एक्स्प्लोर

Prabhas Padmavat Kissa: फक्त किंग खानसोबतचीच नाही, तर प्रभासनं नाकारलेली रणवीरसोबतची फिल्म; 'पद्मावत'मध्ये झालेला 'हा' रोल ऑफर

अभिनेता रणवीर सिंहनं 'पद्मावत'मध्ये आपल्या दमदार अभिनयानं लोकांची मनं जिंकली. पण तुम्हाला माहीत आहे का? या चित्रपटात साऊथचा सुपरस्टार प्रभासही दिसणार होता. पण त्यानं ऑफर नाकारली, कारण काय?

Prabhas Padmavat Kissa: संजय लीला भन्साली (Sanjay Leela Bhansali) यांचा 'पद्मावत' (Padmaavat) हा चित्रपट बॉलिवूडमधील (Bollywood) बंपर हिट चित्रपटांपैकी एक. हा चित्रपट इतिहासात डोकावतो. या चित्रपटातील सर्वच व्यक्तिरेखांनी उत्तम भूमिका साकारल्यात, त्यामुळे सर्वच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का? या चित्रपटातील रतन सिंह यांच्या भूमिकेसाठी शाहीद कपूर निर्मात्यांची पहिली पसंती नव्हता. खरंतर, बाहुबली पाहिल्यानंतर भन्साळींना या भूमिकेसाठी प्रभासला (Prabhas) कास्ट करायचं होतं. पण प्रभासनं दीपिकासोबत स्क्रिन शेअर करण्यास त्यावेळी स्पष्ट नकार दिला होता. 

शाहिदच्या आधी प्रभासला रतन सिंह यांची भूमिका ऑफर 

संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावतनं बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा निर्माण केला होता. या चित्रपटानं 300 कोटींहून अधिक कमाई केली होती. या चित्रपटात रणवीर सिंह, दीपिका पदुकोण आणि शाहिद कपूरसह अनेक दिग्गज कलाकारांनी काम केलं होतं. या ब्लॉकबस्टर चित्रपटातून रणवीर सिंहच्या रूपानं इंडस्ट्रीला एक नवा स्टार मिळाला होता.

शाहिद कपूरनं पद्मावत चित्रपटात महारावल रतन सिंह यांची भूमिका साकारली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भन्साळी यांना या भूमिकेसाठी प्रभासला कास्ट करायचं होतं. 'बाहुबली' चित्रपटातील प्रभासच्या अभिनयानं भन्साळी खूपच प्रभावित झाले होते. पण, प्रभासनं पद्मावतमध्ये काम करण्यास स्पष्ट नकार दिला.  

दीपिकामुळे प्रभासनं चित्रपट नाकारला?

दरम्यान, जेव्हा प्रभासला पद्मावत चित्रपट ऑफर करण्यात आला, तेव्हा तो बाहुबलीच्या सिक्वेलची तयारी करत होता. प्रभासला भन्साळींसारख्या दिग्गज दिग्दर्शकासोबत काम करायचं होतं, पण त्याला रणवीर आणि दीपिकासारखी महत्त्वाची भूमिका हवी होती. त्याला रतन सिंगची भूमिका फारशी आवडली नाही, शेवटी प्रभासनं या चित्रपटासाठी नकार दिला, त्यानंतर भन्साळींनी शाहिद कपूरला हा चित्रपट ऑफर केला. शाहीदनं पडद्यावर ही भूमिका साकारली, शाहीदची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली. 

किंग खानसोबतचा चित्रपटही प्रभासनं नाकारला

प्रभास हा साऊथ इंडस्ट्रीमधील बड्या कलाकारांपैकी एक. अनेक चित्रपटांमध्ये प्रभासनं आपल्या अभिनयानं ठसा उमटवला आहे. अनेक निर्माते प्रभाससाठी मोठी रक्कम मोजायला तयार असतात. साऊथचा यशस्वी अभिनेता असूनही प्रभासनं आजपर्यंत एकाही बॉलिवूड चित्रपटात काम केलेलं नाही. अलिकडेच पठाणच्या दिग्दर्शकानं प्रभासला एका आगामी बॉलिवूडपटाची ऑफर दिली होती. यामध्ये शाहरुख खानदेखील झळकणार होता. पण, त्यानं ऑफर नाकारली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अलिकडेच त्यानं दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्या एका मोठ्या चित्रपटाची ऑफर नाकारली. या चित्रपटात शाहरुख खानसोबत प्रभास दिसणार होता, पण प्रभासनं स्पष्ट नकार कळवला. तो म्हणाला की, त्याला मल्टीस्टाररपेक्षा लीड रोल असलेले चित्रपट करायला आवडतात. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Prabhas Rejected Shah Rukh Khan Film: बाहुबलीनं धुडकावली किंग खानची फिल्म; मोठ्ठं कारण देत प्रभासनं नाकारली शाहरुख खानसोबतची ब्लॉकबस्टर ऑफर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापुरात पहिला विजयी गुलाल इचलकरंजीत! शेवटपर्यंत कोणाची घालमेल सर्वाधिक होणार? कोणत्या मतदारसंघात किती फेऱ्या होणार??
कोल्हापुरात पहिला विजयी गुलाल इचलकरंजीत! शेवटपर्यंत कोणाची घालमेल सर्वाधिक होणार? कोणत्या मतदारसंघात किती फेऱ्या होणार??
Vidhansabha Election Result 2024 : पडद्यामागे गुप्त हालचाली, मविआतील एक पक्ष फुटणार; अजितदादांच्या खास व्यक्तीचा खळबळजनक दावा
पडद्यामागे गुप्त हालचाली, मविआतील एक पक्ष फुटणार; अजितदादांच्या खास व्यक्तीचा खळबळजनक दावा
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
Sanjay Raut : संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

BJP Strike Rate : मागील पाच निवडणुकांमध्ये भाजपचा स्ट्राईक रेट शिवसेनेपेक्षा जास्तPune Vidhansabha Election :  पुणेकरांना उत्सुकता; कुणाची सत्ता स्थापन होणार ?Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM : 22 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaSanjay Raut Mumbai : त्या सर्व्हेची ऐसी की तैसी, 160 जागा आम्ही जिंकणारच! राऊतांचा हल्लाबोल#abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापुरात पहिला विजयी गुलाल इचलकरंजीत! शेवटपर्यंत कोणाची घालमेल सर्वाधिक होणार? कोणत्या मतदारसंघात किती फेऱ्या होणार??
कोल्हापुरात पहिला विजयी गुलाल इचलकरंजीत! शेवटपर्यंत कोणाची घालमेल सर्वाधिक होणार? कोणत्या मतदारसंघात किती फेऱ्या होणार??
Vidhansabha Election Result 2024 : पडद्यामागे गुप्त हालचाली, मविआतील एक पक्ष फुटणार; अजितदादांच्या खास व्यक्तीचा खळबळजनक दावा
पडद्यामागे गुप्त हालचाली, मविआतील एक पक्ष फुटणार; अजितदादांच्या खास व्यक्तीचा खळबळजनक दावा
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
Sanjay Raut : संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
Ind vs Aus 1st Test : गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
Embed widget