Salman Khan: तो 1 बीएचके फ्लॅटमध्ये राहतो, त्याच्याबद्दल लोकांमध्ये गैरसमज...; सलमानच्या सिंपल लाईफस्टाईलबद्दल बोलला मुकेश छाब्रा
कास्टिंग डिरेक्टर मुकेश छाब्रानं (Mukesh Chhabra) नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सलमानच्या सिंपल लाईफस्टाईलबद्दल सांगितलं आहे.
Salman Khan: अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सलमानच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक असतात. कास्टिंग डिरेक्टर मुकेश छाब्रानं (Mukesh Chhabra) नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सलमानच्या सिंपल लाईफस्टाईलबद्दल सांगितलं. तो म्हणाला की, "सलमान हा 1 बीएचके फ्लॅटमध्ये राहतो. त्याचं लाईफस्टाईल अत्यंत साधं आहे."
लोकांना सलमानबद्दल गैरसमज होतो, असं मुकेश छाब्रानं एका मुलाखतीत सांगितलं. तो म्हणाला की, "सलमान खान हा असा व्यक्ती आहे, जो नेहमीच प्रत्येकासाठी उपलब्ध असतो, जो तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी उभा असतो. तो प्रामाणिक आहे आणि लोक प्रामाणिकपणाचा गैरसमज करतात. हीच समस्या आहे, जेव्हा तुम्ही काही प्रामाणिकपणे बोलता, तेव्हा लोक ते वेगळ्या पद्धतीने घेतात."
कसे आहे सलमानचे घर?
मुकेश छाब्रानं मुलाखतीमध्ये सलमानच्या घराबाबत सांगितलं. तो म्हणाला, "तो साधे जीवन जगतो. त्याचा 1 बीएचके फ्लॅट आहे, हे फार कमी लोकांना माहीत आहे. त्यात एक सोफा, एक जेवणाचे टेबल, लोकांशी चर्चा करण्यासाठी एक लहान जागा, एक लहान जिम आणि एक खोली आहे. देशातील सर्वात मोठा स्टार सलमान खान हा अत्यंत साधं जीवन जगतो. त्याला फॅन्सी ब्रँड आवडत नाहीत किंवा तो महागड्या वस्तू विकत घेत नाहीत. मी 15 वर्षांपासून त्याला ओळखतो, मी त्याला बदललेलं पाहिलं नाही."
'सलमानचा मूड सतत बदलतो. त्यामुळे आज त्याचा मूड कसा आहे? हे तुम्हाला चेक करावं लागतं.' असंही मुकेशनं सलमानबाबत बोलताना सांगितलं.
कोण आहे मुकेश छाब्रा?
मुकेश छाब्रा हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध कास्टिंग डिरेक्टर आहे. त्यानं अनेक हिट चित्रपटांचे कास्टिंग केलं. त्यानं सलमानच्या बजरंगी भाईजान आणि ट्युबलाइट या चित्रपटांसाठी काम केलं आहे. मुकेश छाब्रानं सुशांत सिंह राजपूतच्या दिल बेचारा या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
सलमानचे आगामी चित्रपट
'किसी का भाई किसी की जान' हा सलमानचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाबरोबरच सलमानचा 'टायगर-3' हा चित्रपट देखील लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये सलमानसोबत अभिनेत्री कतरिना कैफ देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. किक-2 तसेच नो एन्ट्रीच्या सिक्वेलमधून सलमान प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :