एक्स्प्लोर

Salman Khan: बिश्नोईकडून सलमानला पुन्हा धमकी; वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार, भाईजानच्या घराबाहेर पोलिसांचा खडा पहारा

Salman Khan: शनिवारी (19 मार्च) दुपारी सलमानच्या (Salman Khan) ऑफिसच्या मेल आयडीवर एक ई-मेल पाठवण्यात आला. सलमानला धमकी मिळाल्यानंतर त्याच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आली आहे.

Salman Khan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खानला (Salman Khan) लॉरेन्स बिश्नोई गँगकडून पुन्हा धमकी देण्यात आली आहे. याबाबत मुंबईतील (Mumbai) वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईसह (Lawrence Bishnoi) तीन जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. शनिवारी (19 मार्च) दुपारी सलमानच्या ऑफिसच्या मेल आयडीवर एक ई-मेल पाठवण्यात आला. त्यामध्ये सलमानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तसंच, एबीपी सांझाचे संपादक जगविंदर पटियाल यांनी काही दिवसांपूर्वी लॉरेन्सची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीचा उल्लेखही ई-मेलमध्ये आढळला आहे. सलमाननं ही मुलाखत पाहिली असेलच, नसेल पाहिली तर लगेच पाहायला सांगा, असंही या हिंदीत लिहिलेल्या ई-मेलमध्ये लिहिलं होतं. 

सलमान खानला धमकी मिळाल्यानंतर त्याच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आली आहे. रात्रभर मुंबई पोलीस हे सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर गस्त घालत होते. सलमानच्या घराबाहेर म्हणजेच गॅलक्सी अपार्टमेंट बाहेर गर्दी होणार नाही, याची खबरदारी पोलीस घेत आहेत. 

ई-मेल पाठवून देण्यात आली धमकी

"गोल्डी भाईला (गोल्डी ब्रार) तुमचा बॉस सलमानशी बोलायचं आहे. तुम्ही मुलाखत (लॉरेन्स बिश्नोई) पाहिलीच असेल. कदाचित पाहिली नसेल, तर मला सांगा.  मॅटर क्लोज करायचा असेल तर फेस टू फेस चर्चा करायला हवी. आता वेळ आहे म्हणून सांगितलं, पुढच्या वेळी झटका देणार.", असं सलमानला पाठवण्यात आलेल्या धमकीच्या ई-मेलमध्ये लिहिण्यात आलं आहे. रोहित गर्ग या आयडीवरुन हा मेल आला सलमानला पाठवण्यात आला आहे. 

धमकीचा ई-मेल आल्यानंतर सलमान खानच्या टीमने या संदर्भात गुन्हा नोंद केला आहे. त्यानंतर मुंबईतील वांद्रे पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 120 बी, 506 (2) आणि 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. हा ई-मेल एका टोळीकडून आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मुंबई पोलिसांनी गँगस्टर गोल्डी ब्रार, लॉरेन्स बिश्नोई आणि रोहित गर्ग यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.   

काय म्हणाला होता लॉरेन्स बिश्नोई?

एबीपी न्यूजच्या मुलाखतीत लॉरेन्स बिश्नोई विचारण्यात आलं की, "सलमान खानला धमकी दिली का?" या प्रश्नाचं उत्तर लॉरेन्सनं "हो" असं दिलं होतं. तो म्हणाला की, "सलमान खानने आमच्या समाजाला चांगली वागणूक दिली नाही. त्याने आमच्या भागात येऊन शिकार केली. त्यामुळे आमचा समाज त्याच्यावर चिडला. त्याने आमच्या समाजाची माफी मागावी. पण सलमानला मिळालेल्या धमकीच्या पत्रासोबत माझा काही संबंध नाही.", असंही तो म्हणाला होता. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Salman Khan: तो 1 बीएचके फ्लॅटमध्ये राहतो, त्याच्याबद्दल लोकांमध्ये गैरसमज...; सलमानच्या सिंपल लाईफस्टाईलबद्दल बोलला मुकेश छाब्रा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bachchu Kadu : दिव्यांग मंत्रालय निर्माण झाले, पण मंत्री आणि सचिवही नाही, मानधन कधीच वेळेवर मिळत नाही; बच्चू कडूंचा अध्यक्षपदाचा राजीनामा
दिव्यांग मंत्रालय निर्माण झाले, पण मंत्री आणि सचिवही नाही, मानधन कधीच वेळेवर मिळत नाही; बच्चू कडूंचा अध्यक्षपदाचा राजीनामा
मदतफेरीतून जमवले 43 लाख; देशमुख कुटुंबीयांसाठी माजलगावकरांचा मदतीचा हात
मदतफेरीतून जमवले 43 लाख; देशमुख कुटुंबीयांसाठी माजलगावकरांचा मदतीचा हात
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 'त्या' बहिणींना 1500 पेक्षा कमी रक्कम मिळणार, नेमका निकष काय?
लाडकी बहीण योजनेच्या जीआरमधील 'ती' महत्त्वाची अट, बहिणींना पडताळणीनंतर 1500 पेक्षा कमी रक्कम मिळणार
Bajrang Sonawane : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण दिल्लीत पोहोचलं; खासदार बजरंग सोनवणेंचा मोठा निर्णय, म्हणाले, 'त्या दोन पोलिस अधिकाऱ्यांचे..'
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण दिल्लीत पोहोचलं; खासदार बजरंग सोनवणेंचा मोठा निर्णय, म्हणाले, 'त्या दोन पोलिस अधिकाऱ्यांचे..'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Murlidhar Mohol on Shirdi Airport : शिर्डी विमानतळावर लवकरच नाईट लँडिंग सुरु होणारChandrashekhar Bawankule : Saamana तून फडणवीसांचे कौतुक;चंद्रशेखर बावनकुळेंनी मानले आभारBharat Gogawale : मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर भरत गोगावलेंची पहिली प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 3 PM 03 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bachchu Kadu : दिव्यांग मंत्रालय निर्माण झाले, पण मंत्री आणि सचिवही नाही, मानधन कधीच वेळेवर मिळत नाही; बच्चू कडूंचा अध्यक्षपदाचा राजीनामा
दिव्यांग मंत्रालय निर्माण झाले, पण मंत्री आणि सचिवही नाही, मानधन कधीच वेळेवर मिळत नाही; बच्चू कडूंचा अध्यक्षपदाचा राजीनामा
मदतफेरीतून जमवले 43 लाख; देशमुख कुटुंबीयांसाठी माजलगावकरांचा मदतीचा हात
मदतफेरीतून जमवले 43 लाख; देशमुख कुटुंबीयांसाठी माजलगावकरांचा मदतीचा हात
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 'त्या' बहिणींना 1500 पेक्षा कमी रक्कम मिळणार, नेमका निकष काय?
लाडकी बहीण योजनेच्या जीआरमधील 'ती' महत्त्वाची अट, बहिणींना पडताळणीनंतर 1500 पेक्षा कमी रक्कम मिळणार
Bajrang Sonawane : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण दिल्लीत पोहोचलं; खासदार बजरंग सोनवणेंचा मोठा निर्णय, म्हणाले, 'त्या दोन पोलिस अधिकाऱ्यांचे..'
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण दिल्लीत पोहोचलं; खासदार बजरंग सोनवणेंचा मोठा निर्णय, म्हणाले, 'त्या दोन पोलिस अधिकाऱ्यांचे..'
आधी बीडच्या मोर्चात, पुन्हा मुख्यमत्र्यांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत फडणवीसांचे खास आमदार मोठं बोलले
आधी बीडच्या मोर्चात, पुन्हा मुख्यमत्र्यांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत फडणवीसांचे खास आमदार मोठं बोलले
NCP : राष्ट्रवादीच्या बैठकीत दोन मुद्द्यांवर चर्चा; शरद पवारांकडील आमदार, नेते येणार असतील तर आधी 'हे' करा
राष्ट्रवादीच्या बैठकीत दोन मुद्द्यांवर चर्चा; शरद पवारांकडील आमदार, नेते येणार असतील तर आधी 'हे' करा
Suresh Dhas : कारण पर्यावरण खातं सुद्धा आमच्या जिल्ह्यात! सुरेश धस त्या खात्याला उद्देशून नेमकं काय म्हणाले?
कारण पर्यावरण खातं सुद्धा आमच्या जिल्ह्यात! सुरेश धस त्या खात्याला उद्देशून नेमकं काय म्हणाले?
Dmart Share Price : डीमार्टचा शेअर बनला रॉकेट, एक बातमी येताच गुंतवणूकदार मालामाल,नेमकं कारण काय?
डीमार्टचा शेअर बनला रॉकेट, एक बातमी येताच गुंतवणूकदार मालामाल,नेमकं कारण काय?
Embed widget