एक्स्प्लोर

Kartik Aaryan Injured: भयंकर! प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता हॉस्पिटलमध्ये भर्ती, शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत; लवकरच होणार सर्जरी

Actor Kartik Aaryan Injured: अॅक्शन सीनदरम्यान, कार्तिक आर्यनच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे.

Actor Kartik Aaryan: लोकप्रिय अभिनेता कार्तिक आर्यनच्या (Kartik Aaryan) संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे.  कार्तिक आर्यन त्याच्या आगामी सिनेमाच्या (Film Shooting) चित्रिकरणादरम्यान, जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,   दिग्दर्शक कबीर खान (Kabir Khan) यांच्या अनटाइटल्ड फिल्मच्या अॅक्शन सीनदरम्यान, दुखापत झाली असल्याची माहिती समोर आली आहे.  अभिनेत्याच्या गुडघ्याला (Knee Injury) गंभीर दुखापत झाली असून, ही घटना चित्रिकरणाच्या शेवटच्या दोन दिवसांत घडली असल्याचं सांगण्यात येत आहे. कार्तिक आर्यनच्या गुडघ्याला झालेल्या दुखापतीची माहिती समोर येताच, त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. त्याच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत आहेत.

कार्तिक आर्यनवर लवकरच गुडघ्याची शस्त्रक्रिया होणार (Actor Kartik Aaryan Injured During Action Scene)

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार,गुडघ्याला दुखापत झाल्यानंतर कार्तिकला  तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.  जिथे डॉक्टरांनी त्याच्या गुडघ्याची सर्जरी करावी लागेल, असं सांगितलं. तसेच आराम करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या त्याला रेस्ट घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.  कबीर खान दिग्दर्शित या सिनेमात अनेक थरारक अॅक्शन सीन्स आहेत.  यासाठी कार्तिक आर्यन खास गेल्या काही काळापासून विशेष ट्रेनिंग  घेत आहे. पण त्याच्या गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे अभिनेत्याला सध्या आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.  

प्रॉडक्शनच्या संबंधित एका सुत्राने सांगितलं की, 'कार्तिक फोर्टिस रहेजा रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखेखाली उपचार घेत आहे.  लवकरच त्याच्या गुडघ्याची सर्जरी होणार आहे.  सर्जरी झाल्यानंतर  काही दिवसांसाठी त्याला आरामाचा सल्ला देण्यात आला आहे. यानंतर कार्तिक आर्यन आपल्या कामावर रुजू होईल', असं त्यांनी म्हटलं आहे.  कबीर खानसोबत कार्तिक आर्यनची ही दुसरी फिल्म आहे. या सिनेमाचं शीर्षक अद्याप ठरलेलं नसून,  लवकरच यावर काम करण्या येणार आहे.  यापूर्वी कबीर खान आणि कार्तिक आर्यनने एकत्र 'चंदू चँपियन' या सिनेमासाठी काम केलं होतं.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सर्जरीच्या रिकव्हरीनंतर कार्तिक आर्यन दिग्दर्शक अनुराग बसूच्या सिनेमासाठी काम करणार आहे.  मिळालेल्या माहितीनुसार,  ही एक रोमँटिक म्यूझिकल फिल्म असणार आहे. या सिनेमात कार्तिक आर्यनसोबत श्रीलीला लीडरोलमध्ये काम करणार आहे.   दोघांची जोडी पहिल्यांदाज एकत्र दिसणार आहे.  श्रीलीलाने या प्रोजेक्टसाठी सुरुवात केली असून, मुंबईतील काही ठिकाणी या सिनेमाचं शूटिंग पार पडलं आहे.    विशेष म्हणजे या सिनेमाचं म्यूझिक प्रीतम यांचं आहे. या व्यतिरिक्त कार्तिक आर्यन 'नागजिला'मध्येही दिसणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'आवारापन 2'चा नाद करायचा नाय! पाच दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार, पाचव्या दिवशी केली 'इतक्या' कोटींची कमाई

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जेलमधून बाहेर काढत फटकवायला पाहिजे; टायगरवरील हल्ला, लॉरेन्स बिष्णोईच्या प्रश्नावर राज ठाकरेंचा सरकारला सवाल
जेलमधून बाहेर काढत फटकवायला पाहिजे; टायगरवरील हल्ला, लॉरेन्स बिष्णोईच्या प्रश्नावर राज ठाकरेंचा सरकारला सवाल
पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, गडबड होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल; राज ठाकरेंकडून भीती व्यक्त
पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, गडबड होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल; राज ठाकरेंकडून भीती व्यक्त
Anirudh Ravichander and Kavya Maran: काव्या मारन अन् अनिरुद्ध रविचंदर नोव्हेंबरमध्ये लग्न करणार? दोघांमध्ये किती वर्षांचं अंतर?
काव्या मारन अन् अनिरुद्ध रविचंदर नोव्हेंबरमध्ये लग्न करणार? दोघांमध्ये किती वर्षांचं अंतर?
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीत, गुणरत्न सदावर्तेंचं वक्तव्य; टायगर श्रॉफच्या भेटीवरूनही उपमुख्यमंत्र्यांवर टीका
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीत, गुणरत्न सदावर्तेंचं वक्तव्य; टायगर श्रॉफच्या भेटीवरूनही उपमुख्यमंत्र्यांवर टीका
Advertisement

व्हिडीओ

Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report
Manoj Jarange vs Eknath Shinde : 500 कोटींचे दावे,उद्या देणार पुरावे? Special Report
Saurav Das, Ashutosh Ranka Get Bail : जामिनामुळे सुटका पण शाब्दिक फटका Special Report
Reliance Jio IPO : रिलायन्स जिओ, रेकॉर्डब्रेक आयपीओ Special Report
Manoj Jarange On Eknath Shinde : एकनाथ शिंदेंवर 500 कोटी घेतल्याचा आरोप, जरांगे पाटील पुरावा देणार
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त झालं की महागलं? जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर, एका क्लिकवर
दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त झालं की महागलं? जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर, एका क्लिकवर
दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 99 धावांमध्ये गुंडाळलं, तब्बल 56 वर्षानंतर ऑस्ट्रेलियावर फॉलोऑनची नामुष्की
दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 99 धावांमध्ये गुंडाळलं, नेमकं काय घडलं?
मन हेलावणारी दुर्घटना, पोहता येत नसतानाही पाण्यात उतरले, तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
मन हेलावणारी दुर्घटना, पोहता येत नसतानाही पाण्यात उतरले, तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका फरजाना अन्सारी यांचे पद रद्द; हायकोर्टात धाव, प्रभाग 4-अ ची जागा रिक्त
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका फरजाना अन्सारी यांचे पद रद्द; हायकोर्टात धाव, प्रभाग 4-अ ची जागा रिक्त
Sangli Bank Election: सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी 18 जागांवर बिनविरोधचे संकेत! जत-तासगाव, कवठेमहांकाळमध्ये संघर्षाची ठिणगी
सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी 18 जागांवर बिनविरोधचे संकेत! जत-तासगाव, कवठेमहांकाळमध्ये संघर्षाची ठिणगी
Supriya Sule : पुणे जिल्हा बँकेच्या शाखेतून भाजप उमेदवारांना मतदान करण्यासाठी फोन, ऑडिओ क्लिप शेअर करत सुप्रिया सुळेंची चौकशीची मागणी
भाजप उमेदवारांना मतदान करा, पुणे जिल्हा बँकेच्या शाखेतून मतदारांना फोन, सुप्रिया सुळेंकडून ऑडिओ क्लिप शेअर
जयंत पाटलांना मुख्यमंत्र्यांचा फोन, जिल्हा बँक बिनविरोध करण्याचा आग्रह; सांगलीत अखेर शिंदेसेनेचा वरचष्मा
जयंत पाटलांना मुख्यमंत्र्यांचा फोन, जिल्हा बँक बिनविरोध करण्याचा आग्रह; सांगलीत अखेर शिंदेसेनेचा वरचष्मा
जेलमधून बाहेर काढत फटकवायला पाहिजे; टायगरवरील हल्ला, लॉरेन्स बिष्णोईच्या प्रश्नावर राज ठाकरेंचा सरकारला सवाल
जेलमधून बाहेर काढत फटकवायला पाहिजे; टायगरवरील हल्ला, लॉरेन्स बिष्णोईच्या प्रश्नावर राज ठाकरेंचा सरकारला सवाल
Embed widget