IMDb Top Indian Web Series: 'पंचायत' ते 'दिल्ली क्राइम'; 2022 च्या टॉप 10 वेब सीरीजची यादी IMDb कडून जाहीर
आता IMDb नं त्यांच्या 2022 मधील टॉप-10 वेब सीरिजची (Web Series) यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये 7 किंवा त्याहून अधिक रेटिंग मिळालेल्या आणि किमान 10,000 मते मिळालेल्या वेब सीरिजचा समावेश आहे.
IMDb Top Indian Web Series: ओटीटीवरील (OTT) विविध विषयांवर आधारित असणाऱ्या वेब सीरिजला (Web Series) प्रेक्षकांची पसंती मिळते. 2022 मध्ये अनेक वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस आला. या वेब सीरिज अनेकांनी बिंच वॉच केल्या. आता IMDb नं त्यांच्या 2022 मधील टॉप-10 वेब सीरिजची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये 1 जानेवारी ते 7 नोव्हेंबर दरम्यान देशात प्रदर्शित झालेल्या सर्व वेब सीरीजमधील 7 किंवा त्याहून अधिक रेटिंग मिळालेल्या आणि किमान 10,000 मते मिळालेल्या वेब सीरिजचा समावेश या यादीमध्ये करण्यात आला आहे. पाहा या वेब सीरिजची यादी-
IMDb 2022 मधील टॉप 10 वेब सीरीजची यादी-
- पंचायत
- दिल्ली क्राइम
- रॉकेट बॉयज
- ह्यूमन
- अपहरण
- गुल्लक
- एनसीआर डेज
- अभय
- कँपस डायरी
- कॉलेज रोमान्स
अभिनेत्री शेफाली शहा यांच्या दोन वेब सीरिजचा यादीत समावेश
अभिनेत्री शेफाली शाहनं या वर्षी नेटफ्लिक्सवरील 'डार्लिंग्स' या हिट चित्रपटामध्ये काम केले. IMBd नं जाहीर केलेल्या 2022 मधील टॉप-10 वेब सीरिजच्या यादीमध्ये शेफालीच्या दोन वेब सीरिजचा समावेश आहे. 'दिल्ली क्राइम' व्यतिरिक्त, शेफाली शाहच्या 'ह्यूमन' या वेब सीरिजचं नाव देखील IMDb टॉप 10 वेब सीरीजच्या यादीत समाविष्ट आहे.
View this post on Instagram
2022 मध्ये अनेक वेब सीरिजचा दुसरा सीरिज प्रदर्शित झाला. पंचायत, दिल्ली क्राइम आणि गुल्लक या सीरिजचे दुसरे भाग प्रेक्षकांच्या भेटीस आले
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: