एक्स्प्लोर

Chiranjeevi : दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवीच्या 'भोला शंकर'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज! प्रेक्षकांना आता सिनेमाची उत्सुकता

Bholaa Shankar : चिरंजीवीच्या (Chiranjeevi) आगामी 'भोला शंकर' या सिनेमाचा ट्रेलर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Chiranjeevi Bholaa Shankar Trailer Out : दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी (Chiranjeevi) सध्या त्याच्या आगामी 'भोला शंकर' (Bholaa Shankar) या सिनेमामुळे चर्चेत आहे. लवकरच हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून आता या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. 'भोला शंकर'चा ट्रेलर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ट्रेलर रिलीज झाल्याने प्रेक्षकांची सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

'भोला शंकर' या सिनेमात कीर्ती सुरेश आणि तमन्ना भाटिया मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये चिरंजीवीचा अॅक्शन मोड पाहायला मिळत आहे. धमाकेदार ट्रेलरनंतर प्रेक्षकांना आता सिनेमाची उत्सुकता आहे. हा पॅन इंडिया सिनेमा असल्याने निर्माते वेगवेगळ्या भाषांमध्ये सिनेमा रिलीज करणार आहेत. 

'भोला शंकर' कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला? (Bholaa Shankar Released Date)

'भोला शंकर' या मनोरंजनात्मक सिनेमात चिरंजीवीचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली असून हा सिनेमा 11 ऑगस्ट 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात यशस्वी होईल असे म्हटले जात आहे. 15 ऑगस्टच्या सुट्टीचा सिनेमाच्या कमाईवर चांगला परिणाम होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यास 'भोला शंकर' सज्ज आहे.  

View this post on Instagram
 
A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

तामिळ सिनेमाचा रिमेक 'भोला शंकर' 

'भोला शंकर' या सिनेमात चिरंजीवीसह कीर्ती सुरेश (Keerthy Suresh) आणि तमन्ना भाटियादेखील (Tamannaah Bhatia) महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमाती कीर्ती सुरेश चिरंजीवीच्या बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहे. 'भोला शंकर' हा सिनेमा 'वेदलम' या तामिळ सिनेमाचा अधिकृत तेलुगू रिमेक आहे. 'वेदमल' या सिनेमात दाक्षिणात्य सुपरस्टार अजीत कुमार, लक्ष्मी मेनन आणि श्रृती हासन महत्त्वाच्या भूमिकेत होते.

चिरंजीवीचा डॅशिंग लूक 

'भोला शंकर' या सिनेमाची घोषणा ऑगस्ट 2021 मध्ये करण्यात आली होती. हैदराबादमध्ये या सिनेमाचं शूटिंग झालं आहे. प्रेक्षकांना या सिनेमात अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. या सिनेमात चिरंजीवीचा डॅशिंग लुक पाहायला मिळणार आहे. आता चिरंजीवीचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहे. मेहर रमेशने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. आता चिकंजीवीच्या 'भोला शंकर' या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे.

संबंधित बातम्या

Bholaa Shankar First look : महाशिवरात्रीला प्रेक्षकांच्या भेटीला आला 'भोला शंकर'मधील चिरंजीवीचा लूक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sushma Andhare on Raj Thackeray : राज ठाकरे सुपाऱ्या वाजवतात, सुषमा अंधारेंचा जोरदार हल्लाबोलABP Majha Headlines : 11 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech Thane Sabha : फोडाफोडी, शरद पवार ते उद्धव ठाकरे, सभेत राज ठाकरे बरसलेTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 11 PM: 12 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
Embed widget