एक्स्प्लोर

Maharashtrachi Hasya Jatra 8 Years: हसवता हसवता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ला 8 वर्षे पूर्ण; सेटवर रंगला खास सेलिब्रेशन, PHOTOs

Maharashtrachi Hasya Jatra Completes 8 Years: आठ वर्षांचा हास्यप्रवास. सोनी मराठी वाहिनी आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाची आठ वर्ष पूर्ण.

Maharashtrachi Hasya Jatra: महाराष्ट्राच्या घराघरात हास्याची उधळण करणारा आणि प्रेक्षकांच्या मनात आपली खास जागा निर्माण करणारा लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasya Jatra) आणि सोनी मराठी यांनी आपल्या यशस्वी प्रवासाची आठ वर्षे पूर्ण केली आहेत. या खास निमित्ताने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या संपूर्ण टीमने सेटवर (Marathi Entertainment) एकत्र येऊन हा आनंदाचा क्षण साजरा केलाय.

गेल्या आठ वर्षांत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ने केवळ एक विनोदी कार्यक्रम म्हणून नव्हे, तर महाराष्ट्राच्या प्रेक्षकांच्या दैनंदिन आयुष्याचा एक अविभाज्य भाग म्हणून आपली ओळख निर्माण केलीये. विविध व्यक्तिरेखा, भन्नाट स्किट्स, कलाकारांची अफलातून केमिस्ट्री आणि रोजच्या आयुष्यातील प्रसंगांना विनोदी अंदाजात मांडण्याची शैली यामुळे या कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून सातत्याने भरभरून प्रेम मिळत आले आहे.

आठ वर्षांचा हास्यप्रवास, वर्धापनदिन दणक्यात साजरा (Maharashtrachi Hasya Jatra Completes 8 Years)

आठ वर्षांच्या या प्रवासात कार्यक्रमाने अनेक कलाकारांना प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचवले. कार्यक्रमातील पात्र आणि संवाद प्रेक्षकांच्या रोजच्या बोलण्यातही सहजपणे उमटताना दिसतात. सोशल मीडियावर स्किट्सची होणारी चर्चा, कलाकारांच्या व्यक्तिरेखांना मिळणारा प्रतिसाद आणि प्रत्येक नव्या भागाची असलेली उत्सुकता हे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या लोकप्रियतेचे दर्शन घडवते.

या खास प्रसंगी कार्यक्रमाचे दिग्दर्शक आणि निर्माते सचिन गोस्वामी म्हणाले, “महाराष्ट्राची हास्यजत्रा’चा आठ वर्षांचा प्रवास आमच्यासाठी अत्यंत भावनिक आणि अभिमानाचा आहे. या प्रवासात कलाकार, लेखक, तंत्रज्ञ आणि पडद्यामागे काम करणाऱ्या प्रत्येक सदस्याने मनापासून योगदान दिलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला आपलंसं केलं. आमच्या पात्रांवर, विनोदावर आणि कलाकारांवर त्यांनी जे प्रेम केलं, तेच आम्हाला सातत्याने नवीन काहीतरी करण्याची प्रेरणा देत आलं आहे. आठ वर्षांनंतरही प्रेक्षकांना हसवण्याची आणि त्यांचं मनोरंजन करण्याची हीच ऊर्जा आम्हाला पुढे घेऊन जाणार आहे.”

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चा हा आठ वर्षांचा प्रवास म्हणजे कलाकार, तंत्रज्ञ, लेखक, निर्माते आणि संपूर्ण टीमच्या मेहनतीसोबतच प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमाचा उत्सव आहे. सेटवर झालेल्या या छोटेखानी सेलिब्रेशनमधूनही संपूर्ण टीमचा एकमेकांशी असलेला जिव्हाळा आणि या कार्यक्रमाविषयीची आपुलकी पाहायला मिळाली. आठ वर्षांचा हा हास्यप्रवास पूर्ण करताना ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ पुन्हा एकदा त्याच उत्साहाने आणि नव्या जोमाने प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज आहे. प्रेक्षकांचे हे प्रेम आणि साथ अशीच कायम राहावी, हीच या खास वर्धापनदिनानिमित्त संपूर्ण टीमची इच्छा आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

बड्या अभिनेत्यासोबत बोल्ड सीन्स, राजकीय महत्त्वाकांक्षा; तरीही बोल्डनेस क्विन मल्लिका शेरावतचा 'डर्टी पॉलिटिक्स' फ्लॉप

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Imran Khan : OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
इम्रान खान म्हणाला, मी नोकरीचा शोध घेतोय; मुंबई उच्च न्यायालयाने सुनावले खडे बोल, पण देश सोडण्याच्या नोटीसवर दिलासा
इम्रान खान म्हणाला, मी नोकरीचा शोध घेतोय; मुंबई उच्च न्यायालयाने सुनावले खडे बोल, पण देश सोडण्याच्या नोटीसवर दिलासा
Prashant Damle on Dia Mirza: 'मला यात खेचू नका'; दिया मिर्झाच्या दिवाळी VIDEOने जाळ अन् धूर, भाजपे नेते भडकले, प्रशांत दामलेंनीही स्पष्ट केली भूमिका
'मला यात खेचू नका'; दिया मिर्झाच्या दिवाळी VIDEOने जाळ अन् धूर, भाजपे नेते भडकले, प्रशांत दामलेंनीही स्पष्ट केली भूमिका
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
India Alliance Vs BJP : 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, भाजपच्या देशभरात पदयात्रा Special Report
Inflation Diwali : दिवाळीपूर्वीच महागाईचा दणका...CNG चे दर वाढले, जेट इंधनातही भाववाढ Special Report
Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah Vs Rahul Gandhi : 'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Imran Khan : OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
रस्त्याचे काम सुरु असतानाच मशीनचा उच्च दाबाच्या तारेला स्पर्श; कंत्राटदारासह 8 मजुरांचा विजेचा धक्क्याने अंत, 5 जण जखमी
रस्त्याचे काम सुरु असतानाच मशीनचा उच्च दाबाच्या तारेला स्पर्श; कंत्राटदारासह 8 मजुरांचा विजेचा धक्क्याने अंत, 5 जण जखमी
Embed widget