(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rahul Koli: 'छेल्लो शो' चित्रपटातील बालकलाकाराचे निधन; कॅन्सरशी झुंज अपयशी
ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका असलेल्या 'छेल्लो शो' (Chhello Show) या चित्रपटातील बालकलाकार राहुल कोलीचं (Rahul Koli) निधन झालं आहे. त्यानं वयाच्या 15 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
Chhello Show Child Actor Died: ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका असलेल्या 'छेल्लो शो' (Chhello Show) या चित्रपटातील बालकलाकार राहुल कोलीचं (Rahul Koli) निधन झालं आहे. राहुल हा कॅन्सरग्रस्त होता. 'छेल्लो शो' (Chhello Show) चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या एकूण 6 बालकलाकारांपैकी राहुल हा एक होता. त्यानं वयाच्या 15 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
राहुलच्या वडिलांनी दिली प्रतिक्रिया
राहुल गुजरातच्या जामनगरमधील हापा गावात आपल्या कुटुंबासह राहत होता. राहुलच्या कुटुंबीयांनी माहिती दिली की, राहुलच्या मृत्यूपूर्वी त्याला वारंवार ताप येत होता आणि त्याला रक्ताच्या उलट्याही होत होत्या. राहुलचे वडील रामू कोली हे रिक्षाचालक आहेत. एका मुलाखतीमध्ये रामू यांनी सांगितलं, 'तो खूप आनंदी होता आणि तो मला अनेकदा सांगत होता की 14 ऑक्टोबरनंतर आपले जीवन बदलेल. पण त्याआधीच तो आम्हाला सोडून गेला.'
'छेल्लो शो'मधील राहुलची भूमिका
'छेल्लो शो' चित्रपटात सहा बाल कलाकारांनी भूमिका साकारली आहे. या चित्रपटात राहुलनं मनु ही भूमिका साकारली. मनु हा रेल्वे सिग्नलमॅनचा मुलगा असतो. प्रमुख भूमिका साकारणाऱ्या बाल कलाकाराचा तो मित्र असतो. 14 ऑक्टोबर रोजी 'छेल्लो शो' हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा एक गुजराती चित्रपट असून याचे दिग्दर्शक पॅन नलिन आहेत. चित्रपटाची कथा एका ग्रामीण भागातील नऊ वर्षाच्या मुलाभोवती फिरते ज्याचे चित्रपटावर अफाट प्रेम असते. ऋचा मीना, भावेश श्रीमली, परेश मेहता और टिया सबेश्चियन यांनी देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाचे इंग्रजी शीर्षक ‘लास्ट फिल्म शो’ असे आहे.
ब्लड कॅन्सरशी झुंज अपयशी
ब्लड कॅन्सर म्हणजेच ल्युकेमिया या आजाराने ग्रस्त असलेल्या राहुलवर गेल्या चार महिन्यांपासून अहमदाबाद येथील गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये उपचार सुरू होते. चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर 4 महिन्यांनी राहुलला हा आजार झाल्याचं निदान झालं होतं.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Chhello Show : ‘छेल्लो शो’, प्रकाश ओंजळीत भरण्याची स्वप्न पाहणाऱ्या ‘समय’ची कथा!
- Oscar 2023 Entry : द कश्मीर फाइल्स, RRR नव्हे तर यंदाची ऑस्कर वारी गुजराती चित्रपटाची, 'छेल्लो शो' ने मारली बाजी