एक्स्प्लोर

'मला सुशांतने यशराज फिल्म्स सोडण्यास सांगितले होते', रिया चक्रवर्तीचा पोलिसांना जबाब

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी त्याची मैत्रिण रिया चक्रवर्तीने मुंबई पोलिसांना जबाब दिला आहे. यात तिने अनेक महत्वाच्या गोष्टी पोलिसांना सांगितल्या आहेत. तिच्या जबाबानंतर यशराज फिल्म्स आणि सुशांत यांच्यातील कराराची कागदपत्रे पोलिसांनी मागितली आहेत.

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी त्याची मैत्रिण रिया चक्रवर्तीने मुंबई पोलिसांना जबाब दिला आहे. यात तिने अनेक महत्वाच्या गोष्टी पोलिसांना सांगितल्या आहेत. रियाने पोलिसांना सांगितले की सुशांतने तिला जवळपास एक वर्षापूर्वी यशराज फिल्म्स सोडण्यास सांगितले होते. रियाने पोलिसांना सांगितले की, 'मला सुशांतने यशराज फिल्म्स सोडण्यास सांगितले होते, सुशांत म्हणाला मी ही यशराज सोडत आहे.' सुशांत हे का बोलला, त्याला स्वत: यशराजला का सोडायचे होते? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी यशराज फिल्म्स आणि सुशांत यांच्यातील कराराची कागदपत्रे पोलिसांनी मागितली आहेत. त्याचवेळी पोलिस यशराजचे कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा यांना चौकशीसाठी बोलवण्याची तयारी करत आहेत. कसं जुळलं रिया आणि सुशांतचं नातं? रियाने सुशांत आणि त्याच्या नात्याबद्दल सांगितले की, सुशांत यशराज फिल्म्सच्या 'शुद्ध देसी रोमांस' चित्रपट करत होता आणि मी यशराज फिल्म्सच्या 'मेरे पिताजी की मारुती' च्या चित्रीकरणात होते. तेव्हा आम्ही प्रथमच भेटलो, त्यानंतर आम्ही इंडस्ट्रीच्या पार्टी आणि इवेंट्समध्ये भेटू लागले. नंतर आमची मैत्री झाली. वर्ष 2019 मध्ये सुशांतने मला प्रपोज केले. सुशांत मला म्हणाला, 'मी तुला अप्रत्यक्षपणे सांगू शकत नाही, म्हणूनच मी तुला थेट सांगत आहे. मला तू आवडते.' रियाही सुशांतला पसंत करायची, दोघांमध्ये प्रेम झालं आणि एक नातं सुरू झाले. रियाने पोलिसांना सांगितले की, सुशांतने सप्टेंबर 2019 मध्ये दिल बेचारा हा चित्रपट पूर्ण केला. हा त्याचा शेवटचा चित्रपट होता. नोव्हेंबर 2019 पासून सुशांतला नैराश्याची चिन्हे येण्यास सुरुवात झाली. हळू हळू सुशांत तुला त्रास होऊ लागला. रियाच्या म्हणण्यानुसार तिने सुशांतला डॉक्टरांकडे नेले आणि सुशांतवर उपचार सुरू केले. रियाच्या म्हणण्यानुसार सुशांत योग्य प्रकारे औषधे घेत नव्हता. सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीची पोलिसांकडून 11 तास चौकशी रियाने सुशांतसोबत राहून त्याची काळजी घेतली. पण एक दिवस सुशांतने रियाला काही दिवस वेगळं राहायला सांगितले. सुशांतने तिला सांगितले की त्याला काही दिवस एकटे राहायचे आहे. सुशांत सतत एकटे राहण्याचा आग्रह करु लागला. रियाला वाटलं की आपल्या पुस्तकात सुशांत स्वःतासाठी स्पेस शोधत असेल म्हणून रिया सुशांतच्या सांगण्यावरून काही दिवस त्याच्यापासून वेगळी राहू लागली. 'सुशांतने मला सांगितले, तो ठीक नाही' : मुकेश छाबरा रियाने सांगितले की हे आम्ही दोघेही रूमी झाफरी यांच्या दिग्दर्शनाखाली एक चित्रपट करणार होते, ज्याची निर्मिती वासू भगनानी करणार होते. ह्या चित्रपटाचं काम फेब्रुवारीमध्ये होणार होतं, त्यानंतर शुटिंग मे महिन्यात सुरू होणार होते पण लॉकडाऊनमुळे ते होऊ शकले नाही. सुशांत त्याच्या भावी प्रोजेक्टसबद्दल खूप उत्सुक होता आणि त्यावर काम करत होता. रियादेखील त्याच्या प्रोजेक्टसमध्ये मदत करत होती. पोलिस तपास बॉलिवूडच्या मोठ्या बॅनरपर्यंत पोहोचला यशराज फिल्म्सने सुशांतला औरंगजेब चित्रपटाची ऑफर दिली असल्याची माहिती त्यांच्या सूत्रांकडून पोलिसांना मिळाली आहे. पण सुशांतने चित्रपट करण्यास नकार दिला. हा चित्रपट नंतर अर्जुन कपूर यांना देण्यात आला. यशराजने नंतर सुशांतला ‘शुद्ध देसी रोमांस’ चित्रपटासाठी साइन केले. औरंगजेब चित्रपट साइन न केल्याने यशराज फिल्स सुशांत वर नाराज होते का? याचा शोध पोलिस घेत आहेत. Sushant Singh Rajput Death | फिल्म इंडस्ट्रीतील तणावामुळे सुशांत लो फील करत होता, वडिलांचा जबाब त्याचवेळी सुशांतची मॅनेजर श्रुती मोदी यांनी करण जोहर आणि सुशांत यांच्यातील एका प्रोजेक्टबद्दल महत्वाची माहिती दिली. श्रुतीच्या मते सुशांतने धर्मा प्रॉडक्शनच्या 'ड्राईव्ह' चित्रपटात काम केले. त्या चित्रपटाच्या डबिंगसाठी सुशांत तारीख देत नव्हता. यावर श्रृतीने सुशांतशी बोलणं केलं तेव्हा सुशांत म्हणाला की, मी तीनदा डबिंगसाठी तारीख दिली होती पण त्याने काही केले नाही. या चित्रपटासंदर्भात सुशांत आणि करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनमध्ये काही गडबड झाली आहे काय? याची माहिती पोलिस घेत आहेत. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येबाबत पोलीस चौकशी सुरू, बॉलिवूडमधील दिग्गजांची चौकशी होण्याची शक्यता
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aiit Pawar Supporters Join Sharad Pawar:अजितदादांचे 100कार्यकर्ते शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणारABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07PM 07 July 2024Mumbai Police on Worli Hit and Run Case : वरळीत अपघात कसा घडला? पोलिसांनी नेमकं काय सांगितलं?Manoj Jarange Parbhani Rally Drone : परभणीत जरांगेंच्या रॅलीला किती गर्दी? पाहा ड्रोन व्हिडीओ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Embed widget