Musician Ravi Dey: प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
Musician Ravi Dey Death: प्रसिद्ध संगीतकार रवि डे यांच्या मृत्यूनंतर संगीत विश्वात खळबळ.

Musician Ravi Dey Death: राजधानी दिल्लीतील (Delhi) कालकाजी पोलीस ठाण्याच्या हद्दीत (गोविंदपुरी एक्सटेंशन) येथून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. संगीत विश्वाला (Music Industry) हादरवणारी बातमी समोर आली आहे. अनेक वर्षे संगीत तयार करणारे प्रसिद्ध संगीतकार रवी डे (Ravi Dey) यांचा मृत्यू झाला आहे. दुर्देव म्हणजे, रवी डे यांचा मृतदेह त्यांच्या भाड्याच्या खोलीत जवळपास पाच दिवस सडत असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्य म्हणजे पाच दिवस (Entertainment) त्यांच्याकडे कुणाचेही लक्ष नव्हते. अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर लाजपत नगर येथे त्यांची मुलं राहतात. त्यांच्या मुलांनीही त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्याची तसदी घेतलेली नाही.
तब्बल 5 दिवसांनंतर रवि डे यांचा मृतदेह भाड्याच्या खोलीत सडलेल्या अवस्थेत सापडला (Musician Ravi Dey found dead in Delhi rented home)
मिळालेल्या माहितीनुसार, रवी डे हे गोविंदपुरी एक्सटेंशनमधील एका भाड्याच्या घरात एकटे राहत होते. 14 ऑगस्ट रोजी रवी डे यांच्या घरातून असह्य दुर्गंधी येऊ लागली होती. यानंतर त्यांचे शेजारी घाबरले होते. त्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी लोखंडी कुलूप तोडले. तसेच आत प्रवेश केला. खोलीतील दृश्ये पाहून शेजारचे काही लोक, तसेच पोलीसही घाबरले. घराच्या मेन गेटवर रवि डे यांचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडला. त्यांचा मृतदेह जमिनीवर पडलेला होता.
पोलिसांनी परिसर सील केला. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी AIIMS रुग्णालयात पाठवले. 16 ऑगस्ट रोजी त्यांच्या मृतदेहाच्या पोस्टमार्टमची प्रक्रिया पूर्ण झाली. यानंतर मुलांना याची माहिती देण्यात आली. मुलांनी रात्रीच्या वेळेस येण्यास नकार दिला. दुसऱ्या दिवशीही त्यांची मुलं आली नाहीत. रवि डे यांच्या मृत्यूबाबत माहिती मिळाल्यानंतरही त्यांची मुलं का आली नाहीत? सध्या हा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झालाय.
सर्वात दु:खद घटना तेव्हा घडली, जेव्हा रवि डे यांच्या मुलांशी संपर्क साधण्यात आला होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रवि डे यांचा मृतदेह खोलीत सडलेल्या अवस्थेत सापडल्यानंतर त्यांच्या मुलांशी संपर्क साधण्यात आला. परंतु, त्यांनी पोलिसांना सांगितले की, त्यांचा त्यांच्या वडिलांशी काहीही संबंध नाही. रवि डे यांच्या मुलांनी त्यांचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. दरम्यान, पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना समजवल्यानंतर आणि समुपदेशन केल्यानंतर कुटुंब तयार झाले. शवविच्छेदनानंतर मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:






















