Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस्
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
LIVE

Background
Maharashtra Live Blog Updates: कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते सपत्नीक विठुरायाची शासकीय महापुजा संपन्न झाली. यावेळी दर्शन रांगेतील पहिले मानाचा वारकरी दांपत्य उपमुख्यमंत्र्यांसमवेत महापूजेमध्ये सहभागी झाले होते. नांदेडच्या हिमायतनगरमधील पोटा गावाचे रामराव वालेगावकर आणि सौ.सुशिलाबाई वालेगावकर हे कार्तिकी एकादशीनिमित्त मानाचे वारकरी ठरले. मागील २० वर्षांपासून ते वारी करतायत, मंदिर समितीच्या वतीने शिंदेंच्या हस्ते तुळशीची माळ घालून त्यांचा सत्कार करण्यात आलाय. दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे देखील पत्नी आणि मुलासह या शासकीय महापूजेच्या वेळी उपस्थित होते. तर मंत्री भरत गोगावले, जयकुमार गोेरे देखील यावेळी उपस्थित होते. तर यंदा पहिल्यांदाच जिल्हा परिषद शाळेचे दोन शाळकरी मुलं पुजेत सहभागी झाले होते. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
मुंबई पुढील 5 दिवस पावसाळी वातावरण; पुढील दोन दिवस हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज
मुंबई पुढील ५ दिवस पावसाळी वातावरण
मुंबईत पुढील दोन दिवस हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज
बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने राज्यात काही ठिकाणी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस
मराठवाड्यात आज आणि उद्या विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
Pune News : कोंढवा गणेश काळे हत्या प्रकरण; गँगस्टर बंडू आंदेकर आणि कृष्णा आंदेकर यांच्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल
कोंढवा गणेश काळे हत्या प्रकरण
गँगस्टर बंडू आंदेकर आणि कृष्णा आंदेकर यांच्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल
कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
टोळी युद्धातूनच गणेश काळे याची हत्या
गुन्ह्यातील आरोपी बंडू आंदेकर,कृष्णा आंदेकर,आमिर खान ,मयूर वाघमारे ,स्वराज वाडेकर ,अमन शेख ,अरबाज पटेल
इतर दोन अल्पवयीन आरोपींची गुन्ह्यात नावे
आज या हत्या प्रकरणातील आरोपींना दुपारी कोंढवा पोलीस कोर्टात हजर करणार























