एक्स्प्लोर

Bollywood Villains:  ना अमरीश पुरी, ना अमजद खान...या तीन कलाकारांनी साकारलाय धडकी भरवणारा खलनायक

Bollywood Villains:   बॉलिवूडमध्ये खलनायक म्हटले की अमजद खान आणि अमरीश पुरी यांचा चेहरा समोर येतो. पण, असे काही कलाकार आहेत, ज्यांनी अभिनेता म्हणून काम करताना खलनायकाच्या भूमिकेत रंग भरले.

Bollywood top 3 Villains:   कोणत्याही चित्रपटातील नायक-नायिका लोकांना कितीही आवडत असली तरी त्यात खलनायक नसेल तर चित्रपट पाहण्यात अजिबात मजा नाही. कारण प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात  खलनायकाचा महत्त्वाचा वाटा असतो. खलनायक धोकादायक असेल तर तो चित्रपट पाहण्याची लोकांमध्ये क्रेझ वाढते. बॉलिवूडमध्ये खलनायक म्हटले की  अमजद खान आणि अमरीश पुरी यांचा चेहरा समोर येतो. पण, असे काही कलाकार आहेत, ज्यांनी अभिनेता म्हणून काम करताना खलनायकाच्या भूमिकेत रंग भरले. 

बॉलीवूडमधील सर्वात भयानक खलनायक कोण आहे?

चित्रपटांमध्ये असणारा खलनायक जेवढा ताकदीचा,  भयंकर असेल तेवढेच चित्रपट पाहण्यास मज्जा येते. चित्रपटातील नायका ऐवढंच महत्त्व हे खलनायकाचे असते. काही चित्रपटांमध्ये खलनायकी व्यक्तीरेखांनी आपली छाप सोडली आहे. काही खलनायकी व्यक्तीरेखा अजूनही लोकांच्या लक्षात आहेत.  

'सरफरोश'चा खलनायक

1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या  'सरफरोश' चित्रपटाचे दिग्दर्शन जॉन मॅथ्यू मॅथन यांनी केले होते. या चित्रपटात आमिर खानने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. सोनाली बेंद्रेने त्याच्या प्रेयसीची  भूमिका साकारली होती. या चित्रपटात मुख्य खलनायकाची भूमिका नसिरुद्दीन शाह यांनी केली होती.

साधारपणे चित्रपटात खलनायक हा आरडाओरड करताना, दात-ओठ खाताना दिसतो. मात्र, या चित्रपटात शांत पण कपटी, कटकारस्थाने रचणारा दाखवला आहे. हा खलनायक प्रसिद्ध गायक आहे, गझल गातो, लोकांची मने जिंकतो. पण चित्रपटाच्या मध्यतरानंतरही तोच खलनायक आहे, हे कळत नाही. नसिरुद्दीन शहा हे प्रचंड ताकदीचे अभिनेते आहेत. त्यांनी ही व्यक्तीरेखा चांगल्या प्रकारे साकारली आहे. हा चित्रपट प्राईम व्हिडीओवर पाहता येऊ शकतो. 

'संघर्ष' मधील खलनायक

1999 मध्ये रिलीज झालेला 'संघर्ष' हा चित्रपट तनुजा चंद्रा यांनी दिग्दर्शित केला होता. अक्षय कुमार आणि प्रीती झिंटा या चित्रपटात मुख्य भूमिका होती.  परंतु चित्रपट हिट होण्याचे अर्ध्याहून अधिक श्रेय त्याच्या खलनायकाला म्हणजेच आशुतोष राणाला गेले. आशुतोष राणाने या चित्रपटात खलनायकाची इतकी भयानक भूमिका साकारली होती की त्या काळातील मुलेही त्याला घाबरू लागली होती.

आशुतोष राणाने 'दुष्मन' (1998) या चित्रपटात खलनायकाची भूमिकाही साकारली होती, तीही खूप भयानक होती. हे दोन चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर 90 च्या दशकातील मुलांना त्याची भीती वाटू लागली आणि हेच त्याच्या जबरदस्त अभिनयाचे उदाहरण आहे. हा चित्रपट तुम्ही यूट्यूबवर मोफत पाहू शकता.

'मर्डर 2' मधील खलनायक

2011 मध्ये रिलीज झालेल्या  मर्डर-2 या चित्रपटाचे दिग्दर्शन मोहित सुरी याने केले होते. या चित्रपटात आ इम्रान हाश्मीची प्रमुख भूमिका होती. चित्रपटातील गाणीदेखील गाजली होती. पण, या चित्रपटात खलनायकाने छाप सोडली. अभिनेता प्रशांत नारायण याने खलनायकाची भूमिका साकारली होती. प्रशांत नारायण हा चित्रपटात सायको किलर असतो. यात तो मुलींच्या हत्या करत असतो. 

या चित्रपटामुळे प्रशांत नारायणची चांगलीच चर्चा रंगली. त्याने याआधीदेखील खलनायकाची भूमिका  साकारली होती. पण, 'मर्डर-2'मधील भूमिका चांगलीच गाजली. हा चित्रपट प्राईम व्हिडीओवर पाहता येईल. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्र्यांचे निर्देश, मंत्री शंभूराज देसाईंनी बोलावली तातडीची बैठक, मराठा, धनगर आणि मातंग समाजाच्या मागण्यांचा आढावा घेणार 
मुख्यमंत्र्यांचे निर्देश, मंत्री शंभूराज देसाईंनी बोलावली तातडीची बैठक, मराठा, धनगर आणि मातंग समाजाच्या मागण्यांचा आढावा घेणार 
Petrol Diesel Rate : मोठी बातमी! महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल स्वस्त होणार? कधी आणि किती रुपयांची घसरण होणार?
मोठी बातमी! महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल स्वस्त होणार? कधी आणि किती रुपयांची घसरण होणार?
Badlapur Panvel Tunnel: आईशप्पथ! मुंबई ते बदलापूर प्रवास फक्त 40 मिनिटांत, 'या' बोगद्यामुळे पनवेल फक्त 20 मिनिटांत गाठता येणार
आईशप्पथ! मुंबई ते बदलापूर प्रवास फक्त 40 मिनिटांत, 'या' बोगद्यामुळे पनवेल फक्त 20 मिनिटांत गाठता येणार
तुमच्या पोटातलं  ओठावर आलं, राहुल गांधींनी चैत्यभूमीवर नाक घासून माफी मागावी, खासदार नरेश म्हस्केंचं पत्र 
तुमच्या पोटातलं ओठावर आलं, राहुल गांधींनी चैत्यभूमीवर नाक घासून माफी मागावी, खासदार नरेश म्हस्केंचं पत्र 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या Top 70 at 7AM 20 Sept 2024सकाळी ७ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 7AM 20 September 2024ABP Majha Headlines : 11 PM : 19 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 10 PM 19 September 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुख्यमंत्र्यांचे निर्देश, मंत्री शंभूराज देसाईंनी बोलावली तातडीची बैठक, मराठा, धनगर आणि मातंग समाजाच्या मागण्यांचा आढावा घेणार 
मुख्यमंत्र्यांचे निर्देश, मंत्री शंभूराज देसाईंनी बोलावली तातडीची बैठक, मराठा, धनगर आणि मातंग समाजाच्या मागण्यांचा आढावा घेणार 
Petrol Diesel Rate : मोठी बातमी! महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल स्वस्त होणार? कधी आणि किती रुपयांची घसरण होणार?
मोठी बातमी! महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल स्वस्त होणार? कधी आणि किती रुपयांची घसरण होणार?
Badlapur Panvel Tunnel: आईशप्पथ! मुंबई ते बदलापूर प्रवास फक्त 40 मिनिटांत, 'या' बोगद्यामुळे पनवेल फक्त 20 मिनिटांत गाठता येणार
आईशप्पथ! मुंबई ते बदलापूर प्रवास फक्त 40 मिनिटांत, 'या' बोगद्यामुळे पनवेल फक्त 20 मिनिटांत गाठता येणार
तुमच्या पोटातलं  ओठावर आलं, राहुल गांधींनी चैत्यभूमीवर नाक घासून माफी मागावी, खासदार नरेश म्हस्केंचं पत्र 
तुमच्या पोटातलं ओठावर आलं, राहुल गांधींनी चैत्यभूमीवर नाक घासून माफी मागावी, खासदार नरेश म्हस्केंचं पत्र 
Horoscope Today 20 September 2024 : आज पितृ पक्षाचा तिसरा दिवस; हा दिवस तुमच्यासाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज पितृ पक्षाचा तिसरा दिवस; हा दिवस तुमच्यासाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Astrology : आज सुनफा योगासह बनले अनेक शुभ योग; वृषभसह 5 राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा, अचानक धनलाभाचे संकेत
आज सुनफा योगासह बनले अनेक शुभ योग; वृषभसह 5 राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा, अचानक धनलाभाचे संकेत
Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Horoscope Today 20 September 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? वाचा तुमचे आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? वाचा तुमचे आजचे राशीभविष्य
Embed widget