एक्स्प्लोर

Sushant Singh Rajput Death | फिल्म इंडस्ट्रीतील तणावामुळे सुशांत लो फील करत होता, वडिलांचा जबाब

फिल्म इंडस्ट्रीत सुरु असलेल्या तणावामुळे सुशांत लो फील करत होता, असं सुशांत सिंह राजपूतचे वडील केके सिंह यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबत म्हटलं आहे. सुशांतने 13 जून रोजी मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे वडील केके सिंह यांनी मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये मोठा खुलासा केला आहे. सुशांत तणावात होता आणि हे स्वत: सुशांतने आपल्याला सांगितल्याचं केके सिंह म्हणाले. "सुशांतने गेल्या काही महिन्यांत मला दोन-तीन वेळा सांगितलं होतं की चित्रपटसृष्टीत सध्या सुरु असलेल्या तणावामुळे मी लो फिल करतोय," असं सुशांतच्या वडिलांनी आपल्या जबाबात म्हटलं आहे.

दरम्यान सुशांतच्या वडिलांच्या माहितीनुसार, त्याच्या अडचणींबद्दल त्याला विचारण्याचा प्रयत्न केला. तसंच मदत करतो असंही सांगितलं होतं. परंतु मी स्वत: या समस्येतून बाहेर पडेन आणि लवकरच सर्व काही ठीक होईल, असं उत्तर त्याने दिलं. सुशांतच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार सुशांतने त्यांच्यासमोर कधी ही नैराश्य हा शब्द वापरला नाही किंवा आजारपणावरील उपचारांबद्दलही सांगितलं नाही. शिवाय त्याने कधी अशा कोणत्याही व्यक्तीचा किंवा कंपनीचा उल्लेख केला नव्हता, ज्यांच्यामुळे तो डिप्रेशनमध्ये गेला.

म्हणजेच सुशांतच्या मृत्यूनंतर फिल्म इंडस्ट्रीवर जे आरोप केले जात आहेत ते खरे आहेत. तर, इंडस्ट्रीमधील दबावामुळे सुशांत नैराश्येतच्या गर्तेत गेला का आणि हेच सुशांतच्या आत्महत्येचं कारण आहे का? या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.

सुशांतचे वडील पाटणाला परतण्यापूर्वी पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवला. पोलिसांनी एका तासात सुशांतचे वडील केके सिंह आणि दोन बहिणींचे जबाब नोंदवले. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, "हे कुटुंब धक्क्यातून सावरलेलं नव्हतं. त्यामुळे त्यांचा सविस्तर जबाब घेणं शक्य नव्हतं. परंतु आवश्यक असल्यास त्यांच्याकडून पुन्हा माहिती घेतली जाईल, जेणेकरुन सुशांतच्या मृत्यूचे कारण शोधायला मदत होईल."

पोलिसांनी आतापर्यंत सुशांतचे सहकारी, मॅनेजर, कर्मचारी आणि कुटुंबाव्यतिरिक्त काही मित्रांचे जबाब नोंदवले आहेत. पोलिसांनी मंगळवारी (16 जून) रात्री उशिरापर्यंत सुशांतच्या मॅनेजर आणि कर्मचार्‍यांना विचारणा केली. ज्यात सुशांतची मागील सहा महिन्यांमधील प्रत्येक माहिती घेण्याचा प्रयत्न केला.

पोलीस पुढच्या एक ते दोन दिवसांत सुशांतची कथित गर्लफ्रेण्ड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीचाही जबाब घेणार आहेत. रिया लॉकडाऊनच्या काळात सुशांतसोबत होती. तिच्याकडून सुशांतच्या नैराश्याविषयी महत्त्वाची माहिती मिळेल अशी पोलिसांना आशा आहे.

दुसकीकडे अभिनेत्री कंगना रनौत, दिग्दर्शक शेखर कपूर यांनीही सुशांतच्या आत्महत्येवरुन बॉलिवूडमधील अनेक बड्या व्यक्तिमत्त्वांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. एका मोठ्या बॅनरखालील चित्रपटाच्या करारावरुन सुशांत वादात साडडला होता. त्यानंतर फिल्म इंडस्ट्रीच्या बर्‍याच मोठ्या कंपन्यांनी सुशांतवर बंदी घातली, त्यानंतर सुशांत डिप्रेशनमध्ये गेला. अशा अनेक गोष्टी आता सुशांतच्या मृत्यूशी जोडल्या जात आहेत. आता या आरोपांबद्दल सत्य जाणून घेण्याचं काम मुंबई पोलीस करत आहेत.

सुशांतने आतापर्यंत केलेल्या कामांची पूर्ण माहिती पोलीस घेत आहे. सुशांतसोबत काम केलेल्या सर्व लोकांच्या नावांची यादी केली आहे. तसंच पोलीस सुशांतच्या आतापर्यंतच्या सर्व कराराचीही माहिती मिळवत आहेत.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Harshi Rasanga Complaint By Cricketer Bhanuka Rajapaksa: दिग्गज क्रिकेटरच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अभिनेत्रीला केली अटक; जबाब देताच पोलिसही चक्रावले, नेमकं प्रकरण काय?
दिग्गज क्रिकेटरच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अभिनेत्रीला केली अटक; जबाब देताच पोलिसही चक्रावले, नेमकं प्रकरण काय?
Ramayana Teaser Released: चेहऱ्यावर शांत, संयमी भाव अन् डोळ्यांतलं तेजस्वी तेज; रणबीर कपूरच्या 'रामायण'ची पहिली झलक पाहिलीत? VIDEO
चेहऱ्यावर शांत, संयमी भाव अन् डोळ्यांतलं तेजस्वी तेज; रणबीर कपूरच्या 'रामायण'ची पहिली झलक पाहिलीत?
Sonali Bendre Goldie Behl News: अभिनेत्री सोनाली बेंद्रे अडचणीत; पुण्यातील मावळच्या 30 गुंठे जागेचा वाद कोर्टात, स्थानिक शेतकऱ्याचे गंभीर आरोप
अभिनेत्री सोनाली बेंद्रे अडचणीत; पुण्यातील मावळच्या 30 गुंठे जागेचा वाद कोर्टात, स्थानिक शेतकऱ्याचे गंभीर आरोप
Sara Ali Khan Rents Out Mumbai Bungalow: फक्त एक डील अन् सारा अली खान झाली रातोरात कोट्याधीश; पाच वर्ष दर महिन्याला खात्यात जमा होणार इतके कोटी
फक्त एक डील अन् सारा अली खान झाली रातोरात कोट्याधीश; पाच वर्ष दर महिन्याला खात्यात जमा होणार इतके कोटी

व्हिडीओ

Pune Rain Update : भर दुपारी अंधार दाटला, पुण्यात वादळी वाऱ्यासह पाऊस तर काही ठिकाणी गारपीट
Sunetra Pawar on Praful Patel : प्रफुल पटेल कुठे आहेत, सुनेत्रा पवार म्हणाल्या, तुम्हालाच माहिती!
Pune Rain Update : पुण्यात अवकाळी पावसाचा तडाखा, अनेक भागात पाणी साचलं
Yugendra Pawar Baramati Election | बारामतीची पोटनिवडणूक आम्ही लढणार नाही, युगेंद्र पवारांची भूमिका
Ashok Kharat Police Custody : अशोक खरातला 7 दिवसांची पोलिस कोठडी मंजूर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Changying-8 (CY-8): इकडं इराणचा ड्रोन अमेरिकेच्या फायटर जेटला सुद्धा भेदता येईना अन् तिकडं चीनकडून तब्बल 7 टन वजनी कार्गो ड्रोनची यशस्वी चाचणी, रेंज पाहून धडकी भरायची वेळ आली!
Video: इकडं इराणचा ड्रोन अमेरिकेच्या फायटर जेटला सुद्धा भेदता येईना अन् तिकडं चीनकडून तब्बल 7 टन वजनी कार्गो ड्रोनची यशस्वी चाचणी, रेंज पाहून धडकी भरायची वेळ आली!
Andhra Pradesh Assembly Election: अवघ्या 6 सेकंदांत मतदान, मध्यरात्रीनंतर 4 टक्के मते नोंदवली गेली; आंध्र प्रदेश निवडणुकीवरून अत्यंत गंभीर आरोप
अवघ्या 6 सेकंदांत मतदान, मध्यरात्रीनंतर 4 टक्के मते नोंदवली गेली; आंध्र प्रदेश निवडणुकीवरून अत्यंत गंभीर आरोप
संतापनजक! महिलेकडे शरीरसुखाची मागणी, आरोपी पोलीस अधिकाऱ्याचा थाट; प्यायला बिस्लेरी, मोबाइलही वापरतो
संतापनजक! महिलेकडे शरीरसुखाची मागणी, आरोपी पोलीस अधिकाऱ्याचा थाट; प्यायला बिस्लेरी, मोबाइलही वापरतो
Ashok Kharat: भोंदू अशोक खरातचा आणखी एक कारनामा; रुपाली चाकणकरांच्या बहिण अन् पुतण्याच्या नावे बनावट अकाऊँट
भोंदू अशोक खरातचा आणखी एक कारनामा; रुपाली चाकणकरांच्या बहिण अन् पुतण्याच्या नावे बनावट अकाऊँट
Parth Pawar: सुनेत्रा पवार म्हणाल्या, प्रफुल पटेल कुठे आहेत तुम्हालाच माहिती, आता पार्थ पवार म्हणतात, तटकरे-पटेलांविरोधातील बातम्या निराधार!
सुनेत्रा पवार म्हणाल्या, प्रफुल पटेल कुठे आहेत तुम्हालाच माहिती, आता पार्थ पवार म्हणतात, तटकरे-पटेलांविरोधातील बातम्या निराधार!
Gold Silver Rate : सोन्याच्या दरातील घसरण थांबेना, सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 15000 रुपयांची घसरण, जाणून घ्या नवे दर
सोन्याच्या दरातील घसरण थांबेना, सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 15000 रुपयांची घसरण, जाणून घ्या नवे दर
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये जोरदार पाऊस, अवकाळीने झोडपलं; रस्त्यावर पाणी, वाहनं जागेवरच थांबली, पाहा PHOTOS
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये जोरदार पाऊस, अवकाळीने झोडपलं; रस्त्यावर पाणी, वाहनं जागेवरच थांबली, पाहा PHOTOS
Chhatrapati Sambhajinagar Crime: मृदंगाचार्य लघाणे महाराजांच्या पत्नीने संपवलं जीवन; पतीकडून धमक्या, अनैतिक संबंधामुळे विवाहिता त्रस्त
मृदंगाचार्य लघाणे महाराजांच्या पत्नीने संपवलं जीवन; पतीकडून धमक्या, अनैतिक संबंधामुळे विवाहिता त्रस्त
Embed widget