एक्स्प्लोर

Kangana Ranaut : देशभरात 'इमर्जन्सी' लागणार, अभिनेत्री कंगना राणौतने दिली गुडन्यूज, सेन्सॉर बोर्डाची चित्रपटाला मंजुरी

Kangana Ranaut : सेन्सॉरने सूचवलेल्या बदलानुसार इमर्जन्सी चित्रपटात काही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे, सेन्सॉरने आता या चित्रपटाला हिरवा कंदील दिला आहे.

Kangana Ranaut : मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौतला सेन्सॉर बोर्डाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेला अभिनेत्री कंगना राणौतचा (Kangana Ranaut) बहुचर्चित इमर्जन्सी चित्रपट आता लवकरच प्रदर्शित होणार आहे. स्वत: अभिनेत्रीने याबाबत सोशल मीडियातून माहिती दिली आहे. कंगानाने आपल्या इंस्टाग्राम स्टेटसला आणि ट्वटिरला इमर्जन्सी चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे, ही माहिती देताना मला अत्यानंद होत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे, कंगना रणौतच्या इमर्जन्सी चित्रपटाचा मार्ग मोकळा झाला आहे. अखेर सेन्सॉर बोर्डानं इमर्जन्सी (Emergency) चित्रपटाबाबत घेतलेल्या आक्षेपानंतर दुरूस्ती होताच या चित्रपटाच्या प्रदर्शनाला मंजुरी दिली आहे. यापूर्वी सेन्सॉरने U/A सर्टिफिकेटही दिलं आहे. इमर्जन्सी चित्रपटाची तारीख जाहीर झाल्यानंतरही हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीत अडकला होता. त्यामुळे, चित्रपट नेमका कधी प्रदर्शित होणार, होणार की नाही याची चर्चा बॉलिवूडसह राजकीय वर्तुळात रंगली होती. 

सेन्सॉरने सूचवलेल्या बदलानुसार इमर्जन्सी चित्रपटात काही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे, सेन्सॉरने आता या चित्रपटाला हिरवा कंदील दिला आहे. यापूर्वी हा चित्रपट 6 सप्टेंबरला रिलीज होणार होता. मात्र, सेन्सॉरचं प्रमाणपत्र न मिळाल्याने चित्रपट प्रदर्शित होण्याचा मुहूर्त हुकला होता. आता, अखेर या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाचं प्रमाणपत्र मिळालं आहे. तसेच, सेन्सॉरने मंजुरी दिल्यामुळे लवकरच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर होईल, असेही कंगनाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सांगितलं आहे. दरम्यान, यापूर्वीदेखील सेन्सॉर बोर्डाने इमर्जन्सी चित्रपटाला रिलीज करण्याची परवानगी दिली होती, पण यासाठी काही कडक सूचनाही दिल्या. रिलीजपूर्वी इमर्जन्सी चित्रपटात 10 मोठे बदल करावे लागणार असल्याचे सांगण्यात आले होते. यासोबतच चित्रपटातून तीन मोठे सीन कापावे लागणार आहेत. या बदलांसोबतच चित्रपटात जिथे वादग्रस्त विधाने असतील तिथे वस्तुस्थिती दाखवावी, असंही सेन्सॉर बोर्डाने म्हटलं होतं. त्यानुसार, चित्रपटात बदल करण्यात आले आहेत. 

चित्रपटाला प्रदर्शनापूर्वीच विरोध

अभिनेत्री कंगना रणौतचा इमर्जन्सी हा चित्रपट बराच काळ वादात अडकला होता. या चित्रपटाला विरोध करत ठिकठिकाणी निदर्शनही करण्यात आली. आता अखेर चित्रपटाच्या रिलीजचा मार्ग मोकळा झाला आहे. सेन्सॉर बोर्डाने (CBFC) इमर्जन्सी चित्रपटाला U/A प्रमाणपत्र दिलं आहे. यासोबतच चित्रपटातील काही सीन्स काढून टाकावे लागतील, अशा स्पष्ट सूचनाही निमार्त्यांना देण्यात आल्या आहेत.

चित्रपटाची तारीख अनेकदा बदलली

इमर्जन्सी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अनेकदा बदलण्यात आली आहे. इमर्जन्सी चित्रपटाची रिलीज डेट आधी लोकसभा निवडणुकीमुळे पुढे ढकलण्यात आली होती. हा चित्रपट 6 सप्टेंबरला प्रदर्शित होणार होता, मात्र त्यानंतर सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र न मिळाल्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. यासोबतच शीख समुदायाचा विरोधही पाहता, चित्रपट पुढे ढकलणे आवश्यक मानलं गेलं.

हेही वाचा

धक्कादायक ! खासगी रुग्णालयांत तब्बल 1169 सीजर, रुग्णांची लूट; डॉक्टरांना आरोग्य विभागाची नोटीस

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Aus : टीम इंडिया संकटात! कर्णधार रोहित शर्माचा निर्णय ठरला चुकीचा, 2193 दिवसांनी सहाव्या क्रमांकावर आला, पण...
टीम इंडिया संकटात! कर्णधार रोहित शर्माचा निर्णय ठरला चुकीचा, 2193 दिवसांनी सहाव्या क्रमांकावर आला, पण...
महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला पण आमचं ठरलं होतं, संजय राऊतांना कवडीची किंमत नाही, संजय शिरसाटांचा हल्लाबोल
महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला पण आमचं ठरलं होतं, संजय राऊतांना कवडीची किंमत नाही, संजय शिरसाटांचा हल्लाबोल
Australia vs India, 2nd Test : मिशेल स्टार्कचा किंग कोहलीला गुलिगत धोका, शिकार होताच बघतच राहिला!
Video : मिशेल स्टार्कचा किंग कोहलीला गुलिगत धोका, शिकार होताच बघतच राहिला!
Simhastha Kumbh Mela : कुंभमेळ्याच्या खर्चासाठी घेतला हात आखडता? नाशिक मनपाचा आराखडा 15 हजारांवरुन सात हजार कोटींवर; नेमकं कारण काय?
कुंभमेळ्याच्या खर्चासाठी घेतला हात आखडता? नाशिक मनपाचा आराखडा 15 हजारांवरुन सात हजार कोटींवर; नेमकं कारण काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 06 December 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्सCM Devendra Fadanvis Interview : मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली मुलाखत EXCLUSIVEABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 06 December 2024 दुपारी १२ च्या हेडलाईन्सCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 6  डिसेंबर 2024 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs Aus : टीम इंडिया संकटात! कर्णधार रोहित शर्माचा निर्णय ठरला चुकीचा, 2193 दिवसांनी सहाव्या क्रमांकावर आला, पण...
टीम इंडिया संकटात! कर्णधार रोहित शर्माचा निर्णय ठरला चुकीचा, 2193 दिवसांनी सहाव्या क्रमांकावर आला, पण...
महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला पण आमचं ठरलं होतं, संजय राऊतांना कवडीची किंमत नाही, संजय शिरसाटांचा हल्लाबोल
महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला पण आमचं ठरलं होतं, संजय राऊतांना कवडीची किंमत नाही, संजय शिरसाटांचा हल्लाबोल
Australia vs India, 2nd Test : मिशेल स्टार्कचा किंग कोहलीला गुलिगत धोका, शिकार होताच बघतच राहिला!
Video : मिशेल स्टार्कचा किंग कोहलीला गुलिगत धोका, शिकार होताच बघतच राहिला!
Simhastha Kumbh Mela : कुंभमेळ्याच्या खर्चासाठी घेतला हात आखडता? नाशिक मनपाचा आराखडा 15 हजारांवरुन सात हजार कोटींवर; नेमकं कारण काय?
कुंभमेळ्याच्या खर्चासाठी घेतला हात आखडता? नाशिक मनपाचा आराखडा 15 हजारांवरुन सात हजार कोटींवर; नेमकं कारण काय?
Australia vs India, 2nd Test : मिशेल स्टार्क पुन्हा काळ बनून आला; यशस्वी जैस्वाल पहिल्याच बाॅलवर अन् किंग कोहली, राहुलची स्वस्तात शिकार!
मिशेल स्टार्क पुन्हा काळ बनून आला; यशस्वी जैस्वाल पहिल्याच बाॅलवर अन् किंग कोहली, राहुलची स्वस्तात शिकार!
Fake Doctor Racket in Gujarat : गुजरातमध्ये 70 हजारात फेक वैद्यकीय डिग्री देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! 14 बोगस डॉक्टर अटकेत, आठवी पासवाल्याकडूनही उपचार
गुजरातमध्ये 70 हजारात फेक वैद्यकीय डिग्री देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! 14 बोगस डॉक्टर अटकेत, आठवी पासवाल्याकडूनही उपचार
Kolhapur News : कोल्हापुरात विषबाधेनं दोन घटनांत पाच जणांचा मृत्यू; दोन सख्खे भाऊ अन् दोन सख्ख्या चिमुकल्यांचा अंत झाल्याने संशय बळावला
कोल्हापुरात विषबाधेनं दोन घटनांत पाच जणांचा मृत्यू; दोन सख्खे भाऊ अन् दोन सख्ख्या चिमुकल्यांचा अंत झाल्याने संशय बळावला
Ind vs Aus Pink Ball Test : पहिलाच चेंडू अन् ज्याची भीती तेच घडलं, मिचेल स्टार्क नावाचं वादळ घोंघावलं; जैस्वाल पुन्हा शून्यावर बाद!
पहिलाच चेंडू अन् ज्याची भीती तेच घडलं, मिचेल स्टार्क नावाचं वादळ घोंघावलं; जैस्वाल पुन्हा शून्यावर बाद!
Embed widget