आता फक्त 3 सिनेमांमधून कमावले 1820 कोटी
पहिल्याच फिल्मसाठी नॅशनल अवॉर्ड पटकावणारा दिग्दर्शक, कधीकाळी होता रेडियो जॉकी; आता फक्त 3 सिनेमांमधून कमावले 1820 कोटी

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा; सीएम फडणवीस म्हणाले, कोल्हापूरच्या विकासाला नवे पंख
कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा; सीएम फडणवीस म्हणाले, कोल्हापूरच्या विकासाला नवे पंख
200 रुपये द्या, सिलेंडर देतो; बीडमधील गॅसटंचाईत ग्राहकांकडून पैशांची लूट, एबीपी माझाचं स्टिंग ऑपरेशन
200 रुपये द्या, सिलेंडर देतो; बीडमधील गॅसटंचाईत ग्राहकांकडून पैशांची लूट, एबीपी माझाचं स्टिंग ऑपरेशन
विश्वचषक ट्रॉफीसह गौतम गंभीर अन् सूर्या सिद्धिविनायक मंदिरात, कर्णधाराने उंदीरमामाच्या कानात काय मागितलं?
विश्वचषक ट्रॉफीसह गौतम गंभीर अन् सूर्या सिद्धिविनायक मंदिरात, कर्णधाराने उंदीरमामाच्या कानात काय मागितलं?
Iran : अमेरिकेनं रशियन तेलाची आयात नको यासाठी महिने घालवले, आता रशियाचं तेल घ्या म्हणून भारतासह जगाला विणवण्या, इराणच्या विदेश मंत्र्यांचं ट्रम्प यांच्या वर्मावर बोट
अमेरिका भारतासह जगाला रशियन तेल खरेदीसाठी विणवण्या करतेय, इराणच्या विदेश मंत्र्यांचा हल्लाबोल
इकडं इराणचा संयुक्त अरब अमिरातीला गर्भित इशारा अन् तिकडं लेबनॉन-इस्रायल युद्ध थांबवण्यासाठी युरोपमधून पहिला आवाज; थेट मध्यस्थीची तयारी दाखवत ठिकाण सांगितलं, तोडगा निघणार?
इकडं इराणचा संयुक्त अरब अमिरातीला गर्भित इशारा अन् तिकडं लेबनॉन-इस्रायल युद्ध थांबवण्यासाठी युरोपमधून पहिला आवाज; थेट मध्यस्थीची तयारी दाखवत ठिकाण सांगितलं, तोडगा निघणार?
पीएम मोदींच्या रॅलीपूर्वी बंगालमध्ये भाजप आणि टीएमसीचे कार्यकर्ते भिडले; एकमेकांवर तुफान दगडफेक
पीएम मोदींच्या रॅलीपूर्वी बंगालमध्ये भाजप आणि टीएमसीचे कार्यकर्ते भिडले; एकमेकांवर तुफान दगडफेक
अमेरिकेचे नेतेही सांगतात, जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उदाहरण
अमेरिकेचे नेतेही सांगतात, जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उदाहरण
Gold Silver Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोने चांदीच्या दरात घसरण कायम, दागिने खरेदीची मोठी संधी, मुंबई- नवी दिल्लीतील दर जाणून घ्या
सोने चांदीच्या दरात घसरण कायम, दागिने खरेदीची मोठी संधी, मुंबई- नवी दिल्लीतील दर जाणून घ्या
Embed widget