एक्स्प्लोर

'सुशांतने मला सांगितले, तो ठीक नाही' : मुकेश छाबरा

सुशांत सिंह राजपूतने मुकेशबरोबर आपली अडचण, आपला त्रास शेअर करण्याचा प्रयत्न केला होता.कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांचा मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबात समोर आली माहिती.

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात बुधवारी पोलिसांनी बॉलिवूडचे प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांचा जबाब नोंदवला. मुकेश छाबरा यांनी पोलिसांना सांगितले की, '27 मे रोजी वाढदिवसाच्या दिवशी सुशांतने त्याला शुभेच्छा संदेश केला होता. मेसेजमध्ये मुकेशने सुशांतची विचारपूस केली. त्यावर सुशांतने रिप्लाय केला 'मी ठीक नाही'. मुकेशने सुशांतला याचे कारण विचारले असता सुशांतने उत्तर दिले की 'मी ठीक आहे, मी ठीक होईन’ असं उत्तर दिलं'. सुशांतने मुकेशबरोबर आपली अडचण, आपला त्रास शेअर करण्याचा प्रयत्न केला होता पण सुशांतने ते पूर्ण केले नाही. मुकेशच्या म्हणण्यानुसार सुशांत हा एक अत्यंत हुशार, अभ्यासू आणि मेहनती अभिनेता होता. जवळजवळ प्रत्येक विषयाचे त्याला ज्ञान होते. मुकेशने पोलिसांना सांगितले की, त्याने सुशांतला ‘काय पो चे’ या चित्रपटात कास्ट केले होते. तेव्हापासून त्यांचे मैत्रीचे संबंध होते. त्यानंतर मुकेशने सुशांतला पीके या चित्रपटात देखील कास्ट केले. सुशांतने या चित्रपटासाठी मोठे पैसा मागितले नव्हते कारण हा एक मोठ्या बॅनरचा चित्रपट होत. सुशांतला नेहमीच एका मोठ्या बॅनरच्या चित्रपटात काम करण्याची इच्छा होती. मुकेशच्या वक्तव्यावरून हे स्पष्ट झाले आहे की सुशांत नेहमीच मोठ्या बॅनरमध्ये जाण्यास उत्सुक होता. पण तसे होऊ शकले नाही. पीकेनंतर सुशांतला चित्रपट मिळू लागले आणि एमएस धोनीनंतर तो एक मोठा स्टार झाला, अशी माहितीही मुकेशने पोलिसांना दिली. सुशांतने मुकेशला वचन दिले होते की, तो कितीही मोठा स्टार असला तरी तो मुकेशच्या दिग्दर्शनात होणाऱ्या पहिल्या सिनेमात काम करेल. सुशांतने आपले वचन पाळले. मुकेशच्या ‘दिल बेचारा’ या पहिल्या चित्रपटात सुशांतने मुख्य भूमिका साकारली होती. सुशांतने सप्टेंबर महिन्यात चित्रपटाचे डबिंग पूर्ण केले आणि त्यानंतर त्यांच्यात फारसा संपर्क झाला नाही. मुकेश यांच्याशी सुशांतच्या व्यावसायिक तणावाबद्दल विचारले असता मुकेशने सांगितले की, जर सुशांतच्या 5-6 ते चित्रपट त्याच्याकडून काढून घेऊन त्याच्यावर बंदी घातल्यासारखे काही झालं असतं तर सुशांतने त्याला सांगितलं असतं. त्याचवेळी मुकेशने असेही सांगितले की, सुशांत त्याच्या ड्रीम 150 प्रोजेक्ट संदर्भात त्याच्या टीमसोबत काम करत होता. मुकेश यांनी सुशांतच्या ‘एमएस धोनी’ हिट चित्रपटाबद्दलही पोलिसांना माहिती दिली. मुकेशच्या म्हणण्यानुसार, सुशांत हा बिहारचा होता, जे धोनीच्या राज्याचे शेजारचे राज्य आहे, दोन राज्यांची बोलीभाषा जवळ जवळ एक सारखी आहे. ‘काय पो चे' चित्रपटातही सुशांत क्रिकेट खेळला होता. या भूमिकेसाठी सुशांत परफेक्ट होता आणि त्याला कास्ट केलं गेलं. सुशांतने हा चित्रपट स्वत:च्या मेहनतीवर आणि टॅलेंटवर मिळवला होता, असं देखील मुकेश यांनी सांगितलं.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

BMC Action At Ajay Devgn Bungalow: अजय देवगणच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर हातोडा; BMC चे अधिकारी पोहोचले, भिंती, खिडक्या धडाधड तोडल्या, नेमकं प्रकरण काय?
अजय देवगणच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर हातोडा; BMC चे अधिकारी पोहोचले, भिंती, खिडक्या धडाधड तोडल्या, नेमकं प्रकरण काय?
Koffee With Karan 9 Salman Khan: 'माझं आयुष्य माझ्यासोबतच कबरीमध्ये दफन होईल...'; सलमान खानच्या वक्तव्यानं चाहते हादरले, नेमकं काय म्हणाला?
'माझं आयुष्य माझ्यासोबतच कबरीमध्ये दफन होईल...'; सलमान खानच्या वक्तव्यानं चाहते हादरले, नेमकं काय म्हणाला?
शेक्सपियरची 400 वर्षांहून जुनी कथा, मित्र मनात संशय पेरतो, पती मधुचंद्राच्या रात्रीच पत्नीचं आयुष्य संपवतो, बॉलिवूडचा 'हा' कल्ट क्लासिक सिनेमा पाहिलाय?
शेक्सपियरची 400 वर्षांहून जुनी कथा, मित्र मनात संशय पेरतो, पती मधुचंद्राच्या रात्रीच पत्नीचं आयुष्य संपवतो, बॉलिवूडचा 'हा' कल्ट क्लासिक सिनेमा पाहिलाय?
Adinath Kothare On Ranbir Kapoor Ramayana Movie: 'सीन शूट होण्यापूर्वी रणबीरनं मला कोपरानं धक्का दिला अन्...', आदिनाथ कोठारेसोबत 'रामायण'च्या शुटिंगच्या पहिल्याच दिवशी रणबीर कपूर कसा वागला?
'सीन शूट होण्यापूर्वी रणबीरनं मला कोपरानं धक्का दिला अन्...', आदिनाथ कोठारेसोबत 'रामायण'च्या शुटिंगच्या पहिल्याच दिवशी रणबीर कपूर कसा वागला?

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
RBI : बँकिंग क्षेत्रात मोठ्या घडामोडी सुरु,दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
FDA Action : कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
Gokul Milk Union Election : आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Mira Bhayandar Municipal Corporation BJP Corporator: रुपाली मोदींनी चप्पल फेकून मारली, तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारल्याचा आरोप; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR दाखल
रुपाली मोदींनी चप्पल फेकली, तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारला; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR
Uddhav Thackeray Shivsena UBT Dasara Melava 2026: ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण मुंबई महानगरपालिकेने 24 अटी घातल्या, कोणकोणत्या अटींचं पालन करावे लागणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण BMC ने घातल्या 24 अटी!
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Embed widget