एक्स्प्लोर

Gaurav More : रानू मंडल, फिल्टरपाड्याचा गुंड,स्वत:ला महान समजायला लागलाय; हिंदी रिऍलिटी शोमुळे गौरव मोरे ट्रोल,अभिनेत्यानेही दिलं जशास तसं उत्तर 

Gaurav More Trolling : महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम सोडल्यानंतर गौरव मोरे हिंदी रिऍलिटी शोमुळे प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. पण या कार्यक्रमामुळे गौरव ट्रोल झाल्याचंही पाहायला मिळालं आहे. 

Gaurav More Trolling : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi HasyaJatra) या कार्यक्रमातून घराघरात पोहचलेला फिल्टरपाड्याचा गौरव मोरे (Gaurav More) हा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. त्याच्या विनोदाच्या टायमिंगमुळे आणि अभिनयामुळे त्याने प्रेक्षकांची मनं जिंकलीत. पण आता गौरवने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून बाहेर पडून हिंदी रिऍलिटी शोकडे आपला मोर्चा वळवला आहे. तो सध्या सोनी टिव्हीवरील मॅडनेस मचाऐंगे या कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असल्याचं पाहायला मिळतंय. या कार्यक्रमाचे अनेक व्हिडिओ गौरव सोशल मीडियावरुन शेअर करत असतो. अशाच एक व्हिडिओवर एका नेटकऱ्याने गौरवला ट्रोल केलं आहे. तर गौरवनेही या नेटकऱ्यांना जशास तसं उत्तर दिल्याचं पाहायला मिळतंय. 

गौरवच्या एका व्हिडिओवर कमेंट करत त्याला रानू मंडल म्हटलंय. त्याचप्रमाणे त्याचा फिल्टरपाड्याचा गुंड असा देखील उल्लेख करण्यात आलाय. यावर गौरवनेही जशास तसं उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं आहे. तसेच त्याच्या काही चाहत्यांनी त्याला अशा लोकांना उत्तर देण्याची गरज नसल्याचं म्हटलंय. सध्या गौरव मोरेला बरंच ट्रोलिंगला सामोरं जावं लागत असल्याचं पाहायला मिळतंय. 

फिल्टरपाड्याचा गौरव मोरे ट्रोल

एका नेटकऱ्याने गौरवच्या पोस्टवर कमेंट करत त्याचा उल्लेख फिल्टरपाड्याचा गुंड असा केला आहे. यावर त्या नेटकऱ्याने म्हटलं की, 'राणू मोंडल झालाय बिचारा गौरव , fame मिळालं आणि स्वतःला महान समजायला लागला त्याला वाटलं online fans त्याचे movies बघतील , shows चा trp वाढवतील पण प्रत्यक्षात वेगळच होताना दिसतंय आणि पुढे पण दिसत राहणार आणि एका point ला सगळं हातातून जाणार चांगला actor होता म्हणून काय ते वाईट वाटतं असे थुक्रट विनोद मारताना बघून , भोजने चा पण तसंच झालं , नशिबात जे लिहिलंय ते होणारच.' 

यावर गौरवनेही या नेटकऱ्याला जशास तसं उत्तर दिलं आहे. त्यावर गौरवने म्हटलं की, 'आधी स्वत:च्या अकाऊंटवरुन बोला मग आमच्याबद्दल बोला. पुढे त्या नेटकऱ्याने म्हटलं की, मग हे अकाउंट कोणाचा आहे ? स्वतःच्या account ने म्हणजे नक्की काय असत ? स्वतःचा नाव mentioned असलेलं account? म्हणजे नाव बघून reply देणार कि खरा photo बघून त्यावर comment करणार ?' यावर गौरवच्या एका चाहत्याने अशा लोकांना उत्तर न देण्याचा सल्ला गौरवला दिला. त्यावरही त्या नेटकऱ्याने कमेंट् केली आहे. त्याने म्हटलं की, 'अरे लेका कोणाच्या बाजूने बोलतोयस तू नक्की ? माझ्या कि महाराज गौरवादित्य ?मराठी चांगल हे माझ आहे म्हणणं आणि तू स्वतःच बोलतोयस हिंदी काहीच नाही मराठी पुढे मग मी judge करणारच ना जर हा मराठी पेक्षा हिंदी ला महत्व देत असेल तर , बच्ची बच्ची वाला फिल्टरपाड्याचा गुंड.' 

'स्वत:च्या कुटुंबासोतही असंच बोलता का?'

'अहो फुकट कमेंट आहे म्हणून काहीही बोलायचं नसतं. घरी पण स्वतःच्या कुटुंबाबरोबर असंच बोलता का? स्वतःचा फोटो ठेवायला हिंमत लागते जी आपल्यात नाहीये. राहिला प्रश्न गुंडाचा तर कधी वेळ मिळाला तर चकर मारा फिल्टरपाड्याला सगळे समज-गैरसमज दूर होतील आणि हो स्वतःचा फोटो लावून बड्या बड्या बाता मारा कळलं का?' असं म्हणत गौरवने पुन्हा त्या ट्रोलरला चोख उत्तर दिलं आहे.  यावर त्या नेटकऱ्याने म्हटलं की, 'मुळात तुमच्या सारखं दिसणारा व्यक्ती एवढा का मागे आहे कळत नाही चेहरा बघण्याच्या ? हिम्मत का लागते स्वतःचा फोटो ठेवायला ? काही लोकांना नाही आवडत स्वतःचे फोटो लावायला त्यात अगदी हिम्मत नाही वगरे असा बालिश विचार मी तरी नाही केला अजून आणि फिल्टरपाडा अस्वछ आहे area sorry मला allergy होईल पण मी मान्य करतो तू तिथला hero अशील no doubt' 

या कमेंटवॉरमध्ये अनेकांनी सहभागी होत, गौरवच्या बाजूने त्या नेटकऱ्याला चांगलेच खडेबोल सुनावल्याचंही पाहायला मिळालंय. त्यामुळे सध्या गौरव मोरे हा ट्रोल जरी होत असला तरी तो त्या ट्रोलर्सना चोख उत्तर दिल्याचं पाहायला मिळतंय. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial)

ही बातमी वाचा : 

Suyash Tilak : 'तीन तास वेगवेगळ्या बुथवर शोधाशोध केली पण...', सुयश टिळकलाही नाही बजावता आला मतदानाचा हक्क, अभिनेत्याने व्यक्त केली तीव्र नाराजी 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sudhir Mungantiwar : मंत्रिमंडळातून का डावललं? सुधीर मुनगंटीवार म्हणाले, तुमच्या मोबाईलवर तुमचा नंबर डायल करा, लागतो का?  
मंत्रिमंडळातून का डावललं? सुधीर मुनगंटीवार म्हणाले, तुमच्या मोबाईलवर तुमचा नंबर डायल करा, लागतो का?  
Vijay Mallya : विजय माल्ल्याला दणका, संपत्तीचा लिलाव करुन बँकांना 14000 कोटी दिले, निर्मला सीतारमण यांच्याकडून आकडेवारी जाहीर
विजय  माल्ल्याला दणका, संपत्ती विकून बँकांची थकबाकी भरली, निर्मला सीतारमण यांच्याकडून आकडेवारी जाहीर
Suhas Kande: छगन भुजबळांनी कितीही ढोंग केले तरी त्यांच्यात राष्ट्रवादी पक्ष सोडण्याची हिंमत नाही: सुहास कांदे
ढोंगी, गद्दार, ओरिजनल भुजबळ असाल तर..., सुहास कांदे छगन भुजबळांना काय काय म्हणाले?
Ravi Ashwin : वेळ, मैदान, जागा अन् धक्का सुद्धा तोच! जे 10 दहा वर्षांपूर्वी धोनीनं केलं तेच आश्विननं शांततेत केलं! त्या योगायोगाची रंगली चर्चा
वेळ, मैदान, जागा अन् धक्का सुद्धा तोच! जे 10 दहा वर्षांपूर्वी धोनीनं केलं तेच आश्विननं शांततेत केलं! त्या योगायोगाची रंगली चर्चा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sunil Tatkare PC FULL : जनतेनं संजय राऊतांना त्यांची जागा दाखवली - सुनील तटकरेAjit Pawar Nagpur : दोन दिवसांनंतर अजित पवार आज सभागृहात जाणारAmol Mitkari Nagpur : अजित पवार आणि शशिकांत शिंदेंच्या भेटीवर अमोल मिटकरी काय म्हणाले?Suresh Dhas Meet Ajit Pawar:त्या 6-7 जणांचा आका कोण आहे? त्या आकांचा आका कोण?धस यांचा निशाणा कुणावर?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sudhir Mungantiwar : मंत्रिमंडळातून का डावललं? सुधीर मुनगंटीवार म्हणाले, तुमच्या मोबाईलवर तुमचा नंबर डायल करा, लागतो का?  
मंत्रिमंडळातून का डावललं? सुधीर मुनगंटीवार म्हणाले, तुमच्या मोबाईलवर तुमचा नंबर डायल करा, लागतो का?  
Vijay Mallya : विजय माल्ल्याला दणका, संपत्तीचा लिलाव करुन बँकांना 14000 कोटी दिले, निर्मला सीतारमण यांच्याकडून आकडेवारी जाहीर
विजय  माल्ल्याला दणका, संपत्ती विकून बँकांची थकबाकी भरली, निर्मला सीतारमण यांच्याकडून आकडेवारी जाहीर
Suhas Kande: छगन भुजबळांनी कितीही ढोंग केले तरी त्यांच्यात राष्ट्रवादी पक्ष सोडण्याची हिंमत नाही: सुहास कांदे
ढोंगी, गद्दार, ओरिजनल भुजबळ असाल तर..., सुहास कांदे छगन भुजबळांना काय काय म्हणाले?
Ravi Ashwin : वेळ, मैदान, जागा अन् धक्का सुद्धा तोच! जे 10 दहा वर्षांपूर्वी धोनीनं केलं तेच आश्विननं शांततेत केलं! त्या योगायोगाची रंगली चर्चा
वेळ, मैदान, जागा अन् धक्का सुद्धा तोच! जे 10 दहा वर्षांपूर्वी धोनीनं केलं तेच आश्विननं शांततेत केलं! त्या योगायोगाची रंगली चर्चा
Ravichandran Ashwin : अश्विनचा कसोटी क्रिकेटमधील भीम पराक्रम जो आजवर भारतातील रथी महारथींना सुद्धा गाठता आला नाही!
अश्विनचा कसोटी क्रिकेटमधील भीम पराक्रम जो आजवर भारतातील रथी महारथींना सुद्धा गाठता आला नाही!
R Ashwin : आर. अश्विनकडून निवृत्तीच्या निर्णयावेळी रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मिठी, भारताचा स्टार फिरकीपटू भावूक
अश्विनकडून निवृत्तीच्या निर्णयावेळी रोहित शर्मा आणि विराट कोहलीला मिठी, भारताचा स्टार फिरकीपटू भावूक
मोठी बातमी! शरद पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला
मोठी बातमी! शरद पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला
Chhagan Bhujbal: छगन भुजबळांच्या आक्रमक पवित्र्यावर अजित पवार बोललेच नाहीत, तटकरे म्हणाले, योग्यवेळी भेट घेऊ, राष्ट्रवादीत चाललंय काय?
छगन भुजबळांच्या आक्रमक पवित्र्यावर अजित पवार बोललेच नाहीत, तटकरे म्हणाले, योग्यवेळी भेट घेऊ, राष्ट्रवादीत चाललंय काय?
Embed widget