एक्स्प्लोर
बिग बींच्या घरातील अनधिकृत बांधकाम पालिकेकडून नियमित
अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम बीएमसीने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात नियमित केलं

मुंबई : बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम मुंबई महापालिकेकडून नियमित करण्यात आलं आहे. माहितीच्या कायद्याअंतर्गत ही माहिती समोर आली आहे.
अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम बीएमसीने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात नियमित केलं, अशी माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मिळवली आहे.
काहीच दिवसांपूर्वी भाजप खासदार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या मुंबईतील 'रामायण' बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर महापालिकेने हातोडा चालवला होता.
बिग बींच्या बंगल्यातील बांधकाम अनधिकृत, बीएमसीची नोटीस
गोरेगाव पूर्वेला यशोधन भागातील ओबेरॉय सेव्हनमधल्या विंग 1 ते 7 मधील अनधिकृत बांधकाम नियमित करण्यात आलं आहे. पी-दक्षिण प्रशासकीय प्रभागाकडून बांधकामाचा सुधारित आराखडा मंजूर करण्यात आल्यानंतर हे नियमित केलं गेलं. जिन्याला सुरक्षा जाळी नसणे, भिंतींना आतून सिमेंटचे प्लॅस्टरिंग नसणे, लिफ्ट नसणे, जिना आणि तळमजल्यावर टाईल्स नसणे, अशी अनियमितता आढळून आल्याने ही नोटीस बजावण्यात आली होती. महाराष्ट्र रिजनल अँड टाऊन प्लानिंग (महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर नियोजन) च्या वतीने ही नोटीस बजावली होती. यापूर्वी अभिनेत्री अनुष्का शर्मा, कपिल शर्मा, अर्शद वारसी यारख्या सेलिब्रेटींना अनधिकृत बांधकाम प्रकरणी पालिकेने नोटीस बजावली आहे.आणखी वाचा























