![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Christmas Weekend OTT : सिनेरसिकांचा नाताळ होणार मनोरंजक; घरबसल्या 'हे' सिनेमे आणि वेबसीरिज पाहता येणार
OTT : घरबसल्या नाताळ खास करण्यासाठी चांगले सिनेमे आणि वेबसीरिज नक्की पाहा.
![Christmas Weekend OTT : सिनेरसिकांचा नाताळ होणार मनोरंजक; घरबसल्या 'हे' सिनेमे आणि वेबसीरिज पाहता येणार Christmas Weekend OTT Christmas will be interesting You can watch these movies and web series at home Christmas Weekend OTT : सिनेरसिकांचा नाताळ होणार मनोरंजक; घरबसल्या 'हे' सिनेमे आणि वेबसीरिज पाहता येणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/19/899c4f34f0e7bc6f1140e32128a3d6a71671430721348254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Christmas Weekend OTT Films-Web Series : जगभरात नाताळचा उत्साह पाहायला मिळत आहे. आता नाताळचा वीकेंड सिनेरसिकांना घरबसल्या साजरा करता येणार आहे. या आठवड्यात एका पेक्षा एक सिनेमे (Movies) आणि वेबसीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. जाणून घ्या या वीकेंडला कोणते सिनेमे तुम्ही कुठे पाहू शकता...
सिनेमाचं नाव : गोविंदा नाम मेरा (Govinda Naam Mera)
कुठे प्रदर्शित होणार? डिज्नी प्लस हॉटस्टार
कधी प्रदर्शित होणार? 16 डिसेंबर
विकी कौशलचा 'गोविंदा नाम मेरा' (Govinda Naam Mera) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शशांक खेतानने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 16 डिसेंबरला हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. या सिनेमात विकी कौशलसोबत कियारा आडवाणी दिसणार आहे. हा विनोदी सिनेमा प्रेक्षकांचं चांगलचं मनोरंजन करेल.
कोड नेम : तिरंगा (Code Name : Tiranga)
कुठे प्रदर्शित होणार? नेटफ्लिक्स
कधी प्रदर्शित होणार? 14 ऑक्टोबर
परिणीती चोप्रा आणि हार्डी संधू स्टारर 'कोड नेम : तिरंगा' (Code Name : Tiranga) हा सिनेमा 14 ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. ऋभू दासगुप्ताने या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. आता हा सिनेमा 16 डिसेंबरला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे हा सिनेमा सिनेमागृहात पाहायचा राहून गेला असेल तर आता घरबसल्या पाहता येणार आहे.
अ स्टॉर्म फॉर क्रिसमस (A Storm For Christmas)
कुठे प्रदर्शित होणार? नेटफ्लिक्स
कधी प्रदर्शित होणार? 16 डिसेंबर
'अ स्टॉर्म फॉर क्रिसमस' (A Storm For Christmas) ही वेबसीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीला ही सीरिज चांगलाच धुमाकूळ घालणार आहे. 16 डिसेंबरला ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
इंडियन प्रीडेटर : बीस्ट ऑफ बैंगलोर
कुठे प्रदर्शित होणार? नेटफ्लिक्स
कधी प्रदर्शित होणार ? 20 जुलै
'इंडियन प्रीडेटर : बीस्ट ऑफ बैंगलोर'चे तिन्ही सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. तेव्हापासून या सीझनच्या चौथ्या पर्वाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. आता ही वेबसीरिज 16 डिसेंबरला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. सत्य घटनांवर आधारित या वेबसीरिजची चाहत्यांना उत्सुकता आहे.
विचर्स बल्ड : ओरिजिन (Witcher : Blood Origin)
कुठे प्रदर्शित होणार? नेटफ्लिक्स
कधी प्रदर्शित होणार? 25 डिसेंबर
'विचर्स बल्ड : ओरिजिन' या सीरिजमध्ये एका वेगळ्या विषयावर भाष्य करण्यात आले आहे. ही वेबसीरिज 25 डिसेंबरला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षक पाहू शकतात.
संबंधित बातम्या
IMDb Top Indian Web Series: 'पंचायत' ते 'दिल्ली क्राइम'; 2022 च्या टॉप 10 वेब सीरीजची यादी IMDb कडून जाहीर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)