Anushka Shetty: 40 व्या वाढदिवसानिमित्त अनुष्का शेट्टीचं चाहत्यांना खास गिफ्ट; सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट
अभिनेत्री अनुष्का शेट्टीचा (Anushka Shetty ) काल (7 सप्टेंबर) 40 वा वाढदिवस होता.
![Anushka Shetty: 40 व्या वाढदिवसानिमित्त अनुष्का शेट्टीचं चाहत्यांना खास गिफ्ट; सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट anushka shetty gives surprise to her fans on her 40th birthday announces her next film Anushka Shetty: 40 व्या वाढदिवसानिमित्त अनुष्का शेट्टीचं चाहत्यांना खास गिफ्ट; सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/11/07105809/anushka-shetty-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Anushka Shetty : अभिनेत्री अनुष्का शेट्टीचा (Anushka Shetty ) काल (7 सप्टेंबर) 40 वा वाढदिवस होता. अनेक कलाकारांनी आणि तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अनुष्काने तिच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना एक खास गिफ्ट दिला आहे. नुकताच अनुष्काने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केली. या व्हिडीओमधून अनुष्काने तिच्या नव्या चित्रपटाबद्दल माहिती दिली आहे.
अनुष्काने तिच्या बर्थ-डेला नव्या चित्रपटाची अनाउंसमेंट केली आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या चित्रपटाबद्दल तिचे चाहते उत्सुक आहेत. अनुष्काने वाढदिवसाला एका व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओला तिने कॅप्शन दिले आहे, 'माझ्या नव्या चित्रपटाबद्दल तुम्हाला सांगताना अत्यंत आनंद होत आहे. महेश बाबू आणि यूवी क्रिएशन्स हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत.' अनुष्काच्या या नव्या चित्रपटाचे नाव अजून अनाउंस झाले नाही. लवकरच या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होणार आहे.
View this post on Instagram
'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' ठरणार जगातील पहिला मराठी हॉलिवूड सिनेमा, मराठीसह इंग्रजी भाषेत चित्रित होणार
कलाकरांच्या सोशल मीडिया पोस्ट
अनेक कलाकारांनी सोशल मीडियार अनुष्काला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता कमल हासन आणि अभिनेत्री काजल अग्रवाल खास पोस्ट शेअर करून अनुष्काला शुभेच्छा दिल्या. बाहुबली या चित्रपटातील अभिनयामुळे अनुष्काला विशेष लोकप्रियता मिळाली. अनुष्काचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)