एक्स्प्लोर
Mega Block Update: महिला विश्वचषक फायनलसाठी हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक रद्द, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय.
मुंबईच्या हार्बर मार्गावरील (Harbour Line) मेगाब्लॉक (Megablock) महिला विश्वचषक क्रिकेट फायनलमुळे (Women's World Cup Final) रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला (Dr. Swapnil Nila) यांनी दिली. मध्य रेल्वेने स्पष्ट केले की, 'हार्बर मार्गावरच्या गाड्या रविवारच्या वेळापत्रकानुसारच धावतील'. हा मेगाब्लॉक कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान नियोजित होता, परंतु नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर (DY Patil Stadium) होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी क्रिकेटप्रेमींची गैरसोय होऊ नये म्हणून तो रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. तथापि, मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील मेगाब्लॉक नियोजित वेळापत्रकानुसार कायम राहील, त्यामुळे प्रवाशांनी घराबाहेर पडण्यापूर्वी रेल्वेचे वेळापत्रक तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
महाराष्ट्र
शेत-शिवार
क्रिकेट
Advertisement
Advertisement

















