एक्स्प्लोर

बर्थ डे स्पेशल : प्रभासबद्दल माहित नसलेल्या 15 गोष्टी

आज प्रभासच्या वाढदिवसानिमित्त त्याच्याबद्दल माहित नसलेल्या 15 गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत...

मुंबई : सुपर-डुपर हिट चित्रपट 'बाहुबली'चा प्रमुख अभिनेता प्रभासचा आज आपला 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. 23 ऑक्टोबर 1979 रोजी जन्मलेल्या प्रभासने तेलुगु सिनेमातून सिनेकारकिर्दीची सुरुवात केली होती. पण प्रभास आता बॉलिवूड किंवा बॉलिवूडपर्यंतच मर्यादित राहिलेला नाही. 'बाहुबली'नंतर जगभरात त्याच्या फॅनफॉलोईंगमध्ये तुफान वाढ झाली आहे. आज प्रभासच्या वाढदिवसानिमित्त त्याच्याबद्दल माहित नसलेल्या 15 गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत... 1 'बाहुबली' प्रभासचं खरं नाव वेंकट सत्यनारायण प्रभास राजू उप्पलपट्टी आहे. प्रभासने 2002 मध्ये प्रदर्शित झालेला 'ईश्वर' या तेलुगु सिनेमातून कारकीर्दीची सुरुवात केली होती. 2 प्रभासने एका हिंदी चित्रपटातही काम केलं आहे. अजय देवगणच्या 'अॅक्शन जॅक्सन'मधील एका गाण्यात तो दिसला होता. आता ह्याला बॉलिवूड पदार्पण म्हणायचं की नाही ही वेगळी बाब, पण तो हिंदी चित्रपटात दिसला होता. 3 प्रभास दाक्षिणात्य सिनेसृष्टीमधील पहिला कलाकार आहे, ज्याचा मेणाचा पुतळा बँकॉकमधील मादाम तुसाँ म्युझियममध्ये आहे. हा पुतळा अमरेंद्र बाहुबलीच्या रुपातील आहे. 4 प्रभासची कौटुंबीक पार्श्वभूमी सिनेमाची आहे. त्याचे वडील सूर्यनारायण राजू निर्माते आहेत. तर काका उप्नापती कृष्णम राजू टॉलिवूड स्टार आहेत. 5 आपल्या 14 वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत प्रभासने केवळ 19 चित्रपट केले आहेत. बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमीर खानप्रमाणेच प्रभासही वर्षाला एकच चित्रपट करतो. 6 अमरेंद्र आणि महेंद्र बाहुबलीची भूमिका साकारणारा प्रभास खऱ्या आयुष्यात इंजिनीअर आहे. त्याने हैदराबादच्या श्री चैतन्य कॉलेजमधून बीटेक केलं आहे. 7 आज लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या प्रभासला हॉटेल इंडस्ट्रीमध्ये करिअर करायचं होतं. एका मुलाखतीत त्याने हा खुलासा केला होता. 8 प्रभासचा आवडता पदार्थ चिकन बिर्याणी आहे. 9 प्रभास राजकुमार हिरानींचा मोठा चाहता आहे. त्याने 'मुन्नाभाई एमबीबीएस' आणि '3 इडियट्स' 20 हे चित्रपट वेळा पाहिले आहेत. 10 अख्ख जग प्रभासचे चाहते असताना, बॉलिवूडमधील शाहरुख आणि सलमान त्याचे हे आवडते कलाकार आहेत. तर हॉलिवूडमधील रॉबर्ट डिनीरो यांचा तो मोठा फॅन आहे. 11 'बाहुबली'साठी प्रभास एवढा डेडिकेटेड होता की, त्याने चार वर्ष एकही चित्रपट स्वीकारला नाही. 12 इतकंच नाही तर प्रभासने 5.5 कोटी रुपयांची जाहिरातही नाकारली. कारण त्याला बाहुबलीवर लक्ष केंद्रीत करायचं होतं. 13 बाहुबलीमुळे प्रभासने अजून लग्न केलेलं नाही. आतापर्यंत त्याने 6000 लग्नाचे प्रस्ताव धुडकावले आहेत. 14 बाहुबली सिनेमासाठी बलदंड शरीर कमावण्यासाठी प्रभासने घरातच व्हॉलीबॉल कोर्ट बनवलं होतं, जेणेकरुन तो कधीही वर्कआऊट करु शकतो आणि आवडता खेळही एन्जॉय करु शकतो. 15 बाहुबलीसाठी प्रभासने 30 किलो वजन वाढवलं होतं. चार वर्ष हा लूक कायम ठेवणं त्याच्यासाठी मोठं आव्हान होतं. या चार वर्षांत त्याने प्रचंड चिकन आणि अंडी खाल्ली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoor Eetha Trailer Release: 'महाराष्ट्राची शान, लावणीचा अभिमान... विठाबाई...'; अंगावर शहारे आणणारा श्रद्धा कपूरच्या 'ईठा'चा ट्रेलर, दमदार डायलॉग्स अन् म्युझिक, Trailer
'महाराष्ट्राची शान, लावणीचा अभिमान... विठाबाई...'; अंगावर शहारे आणणारा श्रद्धा कपूरच्या 'ईठा'चा ट्रेलर, दमदार डायलॉग्स अन् म्युझिक, Trailer
Rakul Preet Singh On Surpanakha Character Ramayana Movie: 'शूर्पणखाबद्दल अनेक गैरसमज... तिच्यामुळेच युद्धाची सुरुवात झाली...'; 'रामायण' सिनेमातल्या भूमिकेवर रकुल प्रीत सिंह थेट वक्तव्य, काय म्हणाली?
'शूर्पणखाबद्दल अनेक गैरसमज...'; 'रामायण' सिनेमातल्या भूमिकेवर रकुल प्रीत सिंह थेट वक्तव्य, काय म्हणाली?
Radhika Apte On God Worship: 'माझा देवावर विश्वास नाही, लोकांनी मूर्तीपेक्षा...'; राधिका आपटेचं देव, श्रद्धा आणि भक्तीवर थेट वक्तव्य, नेमकं काय म्हणाली?
'माझा देवावर विश्वास नाही, लोकांनी मूर्तीपेक्षा...'; राधिका आपटेचं देव, श्रद्धा आणि भक्तीवर थेट वक्तव्य, नेमकं काय म्हणाली?
Sankarshan Karhade Grandfather: तेव्हा फोन नवीन आलेले, माझ्या फोनवर 17-18 मिस्ड कॉल आलेले, मी आईला फोन केला आणि म्हणालो....: संकर्षण कऱ्हाडे
तेव्हा फोन नवीन आलेले, माझ्या फोनवर 17-18 मिस्ड कॉल आलेले, मी आईला फोन केला आणि म्हणालो....: संकर्षण कऱ्हाडे

व्हिडीओ

Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshada Deshmukh : पुणे पदवीधरमध्ये विजय मिळवत आमदार होताच हर्षदा देशमुख जाधव साताऱ्यात पोहोचल्या, पुढील वाटचालीबाबत म्हणाल्या..
पुणे पदवीधरची निवडणूक जनतेनं हातात घेतलेली, पवारसाहेबांच्या आशीर्वादनं महाराष्ट्राला पहिली महिला पदवीधर आमदार मिळाली : हर्षदा देशमुख जाधव
SPPU Exam Postponed : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
Pimpri Chinchwad : लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
Devendra Fadnavis: बंद खोलीत कुठलीही बैठक झाली नाही, राजकीय चर्चा झाली नाही, देवेंद्र फडणवीस ठाकरे बंधूंच्या भेटीबाबत म्हणाले...
बंद खोलीत कुठलीही बैठक झाली नाही, राजकीय चर्चा झाली नाही, देवेंद्र फडणवीस ठाकरे बंधूंच्या भेटीबाबत म्हणाले...
Shreyas Iyer : आम्हाला पुन्हा विचार करावा लागेल...,श्रेयस अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?  
न्यूझीलंडनं भारताच्या विजयाचा रथ रोखला,अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?
Joshimath Helicopter Crash: बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
Raju Shetti: ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
Embed widget