एक्स्प्लोर
अभिनेते धर्मेंद्र नानावटी रुग्णालयात दाखल
मुंबई: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना पोटाच्या विकारांवरील उपचारासाठी आज मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या धर्मेंद्र यांच्यावर उपचार करण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती धर्मेंद्र यांचे डॉक्टर विशेष अग्रवाल यांनी दिली.
दरम्यान, धर्मेंद्र यांना रुग्णालयातून घरी कधी सोडायचं याबाबत डॉक्टर उद्या निर्णय घेणार आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, धर्मेंद्र हे मागील अनेक दिवसांपासून पोटाच्या विकारानं त्रस्त आहेत. याआधीही त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
8 डिसेंबरलाच त्यांनी आपला 81वा वाढदिवसही साजरा केला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त हेमामालिनी यांनी ट्विटरवरुन त्यांना शुभेच्छाही दिल्या होत्या.
— Hema Malini (@dreamgirlhema) December 8, 2016
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नाशिक
भारत
राजकारण
Advertisement