Chandigarh Kare Aashiqui: Ayushmann Khurrana, Vaani Kapoor च्या 'चंडीगड करे आशिकी' सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
'चंडीगड करे आशिकी' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात आयुष्मान खुराना वेट लिफ्टिंग चॅम्पिअन मनविंदरच्या भूमिकेत दिसून येत आहे.
Chandigarh Kare Aashiqui Trailer: प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. 'चंडीगड करे आशिकी' या सिनेमातून आयुष्मान खुराना प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यात आयुष्मान खुराना वेट लिफ्टिंग चॅम्पिअन मनविंदरच्या भूमिकेत दिसून येत आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला आयुष्मान खुराना त्याच्या पात्राची ओळख करुन देत म्हणतो,"हा एक फिटनेस ट्रेनर आहे. त्याचे नाव चंदीगडमधील टॉप 10 फिटनेस ट्रेनरमध्ये येते. ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे". आयुष्मान हा एका सर्वसामान्य जिममध्ये जाणारा मुलगा आहे. त्याला आयुष्यात लांबचा पल्ला गाठायचा आहे.
ट्रेलरमध्ये अभिनेत्री वाणी कपूरदेखील दिसून येते. वाणी कपूर सिनेमात झुंबा ट्रेनरच्या भूमिकेत दिसून येणार आहे. वाणीला भेटताच आयुष्मानच्या आयुष्यात मोठे वळण येते. वाणी आणि आयुष्मान एकमेकांच्या प्रेमात पडतात. हिंदी चित्रपटांमध्ये दाखवण्यात येणाऱ्या रोमान्सपेक्षा वेगळे कथानक या सिनेमात दाखवण्यात आले आहे. सिनेमातील कथानकानुसार आयुष्मानला वाणीबाबतीतल्या एका सत्याचा सामना करावा लागतो. हे सत्यदेखील विनोदी पद्धतीने दाखवण्यात आले आहे.
आयुष्मान आणि वाणीचे प्रेमप्रकरण नक्की काय आहे? ते दोघे नक्की एकमेकांच्या प्रेमात पडतात का? हे सिनेमात अतिशय विनोदी पद्धतीने दाखवण्यात आले आहे. आज प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये आयुष्मान आणि वाणीचे दमदार संवाद प्रेक्षकांना ऐकायला मिळत आहेत. ट्रेलरमध्ये वाणी कपूर आयुष्मानला म्हणते,"तुला माहित आहे समस्या काय आहे? ही समस्या तुला पचवता येत नाही, ना मला संपवता येत आहे". हा सिनेमा 10 डिसेंबर 2021 रोजी प्रदर्शित होणार आहे.
Tiku Weds Sheru : Kangana Ranaut करणार सिने-निर्मिती व्यवसायात पदार्पण, सिनेमात Nawazuddin Siddiqui असणार मुख्य भूमिकेत
जाणून घ्या सिनेमा कधी प्रदर्शित होणार
'सत्यमेव जयते 2' सिनेमा 'सत्यमेव जयते' सिनेमाचाच पुढचा भाग असणार आहे. यात जॉनने एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका स्विकारली आहे. प्रेक्षक या सिनेमाची प्रतिक्षा करत आहेत. चित्रपटात शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी दिव्या संघर्ष करताना दिसून येणार आहे. 2018 साली प्रदर्शित झालेला 'सत्यमेव जयते'देखील भ्रष्टाचारावर भाष्य करणारा होता. तर 'सत्यमेव जयते 2' मध्ये भ्रष्टाचार अधिक विस्तारात दाखवण्यात येणार आहे. हा सिनेमा 25 नोव्हेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.