एक्स्प्लोर

'भूत बंगला नाही चालला तर गुडबाय...' प्रसिद्ध दिग्दर्शकाचा सिनेसृष्टी सोडण्याचा निर्णय? नेमकं काय म्हणाले?

Priyadarshan interview about Bhoot Bangla: अभिनेता अक्षय कुमार आणि फिल्ममेकर प्रियदर्शन तब्बल 16 वर्षांनंतर भूत बंगला या चित्रपटासाठी एकत्र आले आहेत.

Priydarshan on bhoot bangla: अक्षय कुमारच्या 'भूत बंगला' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटातून अक्षय कुमारचा कॉमेडी अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. फिल्ममेकर प्रियदर्शन आणि अक्षय कुमारची जोडी 16 वर्षांनी पुन्हा एकत्र पाहायला मिळणार आहे. विनोदाचा मास्टर म्हणून ओळखला जाणारा दिग्दर्शक प्रियदर्शन  एका हिट विनोदी चित्रपटाच्या शोधात होता. आता अक्षय कुमार आणि त्यानं भूत बंगला हा चित्रपट तयार केला आहे.  हा चित्रपट जर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही तर, प्रियदर्शन यांनी मोठा निर्णय घेणार असल्याचं जाहीर केलं.

भूत बंगला चित्रपटाचा टीझर रिलीज झाला. तब्बल 16 वर्षांनी अक्षय कुमार आणि प्रियदर्शनची क्लासिक कॉमेडी पाहून प्रेक्षकांना आनंद झाला. टीझर प्रदर्शित झाल्यापासून,  या चित्रपटाची कथा नेमकी आहे तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत प्रियदर्शनने या चित्रपटाविषयी माहिती दिली. तसेच हा चित्रपट चालला नाही तर, मोठा निर्णय घेणार असल्याचं जाहीर केलं. प्रियदर्शनने अलिकडेच  मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यानं सांगितलं की, 'भूल भलैया चित्रपटानंतर  अनेक लोकांनी हॉरर कॉमेडी चित्रपट तयार करण्यास सुरुवात केली. तो तेव्हा एक ट्रेंड बनला होता. त्यामुळे भूत बंगला चित्रपट तयार करण्यासाठी  कोणतीही आयडिया शिल्लक नव्हती', असं फिल्ममेकर प्रियदर्शन यांनी स्पष्ट केलं.  

'भूल भूलैया या हॉरर कॉमेडी जॉनर चित्रपटानंतर, पुढे कोणता चित्रपट तयार करायचा? किंवा कोणत्या जॉनरवर चित्रपट तयार करावा? याबाबत माझ्याकडे कोणतीही कल्पना शिल्लक नव्हती', असं प्रियदर्शन यांनी स्पष्ट केलं.  'जेव्हा भूत बंगला या चित्रपटासाठी मी काम करत होतो, तेव्हा मी विचार केला की, मी आणखी काय नवीन तयार करु?  तेव्हा फॅन्टसी  - कॉमेडी चित्रपट तयार करूयात असा मनात विचार आला', असं प्रियदर्शन यांनी सांगितलं.

'लोक काळी जादू आणि भूतांवर विश्वास ठेवतात.  अंधश्रद्धा आणि काही लोककथा देखील आहेत. आम्ही  एक इंग्लिश वेअरवुल्फसारखा चित्रपट बनवण्याचा प्रयत्न केला.  ज्यामध्ये  विनोद देखील आहे.  सगळ्या कॉम्बिनेशनचा वापर करुन भूत बंगला तयार करण्यात आला आहे', असं प्रियदर्शन म्हणाले. 'मला आशा आहे की लोकांना भूत बंगला हा चित्रपट नक्की आवडेल.  लोक माझा विचार स्वीकारतील.   जर हा चित्रपट चांगला चालला तर, मला थोडा अधिक आत्मविश्वास मिळेल.  अन्यथा मी गुडबाय म्हणेन.  एक डायरेक्टर नेहमी सामान्य लोकांच्या विचारांच्या एक पाऊल पुढे असतो.  जर, प्रेक्षक  तुम्हाला नाकारू लागले तर,  तिथेच थांबा,  तोपर्यंत पुढे जात रहा',  असं प्रियदर्शन म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Satluj: रिलीजनंतर 48 तासांत हटवला; ‘सतलज’च्या नुकसानभरपाईसाठी गुरुद्वारांनी उचललं मोठं पाऊल! दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
रिलीजनंतर 48 तासांत हटवला; ‘सतलज’च्या नुकसानभरपाईसाठी गुरुद्वारांनी उचललं मोठं पाऊल! दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
Dashmi Marathi Movie Poster: महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?
महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?
OTT Webseries: 7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
Govinda Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget