Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
Akshaye Khanna Mahakali: अक्षय खन्ना हा 'महाकाली' सिनेमातून तेलुगु सिनेसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज.

Akshaye Khanna Mahakali Shukracharya: बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्नाच्या (Akshaye Khanna) करिअरमध्ये सुगीचे दिवस आले आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 'दृश्यम 2', 'छावा', 'धुरंधर' (Dhurandhar) आणि 'इक्का' यांसारख्या सिनेमात त्याने दमदार भूमिका साकारली. या ब्लॉकबस्टर सिनेमांना मिळालेल्या यशानंतर अक्षय खन्ना लवकरच आणखी एका नव्या रोलमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अभिनेता आता एका पूर्णपणे नवीन अवतारात प्रेक्षकांना भेटण्यास सज्ज झाला आहे. अक्षय खन्ना पौराणिक कथेवर आधारीत आगामी तेलुगु सिनेमा 'महाकाली' मधून तेलुगु चित्रपटसृष्टीत (Entertainment) पदार्पण करण्यास तयार आहे. नुकतेच, या सिनेमाच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या बहुप्रतिक्षित प्रोजेक्टची पहिली अधिकृत झलक 24 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांसमोर सादर केली जाणार आहे. सध्या अक्षय खन्नाचे चाहते, त्याच्या आगामी प्रोजेक्टसाठी आतुर आहेत.
अक्षय खन्नाचा 'महाकाली'मधून रौद्ररुप समोर, चाहते उत्सुक (Akshaye Khanna is set to make his Telugu debut Film Mahakali)
दिग्दर्शक प्रशांत वर्मा आणि आरकेडी स्टुडिओजने एक पोस्ट शेअर केली. तेव्हापासून 'महाकाली' या सिनेमाची चर्चा रंगू लागली. या पोस्टला कॅप्शनही देण्यात आलं आहे. '24 ऑगस्ट - द एंड बिगिन्स', असं कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे. या कॅप्शनसह अक्षय खन्नाचा पौराणिक पात्र 'शुक्राचार्य' यांच्या भूमिकेतील फर्स्ट लूकही समोर आला आहे. अक्षय खन्नाचा 'महाकाली' या सिनेमातील फर्स्ट लूक समोर येताच इंटरनेटवर खळबळ उडाली. या सिनेमात अक्षय खन्नाने राक्षसांचे महान गुरू आणि एक शक्तीशाली विद्वान असलेल्या 'शुक्राचार्य' यांची भूमिका साकारली आहे. ही भूमिका त्याने यापूर्वी साकारलेल्या कोणत्याही भूमिकेपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे.
अक्षय खन्नाला या लूकमध्ये ओळखणं अनेकांना जवळपास अशक्य झाले आहे. अक्षय खन्नाच्या नवीन लूकमध्ये लांब दाढी, विस्कटलेले केस, डोक्यावर अंबाडा बांधलेला दिसत आहे. अक्षय खन्नाच्या कपाळावर त्रिपुंड दिसत आहे. तसेच त्यावर मोठा टीळा आहे. त्याच्या शरीरावर पारंपारिक दागिने दिसत आहेत. पौराणिक अवतारात अक्षय खन्ना पूर्णपणे वेगळा दिसत आहे. त्याच्या आगामी सिनेमातील लूकची सध्या प्रचंड चर्चा होत आहे. या सिनेमात अक्षय खन्नाला ओळखणं कठीण झालं आहे.
View this post on Instagram
अक्षय खन्नाला अनोख्या रोलमध्ये पाहण्यासाठी त्याचे चाहते आतुर आहेत. प्रशांत वर्मा यांच्या पोस्टवर सध्या प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. 'अक्षय खन्नाच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम टप्पा', असं एकाने कमेंटमध्ये म्हटलं आहे. यापूर्वी मार्च 2026 रोजी, दिग्दर्शक प्रशांत वर्मा यांनी अक्षय खन्नाच्या वाढदिवसानिमित्त त्याचे भरभरुन कौतुक केले होते. त्यांनी अक्षय खन्नाचे कौतुक करत लिहिले की, 'अक्षय खन्ना हा एक खरा कलाकार आहे. ते हे सिद्ध करतात की खऱ्या प्रतिभेला कोणत्याही गाजावाजाची गरज नसते आणि त्यांच्यासोबत काम करणे ही अत्यंत सन्मानाची बाब आहे'.
महत्त्वाच्या इतर बातम्या:






















