एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बर्थ डे स्पेशल : नग्न जाहिरात ते 33 वर्ष लहान गर्लफ्रेण्ड, आयर्नमॅनची कहाणी
पण तरुणींच्या बाबतीत मात्र गोष्ट वेगळी आहे. तरुणींसाठी मिलिंद नव्वदच्या दशकात जेवढा फिट आणि यंग होता, तेवढाच आजही आहे.
मुंबई : वयाची पन्नाशी ओलांडणारा सुपरमॉडेल, अभिनेता मिलिंद सोमण आजही अनेक तरुणींच्या हृदयाचे ठोके चुकवतो. 'अल्ट्रामॅन' मिलिंद सोमणचा आज 52 वाढदिवस आहे. 4 नोव्हेंबर 1965 रोजी जन्मलेल्या या आयर्नमॅनचा फिटनेस तरुणांना लाजवेल असाच आहे. त्याच्यासाठी वय हा केवळ एक आकडा आहे.
तरुणांमध्ये मिलिंद सोमणबद्दची क्रेझ त्याच्या फिटनेसमुळे वाढली आहे. पण तरुणींच्या बाबतीत मात्र गोष्ट वेगळी आहे. तरुणींसाठी मिलिंद नव्वदच्या दशकात जेवढा फिट आणि यंग होता, तेवढाच आजही आहे. तरुणी/मुलींना तो आजही सेक्सीच वाटतो.
33 वर्षांनी लहान गर्लफ्रेण्डमुळे चर्चेत
52 वर्षीय मिलिंद सोमणने काही दिवसांपू्र्वी अमेझॉन फॅशन वीकमध्ये (AIFW) गर्लफ्रेण्डसोबत रॅम्पवॉक केला होता. विशेष म्हणजे मिलिंद सोमण त्याच्या गर्लफ्रेण्डपेक्षा 33 वर्षांनी मोठा आहे.
त्याच्या गर्लफ्रेण्डचं नाव आहे अंकिता कोनवर. मिलिंदने वर्षभरात अंकितासोबतचे बरेच फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अंकिता अवघ्या 18 वर्षांची आहे.
सुपरमॉडेल मिलिंद सोमण आता 'आयर्नमॅन', सर्वात अवघड 'ट्रायथलॉन'चं जेतेपद
काही वृत्तानुसार, अंकिता एअर होस्टेस आहे. आता ती मॅरेथॉनमध्ये सहभाग घेते. मिलिंद आणि अंकिता मागील वर्षाच्या ऑक्टोबरपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. इतकंच नाही तर मिलिंदने आई उषा सोमण यांच्याशी अंकिताची भेट करुन दिली. त्यांनीगी या नात्याला सहमती दर्शवली आहे. उषा सोमण यादेखीस मॅरेथॉनर आहेत. मिलिंदने फ्रेंच अभिनेत्री मिलन जम्पनोईसोबत लग्न केलं होतं. पण नंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. 2009 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर मिलिंद सोमण अभिनेत्री सहाना गोस्वामीला डेट करत होता. सहाना मिलिंदपेक्षा 21 वर्षांनी लहान होती. त्या दोघांचं नातं चार वर्ष टिकलं. बॉलिवूडमध्ये खास करिअर नाही 1995 मध्ये अलिशा चिनॉयच्या 'मेड इन इंडिया' या म्युझिक व्हिडीओमधील त्याचा परफॉर्मन्स अतिशय गाजला होता. न्यूड पोज देणारा पहिला भारतीय, अशीही त्याची ओळख आहे. बॉलिवूडमधील त्याचं करिअर फार खास नाही. त्याने 16 डिसेंबर, रुल्स: प्यार का सुपरहिट फॉर्मूला, भ्रम, से सलाम इंडिया, भेजा फ्राय आणि बाजीवर-मस्तानी या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तर सैफ अली खानच्या शेफ चित्रपटात तो अखेरचा दिसला होता. फिटनेसमधून वेळ काढून त्याने काही चित्रपट आणि टीव्ही शो केले आहेत. मराठी, तेलुगू, तामीळ, इंग्लिश, जपानी, जर्मन, फ्रेंच, स्वीडिश यांसह अनेक चित्रपटांमध्ये त्याने काम केलं आहे. एकेकाळी दूरदर्शनवर कॅप्टन व्योमची भूमिका साकारणारा मिलिंद आता मलायका अरोरासह ‘इंडियाज नेक्स्ट टॉप मॉडेल’ या शोचं अँकरिंग करत आहे. मधु सप्रेसोबतच्या जाहिरातीमुळे वाद 1995 मध्ये एका शूज ब्रॅण्डच्या जाहिरातीमध्ये तो आणि मधु सप्रे झळकले होते. या ब्लॅक अँड व्हाईट जाहिरातीत मिलिंद आणि मधुने आपल्या शरीरावर केवळ पायथन लपेटला होता आणि पायात शूज घातले होते, ज्याची ते जाहिरात करत होतं. पण या वादग्रस्त जाहिरातीवर बंदी घालण्यात आली. अॅड एजन्सीसह मधु सप्रे आणि मिलिंद सोमणवर कोर्टाच केसही झाली. सुमारे 11 वर्षांच्या कोर्टकचेरीनंतर ऑक्टोबर 2005 मध्ये त्यांना निर्दोष जाहीर करण्यात आलं. फिटनेस फ्रीक मिलिंद सोमण मिलिंद सोमण फिटनेस आणि खेळाबाबत अतिशय सजग आहे. अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये आयोजित अल्ट्रामॅन ही 517.5 किमी स्पर्धा त्याने पार केली. पहिल्या दिवशी दहा किलोमीटर स्विमिंग आणि 142 किलोमीटर सायकलिंग, दुसऱ्या दिवशी 276 किमी सायकलिंग आणि तिसऱ्या दिवशी तब्बल 84 किमी धावणे. विशेष म्हणजे मिलिंदने एकट्याने ही शर्यत अनवाणी पूर्ण केली. त्याआधी स्वित्झर्लंडच्या झुरिचमधील सर्वात कठीण मानली जाणारी ट्रायथलॉनही मिलिंद सोमणने यशस्वीपणे पार केली होती. या स्पर्धेत 3.8 किलोमीटर स्विमिंग, 180.2 किलोमीटर सायकलिंग, 42.2 किलोमीटर धावण्याचा समावेश होता. ‘आयर्नमॅन’ हा किताब जिंकण्यासाठी स्पर्धकांना ही ट्रायथलॉन 16 तासांमध्ये पूर्ण करणं गरजेचं असतं. मिलिंदने 15 तास 19 मिनिटांतच पूर्ण केली होती.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement