Chhatrapati Sambhaji : 'छत्रपती संभाजी' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला; 'हा' अभिनेता झळकणार औरंगजेबाच्या भूमिकेत
Chhatrapati Sambhaji : 'छत्रपती संभाजी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अभिनेता रजित कपूर औरंगजेबाच्या भूमिकेत झळकणार आहे.
Chhatrapati Sambhaji : 'छत्रपती संभाजी' (Chhatrapati Sambhaji) या सिनेमाची काही दिवसांपूर्वी घोषणा करण्यात आली आहे. या सिनेमासंदर्भात प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी सिनेप्रेमी उत्सुक आहेत. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.या सिनेमात अभिनेता रजित कपूर (Rajit Kapoor) औरंगजेबाच्या भूमिकेत झळकणार आहे.
रजित कपूर साकारणार औरंगजेब
'ब्योमकेश बक्षी' या मालिकेमुळे घराघरात पोहचलेले अभिनेते रजित कपूर (Rajit Kapoor) औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार आहेत. राकेश सुबेसिंह दुलगज निर्मित आणि दिग्दर्शित 'छत्रपती संभाजी' या मराठी चित्रपटात ते क्रूरकर्मा औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
'छत्रपती संभाजी' हा चित्रपट येत्या 2 फेब्रुवारी 2024 रोजी आपल्या भेटीला येणार आहे. परफेक्ट प्लस एंटरटेनमेंट आणि ‘एजे मीडिया कॉर्प प्रस्तुत 'छत्रपती संभाजी' हा चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ, तेलगू आणि इंग्रजी मध्ये एकाच वेळी प्रदर्शित होत आहे.
औरंगजेब क्रूर शासक होता, सोबत तो धोरणी आणि कपटी होता. त्यामुळे औरंगजेबसाठी कसलेला कलाकार हवा होता, रजित कपूर या भूमिकेला न्याय देऊ शकतील यामुळे त्यांना ही संधी दिल्याचं दिग्दर्शक राकेश सुबेसिंह दुलगज सांगतात.
‘छत्रपती संभाजी’ या चित्रपटाचा मी महत्त्वपूर्ण भाग : रजित कपूर
आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना रजित कपूर ते सांगतात की, मी आतापर्यंत खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका केल्या. ‘छत्रपती संभाजी’च्या निमित्ताने मला प्रथमच नकारात्मक ऐतिहासिक भूमिका करण्याची संधी मिळाली. या चित्रपटाचा मी महत्त्वपूर्ण भाग आहे याचा मला आनंद आहे.
तगडी स्टारकास्ट असणारा ‘छत्रपती संभाजी’
रजित कपूर यांच्यासह प्रमोद पवार (Pramod Pawar), शशांक उदापूरकर,दिलीप ताहिल, मृणाल कुलकर्णी (Mrinal Kulkarni), मोहन जोशी (Mohan Joshi), भरत दाभोळकर (Bharat Dabholkar), लोकेश गुप्ते (Lokesh Gupte), बाळ धुरी, दिपक शिर्के,अमित देशमुख (Amit Deshmukh) , कै. आनंद अभ्यंकर,समीर, मोहिनी पोतदार, प्रिया गमरे आदी कलाकार 'छत्रपती संभाजी' (Chhatrapati Sambhaji) चित्रपटात आहेत.
'छत्रपती संभाजी' चित्रपटाची सहनिर्मिती एफआयएफ निर्मिती संस्थेची आहे. कथा सुरेश चिखले यांची आहे. अविनाश विश्वजित, गुरु शर्मा आणि आरव यांचे संगीत चित्रपटाला लाभले असून पार्श्वसंगीत अमर-अमित देसाई यांनी दिले आहे. छायांकन सुरेश देशमाने तर संकलन भरत भाई यांचे आहे. कला अनिल वठ यांची आहे. साहसदृश्ये पी. सतीश यांची आहेत.
संबंधित बातम्या