Shivrayancha Chhava : "या' सिंहासनावर तुमच्याआधी रयतेचा अधिकार"; 'शिवरायांचा छावा'चा अंगावर शहारे आणणारा टीझर आऊट
Shivrayancha Chhava : 'शिवरायांचा छावा' या सिनेमाचा नवा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या दमदार टीझरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
![Shivrayancha Chhava : Shivrayancha Chhava Upcoming Marathi Movie New Teaser out Viral on Social Media Digpal Lanjekar Film Know Bollywood Entertainment Latest Update Shivrayancha Chhava :](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/24/2bd623ed9b2f8090279d9aed7fe411371706083699507254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shivrayancha Chhava : छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या आयुष्यावर आधारित 'शिवरायांचा छावा' (Shivrayancha Chhava) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा नवा टीझर आऊट झाला आहे. या टीझरने प्रेक्षकांची सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढवली आहे. या टीझरमध्ये शिवराय शंभूबाळाला सिंहासनाचं महत्व सांगताना आहेत.
'शिवरायांचा छावा'च्या टीझरमध्ये काय आहे? (Shivrayancha Chhava New Teaser Out)
टीझरमध्ये शिवराय शंभूबाळाला विचारत आहेत,"शंभूबाळ सिंहासन कसं वाटतंय? या सिंहासनावर तुमच्याआधी रयतेचा अधिकार आहे". शंभूराजांचा पराक्रमाची कहाणी टीझरमध्ये पुढे उलगडते". या लक्षवेधी टीझरनंतर प्रेक्षकांना आता सिनेमाची प्रतीक्षा आहे.
दिग्पाल लांजेकरांनी शेअर केला 'शिवरायांचा छावा'चा टीझर
दिग्पाल लांजेकरांनी (Digpal Lanjekar) यांनी 'शिवरायांचा छावा' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. टीझर शेअर करत दिग्पाल लांजेकरांनी लिहिलं आहे,"जयांच्या ध्वनीने उसळती सह्याद्री आणि समुद्र रायगडी बैसले सिंहासनी गर्जती रुद्र. 'शिवरायांचा छावा' 16 फेब्रुवारी 2024 पासून फक्त चित्रपटगृहात".
View this post on Instagram
नेटकऱ्यांचा कमेंट्सचा वर्षाव
दिग्पाल लांजेकरांनी शेअर केलेल्या 'शिवरायांचा छावा'च्या टीझरवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. जय शंभुराजे..जय शिवराय, छत्रपतींचा इतिहास फक्त तुम्हीच अप्रतिमरित्या आणि सन्मानाने दाखवू शकता, प्रचंड आतुरता, अंगावर काटा, नि:शब्द अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
छत्रपती संभाजी राजे यांनी त्यांच्या कारकिर्दीत दाखवलेले शौर्य आणि दिलेले योगदान लक्षणीय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर संभाजी राजे यांनी अडचणीच्या काळात मराठा साम्राज्य ताब्यात घेतले. संभाजी महाराजांनी 16 जानेवारी 1681 रोजी आपला राज्याभिषेक केला.
छत्रपती संभाजी राजे यांचा राज्याभिषेक सोहळा भव्य आणि उत्साहात साजरा करण्यात आला होता. हाच स्वराज्याचा दुसरा देदिप्यमान आणि भव्यदिव्य राज्याभिषेक सोहळा याचि देही याचि डोळा अनुभवायचा असेल तर छत्रपती संभाजी महाराजांवरील 'शिवरायांचा छावा' या मराठीतल्या पहिल्या भव्य चित्रपटातील राज्याभिषेकावरील प्रदर्शित झालेल्या गीतातून याची झलक पाहायला मिळतेय. आता प्रेक्षकांना सिनेमाची प्रतीक्षा आहे. येत्या 16 फेब्रुवारीला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
संबंधित बातम्या
Shivrayancha Chhava : "सिंहासनी बैसले शंभू राजे"; 'शिवरायांचा छावा' सिनेमातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या भव्यदिव्य गीताने वेधलं लक्ष
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)