एक्स्प्लोर
Maharashtra Politics: 'गृहखातं मंत्रालयातून चालतंय की BJP कार्यालयातून?', रोहित पवारांचा सरकारला संतप्त सवाल
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हे दाखल केल्याबद्दल सरकारवर जोरदार टीका केली आहे. 'गृहखातं मंत्रालयातून चालतंय की भाजपाच्या कार्यालयातून?', असा संतप्त सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला. त्यांनी भाजपच्या मूक मोर्चाला परवानगी होती का, असा प्रश्न विचारत सरकार दुजाभाव करत असल्याचा आरोप केला. भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्यावर गुन्हा का दाखल केला नाही, असेही ते म्हणाले. यासोबतच, आधारकार्डचा डेमो दाखवल्याप्रकरणी माझ्यावर गुन्हा दाखल झाला होता, याची आठवण करून देत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. पवार यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















