Animal Box Office Collection Day 1: रणबीरच्या 'अॅनिमल' समोर पठाण, गदर अन् टायगर सुद्धा 'गार' पडला; पहिल्या दिवशी बक्कळ कमाई
Animal Box Office Collection Day 1: अॅनिमल या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बंपर कमाई केली आहे. 'अॅनिमल' चित्रपटानं रिलीजच्या पहिल्याच दिवशी किती कमाई केली?जाणून घेऊयात...
Animal Box Office Collection Day 1: अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) 'अॅनिमल' (Animal) हा चित्रपट 1 डिसेंबर 2023 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. सध्या सगळीकडे या चित्रपटाची चर्चा होत आहे. या चित्रपटाला रिलीजच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. अनेक जण चित्रपटातील रणबीर कपूरच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत. अॅनिमल या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बंपर कमाई केली आहे. 'अॅनिमल' चित्रपटानं रिलीजच्या पहिल्याच दिवशी किती कमाई केली? जाणून घेऊयात...
रिलीजच्या पहिल्याच दिवशी अॅनिमलचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ (Animal Box Office Collection Day 1)
दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित 'अॅनिमल' चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. अनेकांनी या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला. 'अॅनिमल' चित्रपटानं 33.97 कोटी रुपयांच्या अॅडव्हान्स बुकिंग कलेक्शनसह पठाण (31.26 कोटी), टायगर 3 (22.48 कोटी) आणि गदर 2 (17.60 कोटी)चे रेकॉर्ड मोडले आहेत. त्याचबरोबर चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी देखील कोट्यवधींची कमाई केली आहे.
Sacknilk च्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार, 'Animal' ने रिलीजच्या पहिल्या दिवशी 61 कोटींची कमाई केली आहे. यापैकी हिंदी भाषेमध्ये चित्रपटाने 50.00 कोटींची कमाई केली आहे, तर तेलुगूमध्ये चित्रपटाचे कलेक्शन 10 कोटी रुपये आहे. या चित्रपटाने तमिळमध्ये 0.4 कोटी रुपये, कन्नडमध्ये 0.09 कोटी रुपये आणि मल्याळममध्ये 0.01 कोटी रुपयांचे कलेक्शन केलं आहे.
पठाण, गदर अन् टायगरला टाकलं मागे (Animal Beat Pathaan Gadar 2 tiger 3 Record)
'अॅनिमल' या चित्रपटानं ओपनिंग-डे कलेक्शनमध्ये शाहरुख खानच्या पठाण , सनी देओलच्या गदर 2 आणि सलमान खानच्या टायगर 3 चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला आहे. पठाण या चित्रपटानं ओपनिंग-डेला 57 कोटींची कमाई केली. तर गदर 2 या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी 40.10 कोटींची कमाई केली तसेच भाईजानच्या टायगर-3 या चित्रपटानं ओपनिंग-डेला 44.50 कोटींची कमाई केली.
ओपनिंग-डेला सर्वाधिक कलेक्शन करणारा रणबीरचा चित्रपट (Ranbir Kapoor Delivers His Biggest Opener Movie)
अॅनिमल हा रणबीरच्या करिअरमधील ओपनिंग-डेला सर्वाधिक कलेक्शन करणारा चित्रपट ठरला आहे. ब्रह्मास्त्र - पार्ट वन या रणबीरच्या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्याच दिवशी 36 कोटींची कमाई केली. तर त्याच्या संजू या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी 34.75 कोटींची कमाई केली होती.
'अॅनिमल' ची स्टार कास्ट (Animal Star Cast)
अॅनिमल या चित्रपटात रणबीरसोबतच रश्मिका मंदाना, अनिल कपूर, बॉबी देओल या कलाकारांनी देखील महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
संबंधित बातम्या:
Animal Movie Review : अंगावर शहारे आणणारा रणबीरचा 'अॅनिमल'!