एक्स्प्लोर
बिपाशा आणि करण आज लग्नाच्या बेडीत अडकणार

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू आणि करणसिंह ग्रोवर आज लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. पारंपरिक बंगाली पद्धतीने करण आणि बिपाशाचं शुभमंगल होणार आहे. मुंबईच्या परेलमधील एका आलिशान हॉटेलमध्ये संध्याकाळी 6.30 च्या सुमारास हा विवाहसोहळा पार पडेल. बिपाशा-करणच्या लग्नाला बॉलिवूडचे अनेक कलाकार हजेरी लावणार आहेत.
करण-बिपाशाच्या लग्नाबाबत जेनिफर म्हणाली...
जुहूमध्ये कालच बिपाशाचा मेंहदीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला शिल्प शेट्टी, शमीता शेट्टी आणि बिपाशा-करणच्या मित्र परिवाराने हजेरी लावली होती.करणसिंग तिसऱ्यांदा बोहल्यावर
'अलोन' सिनेमाच्या सेटवर बिपाशा आणि करण एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांच्या लग्नाची चर्चा एक महिन्यापासून सोशल मीडियावर रंगत आहे. त्यांच्या फोटोशूटपासून ते लग्नाच्या विधींचे सगळे फोटो सोशल नेटवर्किंग साईट्सवर शेअर करण्यात आले होते. बिपाशा बासूचं हे पहिलं लग्न असून करण तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहे. यापूर्वी त्याने श्रद्धा निगम आणि जेनिफर विंगेटसोबत लग्न केलं होतं.आणखी वाचा























