लॉकडाऊनमुळे भाजी विकण्याची वेळ? अभिनेता जावेद हैदरच्या व्हायरल व्हिडीओमागचं सत्य
दुनिया में जीना है तो काम कर प्यारे या गाण्यावर अभिनेता जावेद हैदरचा भाजी विकतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. लॉकडाऊनमुळे अभिनयाशी संबंधित कोणतंही काम मिळत नसल्याने भाजी विकण्याची वेळ आल्याचा दावा केला जात होता. याबाबत एबीपी न्यूजने यासंदर्भात जावेद हैदरशी संपर्क केला. आर्थिक अडचणींमुळे भाजी विकत असल्याच्या वृत्ताचा इन्कार करत व्हिडीओची खरी कहाणी सांगितली.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता जावेद हैदरचा भाजी विकतानाचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. लॉकडाऊनमुळे काम मिळत नसल्याने जावेद हैदरवर भाजी विकण्याची वेळ आली, असं म्हटलं जात होतं. परंतु जावेदने मात्र या वृत्ताचं खंडन करत व्हायरल व्हिडीओमागची कहाणी सांगितली.
1970 मध्ये प्रदर्शित झालेल्या राज कपूर यांच्या जोकर सिनेमातील 'दुनिया में जीना है तो काम कर प्यारे' या गाण्यावर अभिनेता जावेद हैदरचा भाजी विकतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. लॉकडाऊनमुळे अभिनयाशी संबंधित कोणतंही काम मिळत नसल्याने भाजी विकण्याची वेळ आल्याचा दावा केला जात होता. याबाबत एबीपी न्यूजने यासंदर्भात जावेद हैदरशी संपर्क केला. आर्थिक अडचणींमुळे भाजी विकत असल्याच्या वृत्ताचा इन्कार करत व्हिडीओची खरी कहाणी सांगितली.
He is an actor aaj woh sabzi bech raha hain javed hyder pic.twitter.com/4Hk0ICr7Md
— Dolly Bindra (@DollyBindra) June 24, 2020
तो म्हणाला की, "माझी पत्नी शमाच्या सांगण्यावरुन मी हा व्हिडीओ बनवला होता आणि तिनेच हा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. खरंतर लॉकडाऊनदरम्यान मी फारच कंटाळलो होतो. या कठीण काळात असा व्हिडीओ बनवावा जेणेकरुन अडचणींचा सामना करणाऱ्या लोकांना प्रेरणा मिळेल, अशी माझी इच्छा होती. त्यातच पत्नीच्या सांगण्यावरुन मी मुंबईतील आपल्या घराजवळच्या बाजारात जाऊन भाजी विकणारा हा व्हिडीओ बनवला होता आणि माझ्या 12 वर्षीय मुलीने हा व्हिडीओ टिकटॉक अकाऊंटवर शेअर केला होता."
जावेद हैदर ने कहा, "मी एक कलाकर आहे. लॉकडाऊनमुळे मी देखील घरीच होतो. माझ्याकडे इतर विशेष कामही नव्हतं. लोकांच्या अडचणी पाहून काहीतरी नवं करुन लोकांचं मनोधौर्य वाढवण्याबाबत विचार केला आणि हा व्हिडीओ त्याचाच परिणाम आहे. महत्त्वाचं म्हणजे याआधीही मी भाजीच्या गाडीजवळ उभं राहून एक व्हिडीओ बनवला होता, तो अतिशय लोकप्रियी झाला होता. त्याच व्हिडीओची प्रेरणा घेत आणि माझ्या पत्नीच्या सांगण्यावरुन मी राज कपूर यांच्या गाण्यावर भाजी विकतानाचा व्हिडीओ बनवला, असं जावेद हैदरने सांगितलं.
तो पुढे म्हणाला की, "अभिनेत्री डॉली बिंद्रा यांनी नुकताच माझा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता आणि लॉकडाऊनमुळे काम मिळत नसल्याने माझ्यावर भाजी विकण्याची वेळ आली, असं म्हटलं होतं. त्यानंतर मी देखील उत्तर दिलं. अभिनेता म्हणून मी अशाप्रकारे असहाय्य नाही की माझ्यावर भाजी विकण्याची वेळ आली. परंतु माझ्या कमेंटवर कोणाचंही लक्ष गेलं नाही आणि पाहता पाहता माझा हा व्हिडीओ व्हायरल झाला."
जावेद हैदरने गुलाम, राम जाने, चांदनी बार, राम जाने, चंद्रमुखी, अल्लाह के बंदे, हिस्स, फूंक, अनकही, दिल तो बच्चा है जी, जन्नत, गली गली में चोर है, लम्हा, वेलकम बॅक, दबंग 3 यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तर त्याआधी जावेद हैदरने बाल कलाकार म्हणून धर्मेंद्र, मिथुन चक्रवर्ती, रजनीकांत, सन्नी देओल यांच्यासह डझनभर कलाकारांच्या बालपणीची भूमिका साकारली आहे.