एक्स्प्लोर

प्रसिद्ध दिग्दर्शक अनुभव सिन्हा, हंसल मेहता, सुधीर मिश्रा यांचा बॉलिवूडला रामराम

दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी थेट बॉलिवूडलाच रामराम ठोकायचा निर्णय घेतला आहे. विशेष बाब अशी की, दिग्दर्शक हंसल मेहता आणि सुधीर मिश्रा यांनीही या त्यांच्या निर्णयाला दुजोरा देत बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून हिंदी इंडस्ट्रीत मोठे वाद होऊ लागले आहेत. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर हा वाद उफाळून आला. यात अनेक कलाकारांनी भाग घेतला आहे. कंगना राणौतने सुशांतच्या घटनेचा आधार घेत बॉलिवूडमध्ये कसा नेपोटिझम आहे, हे सांगितलं. ते सांगतानाच तिने काही दिवसांपूर्वी तापसी पन्नू आणि स्वरा भास्कर या अभिनत्रींनाही या वादात ओढलं. त्यानंतर हा वाद आणखी पेटला. आता मुल्क, थप्पड, रा-वन, आर्टिकल -15 असे सिनेमे देणारे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी थेट बॉलिवूडलाच रामराम ठोकायचा निर्णय घेतला आहे. विशेष बाब अशी की, दिग्दर्शक हंसल मेहता आणि सुधीर मिश्रा यांनीही या त्यांच्या निर्णयाला दुजोरा देत बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी ट्विटरवर पोस्ट करत सांगितलं की, 'मी आता बॉलिवूडचा राजीनामा देत आहे. त्याचा अर्थ तुम्हाला काय घ्यायचा तो घ्या. असं सांगतानाच त्यांनी आपल्या ट्विटर हॅंडलवर आपल्या नावानंतर नो बॉलिवूड असंही लिहिलं आहे. अर्थात ही पोस्ट आल्यानंतर एकच गहजब झाला. बॉलिवूडचा राजीनामा म्हणजे, अनुभव सिन्हा सिनेमे बनवणार की, नाही असा प्रश्न अनेक नेटिझन्सनी विचारला. त्यावर आपण सिनेमे बनवण्यासाठीच इथे आलो. आपण सिनेमे बनवूच. पण त्याची पद्धत आता बदललेली असेल असंही सांगितलं. आता येत्या काळात कसे सिनेमे बनवणार ते मात्र काही काळानंतर कळेल असंही त्यांनी सांगितलं आहे.

अनुभव सिन्हा यांचं ट्विट आल्यानंतर दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांनीही अनुभव सिन्हा यांना पाठिंबा दिला. सिन्हा यांच्या पोस्टला रिट्विट करताना आपणही बॉलिवूडचा राजीनामा देत असून आता यापुढे आपण भारतीय सिनेमा भारतीय पद्धतीने गोष्ट सांगून बनवू असं सांगितलं आहे. ते सांगताना त्यांनी गुरुदत्त, सत्यजीत रे, राज कपूर, बिमल रॉय, मृणाल सेन यांच्या सिनेमांपासून प्रेरणा घेऊन इथे आलो होतो असं सांगितंल आहे. असे सिनेमे बनवण्यासाठी आम्ही इथे नेहमी असू असंही ते सांगतात.

अनुभव सिन्हा यांनी त्याची दखल घेतली. एकाचे दोन झाले असं त्यांनी ट्विटकरून सांगितलं. त्यानंतर दिग्दर्शक हंसल मेहता यांनीही अनुभव सिन्हा यांच्या पोस्टचा संदर्भ घेत.. बॉलिवूड सोडलं? ते आपल्या यादीत कधीच नव्हतं अशा आशयाचं विधान केलं आहे.

या सगळ्या घडामोडींमुळे हिंदी इंडस्ट्रीतल्या मोठ्या तीन दिग्दर्शकांनी बॉलिवूडला रामराम ठोकला आहे. अर्थात हे तिघेही जण सिनेमे बनवणार आहेत. त्याची पद्धत काय असेल ते मात्र येत्या काळात कळेल. या तिघांनी एकामागे एक ट्विट केल्याने नेटिझन्सचे डोळे विस्फारले.

महत्त्वाच्या बातम्या : 

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, आदित्य चोप्राने पोलीस चौकशीत सर्व आरोप फेटाळले

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण; रिया चक्रवर्तीची अमित शाहांकडे सीबीआय चौकशीची मागणी

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
Musician Ravi Dey: प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
Maharashtrachi Hasya Jatra 8 Years: हसवता हसवता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ला 8 वर्षे पूर्ण; सेटवर रंगला खास सेलिब्रेशन, PHOTOs
हसवता हसवता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ला 8 वर्षे पूर्ण; सेटवर रंगला खास सेलिब्रेशन, PHOTOs
Kartik Aaryan Injured: भयंकर! प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता हॉस्पिटलमध्ये भर्ती, शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत; लवकरच होणार सर्जरी
भयंकर! प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता हॉस्पिटलमध्ये भर्ती, शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत; लवकरच होणार सर्जरी

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Embed widget