Bobby Deol: पापाराझीसमोर ढसाढसा रडला बॉबी देओल; म्हणाला, "मी स्वप्न पाहतोय, असं वाटतंय"
अॅनिमल (Animal) या चित्रपटातील बॉबी देओलच्या (Bobby Deol) दमदार अभिनयाचे देखील खूप कौतुक होत आहे.
![Bobby Deol: पापाराझीसमोर ढसाढसा रडला बॉबी देओल; म्हणाला, Bobby Deol cries when paparazzi praise him after Animal sets box office on fire video viral on social media Bobby Deol: पापाराझीसमोर ढसाढसा रडला बॉबी देओल; म्हणाला,](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/03/7da293240138d91eafbec2ef712c5b8a1701585313659259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bobby Deol: अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) अॅनिमल (Animal) हा चित्रपट सध्या चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. 1 डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. या चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाचं देखील अनेकजण कौतुक करत आहेत. या चित्रपटातील बॉबी देओलच्या (Bobby Deol) दमदार अभिनयाचे देखील खूप कौतुक होत आहे. अशातच नुकताच सोशल मीडियावर बॉबीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये बॉबी हा ढसाढसा रडताना दिसत आहे.
बॉबी ढसाढसा रडला (Bobby Deol cries)
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये दिसत आहे की, बॉबी देओल पापाराझींसमोर हात जोडून सर्व चाहत्यांचे अॅनिमल चित्रपटाला दिलेल्या प्रेमाबद्दल आभार मानत आहे. व्हिडीओमध्ये दिसते की, अॅनिमल चित्रपटाला मिळत असलेले प्रेक्षकांचे प्रेम पाहून बॉबी देओल खूप भावूक झाला. तो ढसाढसा रडू लागला. नंतर, तो कारमध्ये बसतो आणि त्याचे डोळे पुसतो.
बॉबीच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या. अॅनिमल चित्रपटामधील त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी चाहते त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. अॅनिमल या चित्रपटात बॉबी देओलनं खलनायकाची भूमिका साकारली आहे.
पाहा व्हिडीओ
View this post on Instagram
'अॅनिमल' चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ (Animal Box office collection)
रिलीजच्या पहिल्या दिवशी दिवशी 'अॅनिमल' चित्रपटानं 63.8 कोटीची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 66 कोटींची कमाई केली आहे. 'अॅनिमल' या चित्रपटाचं दिग्दर्शन धुरा संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Vanga) यांनी केलं आहे. अॅनिमल या चित्रपटात रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, अनिल कपूर, बॉबी देओल या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटात अनिल कपूर रणबीरच्या वडिलांच्या भूमिकेत आहे, रश्मिका रणबीरच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. अॅनिमल या चित्रपटात उपेंद्र लिमये या अभिनेत्यांनी एक महत्वाची भूमिका साकारली आहे. तसेच या चित्रपटाच्या एका फायटिंग सीनच्या बॅकग्राऊंडला अजय-अतुलचं "डॉल्बी वाल्या" हे गाणं ऐकू येतं.
संबंधित बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)