एक्स्प्लोर

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, आदित्य चोप्राने पोलीस चौकशीत सर्व आरोप फेटाळले

बाजीराव मस्तानीबद्दल संजय लीला भन्साळी किंवा त्यांची टीम दोघांनीही यशराजकडे कधीच संपर्क साधला नव्हता. सुशांतनेही मला हा चित्रपट मिळाला आहे आणि त्यामध्ये काम करण्याची इच्छा असल्याचे कधीही सांगितले नाही, असं आदित्य चोप्राने सांगितलं.

मुंबई : सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आज यशराज फिल्मचे मालक आदित्य चोप्रा यांची चार तास चौकशी केली. चौकशीत शेखर कपूर व सोशल मीडियावर सुशांतच्या मृत्यूच्या संदर्भात यशराजवर लावण्यात येत असलेले सर्व आरोप आदित्य चोप्राने फेटाळून लावले आहेत. सुशांत आणि यशराज यांच्यात कोणताही वाद किंवा मतभेद कधीच नव्हते. पाणी चित्रपट न बनवण्यामागील कारण म्हणजे माझं आणि शेखर कपूरमध्ये क्रिएटिव्ह डिफ्रन्स होते, असं आदित्य चोप्राने सांगितल.

आदित्य चोप्रा पुढे म्हणाला की, शेखर कपूर यांनी केलेले सर्व आरोप खोटे आहेत. पानी चित्रपटाविषयी सुशांत डिप्रेशनमध्ये नव्हता. पानी हा चित्रपट बनवू शकला नाही आणि सुशांतबरोबरचा आमचा करार त्यानंतर कोणत्याही वादविवादाशिवाय आणि बर्‍याच चांगल्या नोटवर संपला. पाणी चित्रपट न बनवण्यामागील कारण म्हणजे शेखर कपूर आणि माझ्यातले सर्जनशील फरक आणि सुशांतला याची पूर्ण जाणीव होती. ‘पानी’ हा चित्रपट न केल्यामुळे सुशांत नैराश्यात गेला, असं शेखर कपूर यांचं म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे. चित्रपट न बनल्यामुळे सुशांत नैराश्येत गेला नाही. परंतु त्याने एका नवीन प्रोजेक्टवर काम करण्यास सुरुवात केली होती.

पानी चित्रपटासाठी सुशांतने अनेक चित्रपट सोडले, याविषयी कोणतीही माहिती कधीच समोर आली नाही. असे नाही की आम्हाला पानी चित्रपट करण्याची इच्छा नव्हती. आम्ही चित्रपटाचे काम सुरू केले आणि चित्रपटासाठी 6 ते 5 कोटी रुपये खर्चही केले. पण शेखर कपूरला आंतरराष्ट्रीय स्तरावर हा चित्रपट नेण्याची इच्छा होती आणि आम्हाला भारतात या चित्रपटाचा अधिक व्यवसाय करायचा होता. या चित्रपटासाठी सुमारे दीडशे कोटी खर्च येणार होतेा आणि सुरुवातीलाच शेखर कपूरशी मतभेद झाल्यानंतर आम्हाला इतकी मोठी जोखीम नव्हती घ्यायची. म्हणून हा चित्रपट बनू शकला नाही, असं आदित्य चोप्राने सांगितलं.

चित्रपट नाही बनला शकल्यामुळे सुशांत निराश झाला असेल. कोणताही कलाकार असेल तरी त्याला वाईट वाटेल. परंतु सुशांत एक हुशार अभिनेता होता. सुशांतला देखील या गोष्टी इंडस्ट्रीमध्ये घडतात हे माहित होते. म्हणूनच चित्रपट नाही झाल्यामुळे सुशांत नैराश्येत जात असल्याची माहिती पूर्णपणे निराधार आहे. आम्ही करार संपल्यानंतरही बर्‍याच वेळ संपर्कात होतो. जर आमच्यात वाद झाले असते तर तो नक्कीच कधीतरी बाहेर आला असता, असंही आदित्य चोप्राने सांगितलं.

रामलीला आणि बाजीराव मस्तानी या दोन चित्रपटांवरही चौकशी

आदित्य चोप्रा म्हणाले की, 2012 मध्ये संजय लीला भन्साळींनी रणवीर सिंहला या चित्रपटासाठी साईन केलं. तेव्हा सुशांतचा करार यशराजसोबत नव्हता. या चित्रपटात संजय लीला भन्साळी यांनी रणवीर सिंगच्या मार्च-एप्रिल 2012 मध्ये साईन केले होते. त्याच्या काही महिन्यांनंतर यशराजसोबत सुशांतचा करार झाला. तर यशराज यांच्याबरोबर झालेल्या करारामुळे सुशांत रामलीला हा चित्रपट करू शकला नाही हे म्हणणेही चुकीचे आहे.

बाजीराव मस्तानीबद्दल संजय लीला भन्साळी किंवा त्यांची टीम दोघांनीही यशराजकडे कधीच संपर्क साधला नव्हता. सुशांतनेही मला हा चित्रपट मिळाला आहे आणि त्यामध्ये काम करण्याची इच्छा असल्याचे कधीही सांगितले नाही. आम्ही करार असूनही सुशांतला एमएस धोनी चित्रपट करणायस परवानगी दिली. जर आम्ही महेंद्रसिंग धोनीसारख्या मोठा चित्रपट सुशांतला करु देऊ शकतो तर मग सुशांतला रामलीला आणि बाजीराव मस्तानी करण्यापासून आम्ही का रोखू? असा सवाल आदित्या चोप्राने उपस्थित केला.

सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती यांच्याविषयीही पोलिसांनी आदित्य चोप्राकडून माहिती घेतली. आदित्य चोप्रा यांनी रियाच्या चित्रपटांबद्दल आणि या विषयावरील कॉन्ट्रॅक्टबद्दलही माहिती दिली. आदित्य चोप्राच्या सुशांतबरोबरच्या व्यवहाराचीही माहिती पोलिसांनी घेतली. आदित्यने सांगितले की यशराजने सुशांतला पहिला चित्रपट शुद्ध देसी रोमांससाठी 30 लाख रुपये तर दुसर्‍या चित्रपटाच्या व्योमकेश बक्षीसाठी 1 कोटी रुपये दिले होते.

संबंधित बातम्या

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण; रिया चक्रवर्तीची अमित शाहांकडे सीबीआय चौकशीची मागणी

सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी सलमान खानची चौकशी होणार?

सुशांत सिंह राजपूत आत्महत्येबाबत संजय लीला भन्साळी यांच्या चौकशीतून काय माहिती मिळाली?

Rhea Chakraborty | सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिची सीबीआय चौकशीची मागणी

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
Embed widget