एक्स्प्लोर

Chiranjeevi : चिरंजीवीच्या 'मेगा 157'चं पोस्टर आऊट! मेगास्टारने वाढदिवशी चाहत्यांना दिली खास भेट

Mega 157 : चिरंजीवीचा (Chiranjeevi) 'मेगा 157' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Chiranjeevi Mega 157 Poster Out : दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी (Chiranjeevi) आज आपला 68 वा वाढदिवस साजरा करत आहेत. आजवर अभिनेत्याने एका पेक्षा एक सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्यांचे अनेक सिनेमे सुपरहिट ठरले आहेत. आज अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आगामी 'मेगा 157' (Mega 157) या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे.

चिरंजीवीच्या 'मेगा 157'चं पोस्टर आऊट! (Mega 157 Poster Out)

चिरंजीवीच्या 'मेगा 157'चं पोस्टर आऊट झालं आहे. पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत असून प्रेक्षकांची सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. 'मेगा 157' या सिनेमाचे निर्मिती यूवी क्रिएशन्सच्या बॅनरअंतर्गत होत आहे. त्यांनी या सिनेमाचं पोस्टर आऊट करत अभिनेत्याला वाढदिवसाची भेट दिली आहे. या पोस्टरने चाहत्यांसह नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

'मेगा 157' हा चिरंजीवी यांच्या करिअरमधला सर्वात मोठा बिग बजेट सिनेमा असणार आहे. वशिष्ठ (Vassishta) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून मेगास्टार चिरंजीवीचा एक वेगळा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. वामसी, विक्रम आणि प्रमोद या सिनेमाची निर्मिती करणार आहेत. अद्याप या सिनेमाची स्टारकास्ट समोर आलेली नाही. 

फँटसी वर्ल्डवर आधारित असणार 'मेगा 157'

चिरंजीवी यंदाचा वाढदिवस नातीसोबत साजरा करणार आहे. चिरंजीवीचा 'मेगा 157' हा सिनेमा फँटसी वर्ल्डवर आधारित असणार आहे. 'मेगा 157' हा सिनेमा जगभरात प्रदर्शित होणार आहे.  गेल्या काही दिवसांत अनेक दाक्षिणात्य सिनेमांचा जगभरातील बॉक्स ऑफिसवर बोलबाला पाहायला मिळाला आहे. यात जेलर, केजीएफ 2, पीएस 2 आणि कांतारा या सिनेमांचा समावेश आहे. 

'भोला शंकर' या सिनेमात चिरंजीवी शेवटचा दिसला होता. या सिनेमात तमन्ना भाटिया, वेनेला किशोर आणि किरही सुरेशसोबत स्क्रीन शेअर करताना तो दिसला. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात कमी पडला. मेहर रमेशने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. आता चिरंजीवीच्या आगामी 'मेगा 157' सिनेमाची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. या सिनेमात ते कोणासोबत स्क्रीन शेअर करणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

संबंधित बातम्या

Chiranjeevi : दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवीच्या 'भोला शंकर'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज! प्रेक्षकांना आता सिनेमाची उत्सुकता

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ढगाळ हवामानाचा अमित शाह-एकनाथ शिंदेंना फटका, हेलिकॉप्टर रद्द करून बाय रोड मुंबईकडे रवाना
ढगाळ हवामानाचा अमित शाह-एकनाथ शिंदेंना फटका, हेलिकॉप्टर रद्द करून बाय रोड मुंबईकडे रवाना
Maharashtra Lok Sabha Election Voting 2024: चौथ्या टप्प्यासाठी 5 वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; शिरुरमध्ये 43.89 टक्के, तर औरंगाबादमध्ये 54.02 टक्के मतदान
चौथ्या टप्प्यासाठी 5 वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; शिरुरमध्ये 43.89 टक्के, तर औरंगाबादमध्ये 54.02 टक्के मतदान
Photos: वडाळ्यात टॉवर कोसळला, चारचाकी गाड्या अडकल्या; वीज टॉवरवरही उडाला भडका
Photos: वडाळ्यात टॉवर कोसळला, चारचाकी गाड्या अडकल्या; वीज टॉवरवरही उडाला भडका
Gaurav More : रानू मंडल, फिल्टरपाड्याचा गुंड,स्वत:ला महान समजायला लागलाय; हिंदी रिऍलिटी शोमुळे गौरव मोरे ट्रोल,अभिनेत्यानेही दिलं जशास तसं उत्तर 
रानू मंडल, फिल्टरपाड्याचा गुंड,स्वत:ला महान समजायला लागलाय; हिंदी रिऍलिटी शोमुळे गौरव मोरे ट्रोल,अभिनेत्यानेही दिलं जशास तसं उत्तर 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Mumbai Rain Tree Collapsed : अवघ्या एका फुटावर कोसळलं झाड, चिमुकले थोडक्यात बचावले! ABP MajhaGhatkopar Hoarding Video : मर गया...मर गया, घाटकोपरमधील होर्डिंग कोसळतानाचा LIVE व्हिडीओABP Majha Headlines : 05 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सGhatkopar Hoarding Video : मुंबईत महाकाय होर्डिंग कोसळलं, 80 गाड्या दबल्याची माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ढगाळ हवामानाचा अमित शाह-एकनाथ शिंदेंना फटका, हेलिकॉप्टर रद्द करून बाय रोड मुंबईकडे रवाना
ढगाळ हवामानाचा अमित शाह-एकनाथ शिंदेंना फटका, हेलिकॉप्टर रद्द करून बाय रोड मुंबईकडे रवाना
Maharashtra Lok Sabha Election Voting 2024: चौथ्या टप्प्यासाठी 5 वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; शिरुरमध्ये 43.89 टक्के, तर औरंगाबादमध्ये 54.02 टक्के मतदान
चौथ्या टप्प्यासाठी 5 वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; शिरुरमध्ये 43.89 टक्के, तर औरंगाबादमध्ये 54.02 टक्के मतदान
Photos: वडाळ्यात टॉवर कोसळला, चारचाकी गाड्या अडकल्या; वीज टॉवरवरही उडाला भडका
Photos: वडाळ्यात टॉवर कोसळला, चारचाकी गाड्या अडकल्या; वीज टॉवरवरही उडाला भडका
Gaurav More : रानू मंडल, फिल्टरपाड्याचा गुंड,स्वत:ला महान समजायला लागलाय; हिंदी रिऍलिटी शोमुळे गौरव मोरे ट्रोल,अभिनेत्यानेही दिलं जशास तसं उत्तर 
रानू मंडल, फिल्टरपाड्याचा गुंड,स्वत:ला महान समजायला लागलाय; हिंदी रिऍलिटी शोमुळे गौरव मोरे ट्रोल,अभिनेत्यानेही दिलं जशास तसं उत्तर 
सावधान! 'या' जिल्ह्यात कोसळणार सर्वात जास्त पाऊस, पंजाबराव डखांचा अंदाज काय?
सावधान! 'या' जिल्ह्यात कोसळणार सर्वात जास्त पाऊस, पंजाबराव डखांचा अंदाज काय?
Sunny Leone Net Worth : ना आयटम साँग, ना कोणता चित्रपट; तरीही 'या' अभिनेत्रीकडे आहे 115 कोटींची संपत्ती
ना आयटम साँग, ना कोणता चित्रपट; तरीही 'या' अभिनेत्रीकडे आहे 115 कोटींची संपत्ती
मुंबईत सोसाट्याचा वारा, रस्ते, रेल्वे, मेट्रो, विमान, सगळी वाहतूक कोलमडली, मुलुंडजवळ ओव्हरहेड वायरवर खांब कोसळला!
मुंबईत सोसाट्याचा वारा, रस्ते, रेल्वे, मेट्रो, विमान, सगळी वाहतूक कोलमडली, मुलुंडजवळ ओव्हरहेड वायरवर खांब कोसळला!
Congress on PM Modi : अडवाणी, मुरली मनोहर जोशीप्रमाणे मोदींनाही 75 वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसच्या बड्या नेत्याचा सवाल
अडवाणी, जोशींप्रमाणे पीएम मोदींनाही 75 वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसचा सवाल
Embed widget