Dharmaveer : ब्लॉकबस्टर 'धर्मवीर' आता ओटीटीवर; 17 जूनला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Dharmaveer : आनंद दिघे यांचा जीवनपट उलगडणारा 'धर्मवीर' सिनेमा आता झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे.
Dharmaveer : 'धर्मवीर' (Dharmaveer) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. 13 मे रोजी हा सिनेमा तब्बल चारशेहुन अधिक सिनेमागृहे आणि 10 हजारांहून अधिक शोजसह प्रेक्षकांच्या भेटीस आला. या सिनेमाने सिनेमागृहाबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड अभिमानाने झळकवले होते. आता सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर ब्लॉकबस्टर 'धर्मवीर' ओटीटीप्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
17 जूनला होणार प्रिमिअर
आनंद दिघे यांचा जीवनपट उलगडणारा 'धर्मवीर' सिनेमा आता झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. 17 जूनला या सिनेमाचा प्रिमिअर होणार आहे. प्रसाद ओकने 'धर्मवीर' सिनेमाचा ट्रेलर शेअर करत लिहिले आहे, 'धर्मवीर' आता झी 5 वर..!!! माणूस जपणे हाच ज्याच्यासाठी सर्वात मोठा धर्म, तो धर्मवीर येतोय 17 जूनपासून थेट तुमच्या भेटीला...2022 चा सर्वात मोठा मराठी ब्लॉकबस्टर सिनेमा फक्त झी 5 वर!".
प्रेक्षकांच्या प्रतिसादाने सिनेसृष्टीत उत्साहाचं वातावरण
हिंदी सिनेमांना गर्दी करणारे प्रेक्षक मराठी चित्रपटांकडे दुर्लक्ष करत असल्याचं बोललं जातं पण 'धर्मवीर'ने बॉक्सऑफिसवरच्या घवघवीत यशाने प्रेक्षक पुन्हा मराठी चित्रपटाकडे येऊ लागल्याचं सुखद चित्र दिसत आहे. अभिनेते प्रसाद ओक यांनी साकारलेल्या आनंद दिघे यांच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी आपल्या पसंतीची ठसठशीत मोहोर उमटवली आहे.
प्रविण तरडे यांच्या दमदार लेखन आणि कौशल्यपूर्ण दिग्दर्शनाने सजलेला, झी स्टुडिओज, मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्सची निर्मिती असलेला ‘धर्मवीर मु.पो. ठाणे’ हा सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमात अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे.
10,000 हून अधिक शोज
धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या सिनेमाचे 10,000 हून अधिक शोज लागले आहेत. तसेच प्रत्येक शो हाऊसफुल होत आहे. सिनेमातील प्रत्येक कलाकाराचं काम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. हा सिनेमा सुरू असताना प्रेक्षक सिनेमागृहात टाळ्या आणि शिट्ट्यांचा आवाज करत असतात. तसेच हा सिनेमा पाहताना अनेक शिवसैनिकांना अश्रू अनावर झाले.
संबंधित बातम्या