एक्स्प्लोर

Ganesh Kale Pune: पाठलाग केला, अडवून चार गोळ्या झाडल्या, डोक्यात कोयत्याने वार; गणेश काळेच्या हत्येनंतर आरोपींनी एक दुचाकी तिथंच टाकली अन्... व्हिडीओ समोर

Ganesh Kale Pune: पोलिसांनी पेट्रोल पंप व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजदेखील ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश काळे हा रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करतो.

पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरातील गणेश काळे (Ganesh Kale Murder) या रिक्षा चालकाच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. आंदेकर-कोमकर टोळीयुद्धातून (Andekar Komkar Gang War) गणेश काळेची हत्या झाली असल्याची माहिती आहे. हत्या केल्यानंतर चारही आरोपी पळून गेले होते. या चारपैकी एक आरोपी हा कृष्णा आंदेकरचा निकटवर्तीय असल्याची माहिती समोर आहे. गणेश काळे हा कोमकर गँगचा सदस्य असलेल्या समीर काळेचा भाऊ आहे. समीर काळे हा आयुष कोमकर हत्या प्रकरणात सध्या तुरुंगात आहे. त्यामुळेच गणेश काळेची हत्या करण्यात आली का याचा तपास आता पुणे पोलीस करत आहेत. अटक करण्यात आलेल्या या चार आरोपींपैकी एक आरोपी हा रील स्टार आहे. तर या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. गणेश काळेची हत्या करुन पळून जाताना मारेकरी दिसतायत. हातात शस्त्र आहे हा घटना एका सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे. पोलिसांनी पेट्रोल पंप व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजदेखील ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश काळे हा रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करतो. तो दुपारी तीनच्या सुमारास येवलेवाडीतून खडीमशीन चौकाकडे येत

Ganesh Kale Murder: नेमकं काय प्रकरण?

काल (शनिवारी, ता १) दुपारच्या वेळी वर्दळ असलेल्या ठिकाणी एका ३२ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. या घटनेने पुणे शहर पुन्हा हादरले. पुण्यातील खडी मशीन चौकातून सासवडकडे जाणाऱ्या बोगदेव घाटातील रस्त्यावर असलेल्या एका पेट्रोलपंपावरसमोरच हत्या करण्यात आली. गणेश काळे असे हत्या करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे. तो रिक्षा चालक होता. गणेश काळे हा वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी समीर काळे याचा सख्खा भाऊ आहे. वनराज आंदेकरच्या हत्येसाठी शस्त्र पुरवल्याचा आरोप समीर काळे याच्यावर आहे. पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी याप्रकरणी सांगितले की, दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास गणेश काळे हा रिक्षा घेऊन खडी मशीन चौकाच्या दिशेने निघाला होता. त्याचवेळी दोन दुचाकीवरून काही जण त्याचा पाठलाग करत आले. चौघांनी जवळून गणेश काळेवर गोळ्या झाडल्या. चार राऊंड फायर करण्यात आले. 

गणेश काळे जखमी झाल्यानंतर त्यानंतर त्याच्या डोक्यात कोयत्याने दोन वार करण्यात आले. यात कोयत्याच्या हल्ल्याने त्याच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या. गणेश हा येवलेवाडीत राहत होता. तो खडीमशीन चौकाकडे येत होता. पेट्रोलपंपाजवळ गणेशची रिक्षा अडवली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे त्याला काहीच करता आलं नाही. त्याला सावरण्याची संधी मिळण्यापूर्वीच दोघांनी त्याच्यावर गोळीबार सुरु केला. गणेश काळेला चार गोळ्या लागल्या. मानेत, छातीत व पोटात गोळ्या घुसल्या. त्यावंतर तो तो जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. तो खाली कोसळल्यानंतर दोन हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केले. ही हत्या गँगवारमधून करण्यात आल्याचं बोललं जात आहे. ज्या पद्धतीने माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची हत्या करण्यात आली होती, तो पॅटर्न गणेश काळेच्या हत्येसाठी वापरण्यात आला आहे. वनराज आंदेकरवर आधी गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, त्यानंतर कोयत्याने वार केले गेले होते. सप्टेंबर महिन्यात पुण्यातील नाना पेठमध्ये वनराजच्या भाच्याची आयुष कोमकरची हत्या करण्यात आली होती. माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला म्हणून ही हत्या करण्यात आली होती, असे म्हटले जाते. आता गणेश काळेच्या हत्येने आंदेकर आणि कोमकर टोळी युद्धाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

Ganesh Kale Murder: टोळ्यांमधील वैर वाढलं

गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास झालेल्या आयुष कोमकर खून प्रकरणाने शहरात खळबळ उडाली होती. त्या घटनेतही आंदेकर टोळीने वर्चस्व आणि बदला म्हणून हल्ला केला होता. आता गणेश काळेचा खून घडल्याने या टोळ्यांतील वैर आणि सूडभावनेने पुन्हा डोकं वर काढल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान आंदेकर टोळी, कोमकर आणि सोम्या गायकवाड टोळी सध्या कारागृहात आहेत. दोन्ही टोळ्यांना मकोका लागला आहे तर दुसरीकडे बंडू ऊर्फ सूर्यकांत आंदेकरचे आर्थिक साम्राज्य पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari : मुंबई ते बंगळुरू 5 तासांत तर पुणे ते छत्रपती संभाजीनगर 2 तासांत प्रवास, गडकरींचा मास्टर प्लॅन!
मुंबई ते बंगळुरू 5 तासांत तर पुणे ते छत्रपती संभाजीनगर 2 तासांत प्रवास, गडकरींचा मास्टर प्लॅन!
Pune Crime News: स्वातंत्र्यदिनी सिंहगडावर पर्यटकांची तुफान गर्दी; दोन गटांत तुंबळ हाणामारी, एकानं भाला दगड उचलला अन्...; नेमकं काय घडलं?
स्वातंत्र्यदिनी सिंहगडावर पर्यटकांची तुफान गर्दी; दोन गटांत तुंबळ हाणामारी, एकानं भाला दगड उचलला अन्...; नेमकं काय घडलं?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Embed widget